साहित्य

ललित साहित्याचे विविध प्रकार थोडक्यात कसे स्पष्ट सांगाल?

6 उत्तरे
6 answers

ललित साहित्याचे विविध प्रकार थोडक्यात कसे स्पष्ट सांगाल?

9
काव्य, कथा, कादंबरी, नाटक हे ललित साहित्याचे प्रमुख प्रकार होत. ललित वा लघुनिबंध, नाट्यछटा आदी प्रकारांचाही उल्लेख करता येईल. (आ) ललितेतर साहित्य : ललितेतर वाङ्‌मयाचे मुख्य उद्दिष्ट वाचकाला माहिती व ज्ञान देणे, अशा स्वरूपाचे असते. त्यात प्रत्यक्ष वास्तवाला, त्यातील तथ्यालाच केवळ प्राधान्य असते.
ललित साहित्याचे प्रकार
प्रथम आपण बघू ललित साहित्य म्हणजे काय

ललित शब्दाचा अर्थ 'सौंदर्य' 'सुरेख' 'मनमोहक' असा आहे.मनाला आनंद देणारे सौंदर्यतत्व या शब्दांमधून सूचित होते.लेखक हे लालित्य भाषेद्वारे निर्माण करीत असतो.आलंकारिक शब्दरचनेतून रसात्मक अनुभव वाचकांंना करून दिल्या जातो.लेखक प्रत्यक्षातल्या माणसावरून,अनुभवावरून कल्पनेच्या साहाय्याने पात्र निर्माण करतो.ती निर्मिती प्रतिभासिक निर्मिती असते. तात्पर्य. प्रत्यक्षातल्या जीवनाचे कल्पनापूर्ण निर्मितीत परिवर्तन घडविण्याची क्रिया म्हणजे साहित्यनिर्मिती होय.

गोष्ट / कथा आणि लघुकथा
गोष्ट हा लोककथेचा एक प्रकार मानावा लागेल.निसर्ग घटकांच्या,माणसांच्या,प्राणांच्या जीवनातल्या घटनांच्या आधारे गोष्ट रचली जाते.गोष्टी या बहुदा रंजन वा उपदेश करणे या प्रेरणेतून निर्माण होतात.

जेव्हापासून मानवाला बोलण्याची कला अवगत झाली तेव्हापासून एकमेकांना गोष्टी सांगण्याची कला ही विकसित झाली.पूर्वी या गोष्टी प्राण्यांच्या(इसापनीती)वैगरे असत.नंतरच्या काळात  कथासंग्रह लोकजीवणाचा व लोकव्यवहाराच्या अनुभवावर आधारित अशा कथा एकमेकांना सांगण्यात येत असत.या कथांमध्ये सांगण्याचे कौशल्य, उत्कंठा,व आकर्षकपणा असे त्यामुळे कथा रंजक बनत असे आणि एकमेकांच्या कथा लोक आवडीने ऐकत असत.विकासाच्या ओघात हळूहळू लिपीचा शोध लागला त्यानंतर लिहिण्याची कथा अस्तित्वात आली.शिलालेख कोरले गेले ताम्रपट व भूर्ज पत्रावर लेखन केले गेले.त्यानंतर कागदाचा शोध लागला. त्यानंतर मुद्रण कलेचा शोध लागला.

मुद्रणकलेच्या शोधानंतर कथा लिखित स्वरूपात साकार झाली आणि वाङ्मय प्रकारात एक महत्त्वाचा प्रकार म्हणून लोकप्रिय ठरली.लघुकथेत मोजकी पात्रे,घटना,प्रसंग यांच्या आधारे जीवनाचे अंगदर्शन घडते.कल्पित माणसे,निसर्ग घटक ही लघुकथेतील पात्रे असतात.कवितेनंतर प्रचंड लोकप्रिय असलेला हा दुसरा साहित्य प्रकार आहे.
उत्तर लिहिले · 18/4/2022
कर्म · 121765
1

उत्तर लिहिले · 13/6/2022
कर्म · 53700
0

ललित साहित्याचे विविध प्रकार खालीलप्रमाणे:

  1. कथा/लघुकथा:

    कथा म्हणजे लेखकाने वर्णन केलेल्या घटना, पात्रे आणि स्थळांवर आधारित एक काल्पनिक आणि मनोरंजक रचना. यात साधारणपणे एक किंवा अनेक पात्रे,setting (घडण्याची जागा आणि वेळ), संघर्ष आणि climax (कथेतील सर्वाधिक उत्कंठावर्धक भाग) असतो.

    उदा: प्रसिद्ध कथाकार वा.पु. काळे यांच्या कथा.

  2. कादंबरी:

    कादंबरी म्हणजे विस्तृत कथा. यात अनेक पात्रे, घटना आणि स्थळांचे तपशीलवार वर्णन असते.

    उदा: रणजित देसाई यांची 'लक्ष्य भोक'.

  3. कविता:

    कविता म्हणजे लयबद्ध आणि भावनिक शब्दांचा वापर करून विचार आणि भावना व्यक्त करणे. कवितेत विविध रचना, छंद आणि अलंकार वापरले जातात.

    उदा: कुसुमाग्रजांच्या कविता.

  4. नाटक:

    नाटक म्हणजे संवाद आणि कृतीद्वारे कथा सादर करणे. हे रंगमंचावर सादर करण्यासाठी लिहिले जाते.

    उदा: विजय तेंडुलकर यांचे 'घाशीराम कोतवाल'.

  5. एकांकिका:

    एकांकिका हे नाटकाचे लघुरूप आहे, जे एका अंकात सादर केले जाते.

  6. स्फुटलेख:

    स्फुटलेख म्हणजे कोणत्याही विषयावरचे छोटे, वैयक्तिक विचार व्यक्त करणारे लेखन.

  7. वैयक्तिक निबंध/ ललित निबंध:

    निबंध म्हणजे एखाद्या विषयावरचे विचार, माहिती आणि विश्लेषण. ललित निबंधात लेखक वैयक्तिक शैलीत आणि भावना व्यक्त करतो.

  8. प्रवास वर्णन:

    प्रवास वर्णन म्हणजे लेखकाने केलेल्या प्रवासाचे अनुभव आणि निरीक्षणे. यात स्थळांची माहिती, संस्कृती आणि प्रवासातील घटनांचे वर्णन असते.

    उदा: पु.ल. देशपांडे यांचे 'पूर्वरंग'.

  9. आत्मचरित्र/चरित्र:

    आत्मचरित्र म्हणजे लेखकाने स्वतःच्या जीवनातील घटना आणि अनुभवांचे वर्णन करणे. चरित्र म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित लेखन.

    उदा: महात्मा गांधी यांचे 'माझे सत्याचे प्रयोग' (आत्मचरित्र).

  10. विनोदी साहित्य:

    विनोदी साहित्य म्हणजे लोकांना हसवण्यासाठी केलेले लेखन. यात विनोद, उपहास आणि मजेदार घटनांचे वर्णन असते.

    उदा: पु.ल. देशपांडे यांचे लेखन.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 860

Related Questions

एका गोगलगाईची तक्रार कुणी व का केली असावी?
रामायण हे महाकाव्य कोणत्या ऋषींनी रचले?
कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेचा परामर्श द्या?
लोककथांचे वाड्मयीन सौंदर्य विशद करा?
लोकसाहित्याची स्वरूप व व्याप्ती थोडक्यात स्पष्ट करा?
मराठी बालपुस्तकांचा इतिहास थोडक्यात स्पष्ट करा?
साहित्याचे प्रकार लिहा?