2 उत्तरे
2
answers
वेळ आणि जीवनाचे महत्त्व काय आहे?
0
Answer link
वेळ आणि जिवन -
माणसाचा जन्म आणि वेळच अतुट नातं आहे.आईच्या गर्भात जसं भृण वाढतं तसं जिवन प्रकिया पुर्ण करीत जिव धारण निर्मिती पुर्ण होऊन एक दिवस या सृष्टीच्या पडद्यावर जन्माची एक वेळ निश्र्चित करतो. क्षण क्षणाला एक एक दिवस थोडं थोडं मोठं होताना दिसते.तेव्हापासूनच वेळच महत्त्व वाढत जाते.ज्ञानात्मक रचनात्मक प्रगती करीत एक देशाचा आधारस्तंभ असलेला नागरिक बनतो. आपल्या बुध्दिचातुर्यानुसार भविष्य ठरवित वाटचाल करताना प्रत्येक क्षण अनमोल आहे .हे ज्याला कळलं तर याच जन्माच सार्थक झालेअसे म्हणायला हरकत नाही. वेळ अनमोल आहे. कोणी म्हणतात मुल्यवान आहे. कोणी म्हणतात मला वेळच नाही. काहींना वेळ असतं परंतु कामच नसते. एक गोष्ट लक्षात घेतली तर अस वाटत ज्यांनी जिवनात जी काही संपत्ती कमावली ती संपत्ती वेळेच्या एका क्षणाला विकत घेऊ शकत नाही. जिवनात जेवढी व्यस्तता अधिक तेवढीच कामाचे नियोजन महत्त्वाचे असते. मग ते काम ज्ञानात्मक रचनात्मक सेवात्मक किंवा जनकल्याणात्मक असावे. ते केव्हाही श्रेष्ठ आणि चांगले. तरच वेळच सदुपयोग झालं असं म्हणता येईल. यासाठीच मानसाचा जन्म आहे. जसं जन्माची वेळ निश्चित नसतं तसं मृत्यू ची वेळ निश्चित नसतं. परंतु त्यांच्यात एक साम्य आहे. जन्म आणि मृत्यू ची चाहूल होत असते. त्याप्रमाणे मानसानी वेळच महत्त्व समजून घेत वाटचाल करायला हवे. वेळ कुणासाठी ही थांबत नाही.आणि सोबत चालत नाही. तर आपल्यालाच वेळेप्रमाणे चालावं लागतं. वेळ मुल्यवान आहे पण आयुष्य क्षणाक्षणाला घटत असते.म्हणूनच माणसानं जिवनात वेळेचा उपयोग श्रेष्ठ आणि चांगले सत्कर्मात घालविले पाहिजे.वेळच सदुपयोग म्हणजे बुद्धीमत्ता आणि दुरूपयोग म्हणजे मुर्खता. शेवटी जिवन अनमोल आहे. तसंच वेळ ही अनमोल आहे.. ज्यांना महत्त्व कळलं.त्याना जिवनाच सार्थक केले.आणि ज्यांना कळलंच नाही त्यांनी नक्कीच काहीतरी गमावलं.
0
Answer link
वेळ आणि जीवनाचे महत्त्व अनमोल आहे. या दोन्ही गोष्टींची किंमत करणे आवश्यक आहे, कारण एकदा गेलेला क्षण परत कधीच येत नाही.
वेळेचे महत्त्व:
- वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. एकदा ती निघून गेली की परत येत नाही.
- वेळेचा सदुपयोग केल्यास यश मिळवता येते.
- प्रत्येक क्षणाचा उपयोग काहीतरी नवीन शिकण्यासाठी किंवा निर्मिती करण्यासाठी करायला हवा.
जीवनाचे महत्त्व:
- जीवन एक अनमोल भेट आहे.
- प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची संधी मिळते.
- माणुसकी जपणे आणि इतरांना मदत करणे हे जीवनाचे सार आहे.
वेळ आणि जीवन यांचा योग्य समन्वय साधून, प्रत्येक क्षण आनंदात घालवावा. कारण हे दोन्ही आपल्याला एकदाच मिळतात.