व्यवसाय जाहिरात

जाहिरात म्हणजे पाहिजे?

2 उत्तरे
2 answers

जाहिरात म्हणजे पाहिजे?

0
जाहिरात म्हणजे दृक् किंवा श्राव्य संदेश विविध संपर्क माध्यमांतून जनतेस कळविणे. जाहिरातीने प्रभावित होऊन लोकांनी उत्पादित वस्तू किंवा सेवा घ्यावी, हा जाहिरातीमागे उद्देश असतो. तसेच व्यक्ती वा संस्था यांविषयी लोकांचे मत अनुकूल होऊन ते संदेशाबरहुकूम कार्यशील व्हावे, असाही हेतू जाहिरातीमागे असतो.


औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादकाला आपल्या मालाचे उत्पादन पूर्वीपेक्षा अनेकपटींने वाढविणे शक्य झाले व त्यामुळे त्याला विक्रीचे प्रमाणही वाढविणे आवश्यक झाले. दळणवळणाच्या वाढत्या सोयींमुळे मालाच्या वाहतुकीची सोय झाली व आंतरराष्ट्रीय बाजारपेठाही उपलब्ध होऊ लागल्या. जाहिरात हा विपणनातील विक्रीतंत्राचा एक महत्त्वाचा अविभाज्य घटक असून विचारप्रसारणाचा एक प्रकार आहे. जाहिरात वा विज्ञापन ही एक कला आहे; ज्यात विविध उपयोजित कलाकौशल्यांचा आविष्कार घडतो. जाहिरात हे एक शास्त्रही आहे व त्याची उभारणी समाजशास्त्र, मानसशास्त्र, वाणिज्य व सांख्यिकीशास्त्र इत्यादींच्या पायावर केली जाते. जाहिरातीच्या क्षेत्रात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीतीने अनेकांना रोजगार मिळतो वा कमाई होते व म्हणून तो एक धंदाही असतो.


उत्तर लिहिले · 16/4/2023
कर्म · 7460
0

जाहिरात म्हणजे एखाद्या उत्पादनाची, सेवेची, संस्थेची किंवा कशाचीही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला प्रयत्न.

जाहिरातीचे मुख्य उद्देश:

  • उत्पादनाबद्दल जागरूकता निर्माण करणे.
  • उत्पादनाकडे लोकांचे लक्ष वेधून घेणे.
  • उत्पादन खरेदी करण्यास प्रवृत्त करणे.
  • एखाद्या विशिष्ट ब्रँडची प्रतिमा तयार करणे.

जाहिरात विविध माध्यमांतून केली जाते:

  1. टीव्ही आणि रेडिओ: हे माध्यम खूप प्रभावी आहे, कारण ते एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचते.
  2. वृत्तपत्रे आणि मासिके: हे माध्यम विशिष्ट वाचकांना लक्ष्य करते.
  3. इंटरनेट: सोशल मीडिया, वेबसाइट्स आणि ईमेलच्या माध्यमातून जाहिरात करता येते.
  4. बाहेरची जाहिरात: होर्डिंग्ज, पोस्टर्स आणि बस स्टॉपवर जाहिरात करणे.

जाहिरात ही एक कला आणि विज्ञान आहे. ती लोकांना आकर्षित करण्यासाठी योग्य शब्दांचा आणि दृश्यांचा वापर करते.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440

Related Questions

जाहिरातीचे स्वरूप व प्रकार थोडक्यात लिहा?
जाहिरात लेखनाचे प्रकार?
जाहिरातीचे महत्त्व स्पष्ट करा?
गुगल ॲडसेन्सच्या वापरकर्त्यांसाठी प्रश्न: तुम्हाला पेज RPM किती मिळत आहे? 1000 पेज व्ह्यूवर (page view) किती पेज RPM मिळत आहे? भाषा, देश आणि मजकुराच्या दर्जा यामुळे पेज RPM वर फरक पडू शकतो?
जाहिरात ही संकल्पना?
एक साप्ताहिक सुरू होत आहे, खेळ या विषयावर. संपादक सचिन तेंडुलकर, स्थळ मुंबई. या विषयाला धरून वृत्तपत्रासाठी जाहिरात तयार करा आणि या साप्ताहिकाला नाव सुचवा?
जाहिरात एजन्सी म्हणजे काय हे सांगून ग्राहक आणि जाहिरात एजन्सीमधील संबंध स्पष्ट करा?