मराठी भाषा पत्र साहित्य

साने गुरुजींच्या सुंदर पत्राची वैशिष्ट्ये कोणती आहेत?

2 उत्तरे
2 answers

साने गुरुजींच्या सुंदर पत्राची वैशिष्ट्ये कोणती आहेत?

1

     
 

साने गुरुजींनी 10 जून 1949 ते 10 जून 1950 या वर्षभरात साधना साप्ताहिकातून 45 लेख ‘सुंदर पत्रे’ या सदरात लिहिली. ती पत्रे जरी त्यांनी आपली प्रिय पुतणी सुधाला उद्देशून लिहिली असली तरी, प्रत्यक्षात गुरुजींनी ही पत्रे महाराष्ट्रातील किशोरवयीन मुला-मुलींना समोर ठेवून लिहिली आहेत. त्यात हितगुज आहे, किशोरवयीन मुला-मुलींशी आणि स्वत:शीही. त्या पत्रांमधून गुरुजी आपले बालपण, अनुभवलेला परिसर, प्राणी व वनस्पतिसृष्टी आणि अर्थातच मानव्या विषयी व्यक्त होतात. त्यातील निवडक 20 सुंदर पत्रे आता ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर आली असून त्यांचे वाचन केले आहे मृदगंधा दीक्षित आणि सुहास पाटील यांनी. या पुस्तकातील हे 17 मिनिटांचे एक पत्र ऐका सुहास पाटील यांच्या आवाजात. सहा तासांचे हे संपूर्ण पुस्तक  वर ऐकता येईल, त्यासाठी  चे  आवश्यक आहे. 


सुंदर पत्रे' या पुस्तकातील पत्रांमधून गुरुजी आपले बालपण, अनुभवलेला परिसर, प्राणी व वनस्पतिसृष्टी आणि एकूणच निसर्गाविषयी व्यक्त होतात. आणि अर्थातच मानव्याविषयीही! तर 'श्यामची पत्रे' गुरुजींनी तेव्हा नव्यानेच सुरू झालेल्या सेवादलातील तरुणांना समोर ठेवून लिहिली आहेत. परंतु त्याला सर्व संदर्भ आहेत ते तेव्हाचा काँग्रेस पक्ष बळकट करण्याचे, समाजवाद प्रत्यक्षात आणण्याचे, जातीयवादी व धर्मांध शक्तींना दूर ठेवण्याचे, गांधीवाद व समाजवाद यातील दरी दूर करण्याचे.


उत्तर लिहिले · 16/4/2022
कर्म · 121765
0
साने गुरुजींच्या पत्राची वैशिष्ट्ये:
  • सरळ आणि सोपी भाषा: साने गुरुजींची भाषा अतिशय सोपी आहे. त्यामुळे त्यांचे विचार वाचकाला सहज समजतात.
  • भावपूर्ण: त्यांच्या पत्रांमध्ये भावना आणि प्रेमळता ओतप्रोत भरलेली असते. ते आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करतात.
  • प्रेरणादायी: गुरुजींचे पत्र वाचकाला चांगले काम करण्याची प्रेरणा देतात. ते सकारात्मक विचारtransmit करतात.
  • आत्मassessment: त्यांच्या पत्रातून ते स्वतःच्या कामाबद्दल आणि विचारांबद्दल आत्मassessment करतात.
  • जवळची वाटणारी भाषा: त्यांची भाषा वाचकाला खूप जवळची वाटते, जणू काही ते आपल्याशीच बोलत आहेत.
  • संदेश: त्यांच्या प्रत्येक पत्रातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो, जो जीवनात उपयोगी ठरतो.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5060

Related Questions

व्यापारी पत्रकाचा नमुना तयार?
तुम्ही वाचलेल्या जाहिरातीची माहिती तुमच्या मैत्रिणीला पत्र लिहून कशी कळवाल?
'पत्र' हा स्वकेंद्रित असा आत्माविष्कारात्मक वाङ्मय प्रकार आहे. सविस्तर लिहा?
पत्राचे साहित्यतत्व कोणते आहे?
आपल्या मित्राचे पत्र?
पत्रव्यवहारात द्वारे पाठवलेल्या पत्राला काय म्हणतात?
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून भांबुर्डे पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी महिलांची छेडछाड थांबवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.