पर्यटन किल्ले

रायगड किल्ला कोठे आहे?

3 उत्तरे
3 answers

रायगड किल्ला कोठे आहे?

1
रायगड किल्ला

रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इ. सन १६७४ मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे ची सुविधा असून त्यामुळे काही मिनिटामध्ये किल्ल्यावरती पोहोचता येते.

रायगड किल्ल्यावरती एक मानवनिर्मित तळे असून त्याचे नाव “गंगासागर तलाव” असे आहे. किल्ल्यावरती जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग “महा-दरवाजा” मधून जातो. किल्ल्यामध्ये असलेल्या राज्याच्या दरबारात एक सिंहासनाची प्रतिकृती असून ती नगारखाना दरवाज्याकडे तोंड करून ठेवली आहे. सिहासनाजवळील भाग ध्वनीलहरीसाठी अशा पद्धतीने बनवला गेला आहे कि दरबारातील दरवाजाच्या इथे बोललेले शब्द सिंहासनापर्यंत सहजरीत्या ऐकू येऊ शकतात. रायगड किल्ल्यावरती उंच दरीवरती बांधलेला एक प्रसिद्ध बुरुज असून त्याला “हिरकणी बुरूज” असे म्हणतात.
उत्तर लिहिले · 24/4/2022
कर्म · 1850
0
रायगड किल्ला रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यात आहे.
उत्तर लिहिले · 25/4/2022
कर्म · 9630
0

रायगड किल्ला महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात आहे.

हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर उंचीवर आहे.

पत्ता: रायगड किल्ला, महाड तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5220

Related Questions

तुम्ही भेट दिलेल्या कोणत्याही दोन पर्यटन स्थळांबद्दल माहिती लिहा?
पर्यटन मार्गदर्शकाची वैशिष्ट्ये लिहा?
पर्यटक मार्गदर्शकाची वैशिष्ट्ये लिहा?
भारतामध्ये थंड हवेचे ठिकाण कोणते?
बाबा हरभजन सिंह सिक्कीम बद्दल माहिती?
चोपडा येथील देवाची माहिती द्या?
कोतवाल, गाव, रायगड जिल्हा माहिती द्या?