फरक लग्न

लग्न करताना मुला-मुलीच्या वयात १०/१२ वर्षांचे अंतर असेल तर काय फरक पडतो?

2 उत्तरे
2 answers

लग्न करताना मुला-मुलीच्या वयात १०/१२ वर्षांचे अंतर असेल तर काय फरक पडतो?

3
लग्न ही पायरी प्रत्येकाच्या जीवनात येतेच. मात्र तुम्हाला माहीत आहे का लग्नासाठी मुलगा आणि मुलीच्या वयात किती अंतर असावे? अनेकदा आपण ऐकतो की नवरा मुलगा ५० वर्षांचा तर वधू २२ वर्षांची. वयात खूप अंतर असल्याने अनेकदा त्याचा परिणाम वैवाहिक जीवनावर होतो.





, वयात जितके अंतर जास्त तितके लग्न तुटण्याचे प्रमाण अधिक असते. जर मुलगा-मुलगीमध्ये वयाचे अंतर ५ वर्षांपर्यंत असेल तर विवाह मोडण्याचे प्रमाण १८ टक्क्यांनी वाढते. जर लग्न ठरलेल्या जोडप्यांमध्ये वयाचे अंतर १० वर्षे असेल तर लग्न मोडण्याची शक्यता ३९ टक्क्यांनी वाढते. 


जर मुलगा आणि मुलगी यांच्यात एक वर्ष आणि त्याहून कमी अंतर असेल लग्न मोडण्याची शक्यता फक्त ३ टक्के इतकी असते.


खाली सविस्तर दिले आहे वाचा.




****"**************"************************


​ 
वय नको, मन बघा!



वय हे आयुष्यात खूप महत्त्वाचं ठरतं असं मला वाटतं. एकंदरीत लहान मुलांना शाळेत घालण्यापासून ते अगदी त्याच्या लग्नापर्यंत सर्वच बाबतीत. साधारणतः प्रेमविवाहात वयाची आडकाठी आणली जात नाही. परंतु ठरवून केलेल्या लग्नामध्ये वय महत्त्वाची भूमिका बजावते. मला वाटतं, लग्न म्हणजे दोन मनांचं, जिवांचं, कुटुंबाचं सुंदर मिलन आहे. जिथे दोन मनं जुळतात तिथे वय जुळणं गरजेचं आहे असं मला तरी वाटत नाही. लग्नाच्या वेळेस वयातलं अंतर हे त्या जोडप्याच्या भविष्याचा विचार करून घेतलं जातं. पत्रिकांच्या जुळणाऱ्या गुणांपेक्षा दोन मनांचं, दोन विचारांचं जुळणं महत्त्वाचं असतं. नात्यांत असणारं प्रेम माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि जिथे प्रेम, सामंजस्य, आपुलकी असते तिथे वयाचं बंधन नसतं.

• 

शेअरिंग होत नाही
वयामध्ये थोडं-फार अंतर असेल तर बिघडत नाही. पण हे अंतर एका पिढीइतकं मोठं असू नये. कारण प्रेम हे आंधळे असते परंतु वयात जास्त अंतर असेल तर लग्न केल्यावर पुढे जाऊन जनरेशन गॅप जाणवू शकते. आचारविचारांतील फरकाचा त्रासही होऊ शकतो. आपल्या मनातलं शेअर करायला आपल्या वयाचीच व्यक्ती सर्वात जवळची वाटते. मग वयात खूप फरक असताना हे शेअरिंग कितपत होत असेल? काही वेळा वयात इतकं जास्त अंतर असेल, तर जेव्हा एक व्यक्ती वृद्धत्वाला येते तेव्हा दुसरी व्यक्ती त्यामानाने बऱ्यापैकी तरुण असल्याने उत्साहात असते. त्यामुळे जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षांचा भंग होऊ शकतो. दुसरं म्हणजे सेलिब्रिटींचं आयुष्य म्हणजे आदर्श असे काही जण मानतात. पण त्यांच्या आयुष्यावर एक नजर टाकली, तर ज्या सेलिब्रिटींच्या वयात पिढीइतके अंतर आहे त्यातील काही जणांचे पूर्वी लग्न होऊन घटस्फोटही झालेला आहे. काहींना तर मोठी मुलंही आहेत. अशा वेळी फक्त सेलेब्रिटींचं उदाहरण पुढे करून आकर्षणापोटी असलेल्या प्रेमाचं समर्थन करण्यापेक्षा अशा नात्याचा आपल्याला पुढे त्रास होणार नाही ना याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे.



सोबत हवी घट्ट
लग्न, प्रेमसंबंध, लग्नासाठीचं योग्य वय व जोडप्यामधली वयोमर्यादा या गोष्टी व्यक्तीगणिक बदलत जातात. लग्नासाठी 'योग्य वय' ही संकल्पना पिढीप्रमाणे, तसंच प्रत्येक व्यक्तीनुसार व त्या व्यक्तींच्या विचारानुसार बदलत असते. लग्न करताना जोडीदारांनी एकमेकांच्या विचारांना, तसंच त्याच्या भावनांना महत्त्व दिलं की वयोमर्यादा अथवा दोघांच्या वयांतलं अंतर हे फक्त आकडे उरतात. लग्नाच्या बेडीत अडकताना पैसा, वय, गुणदोष, पत्रिका जुळवणी या गोष्टींपेक्षा आपल्या आयुष्याच्या जोडीदारविषयी असलेलं प्रेम, आयुष्यभरासाठी साथ देण्याची तयारी, त्याची मानसिकता व त्याच्या मनाचा जास्त विचार केला पाहिजे असं मला वाटतं. वयातलं अंतर फार विचारात घेणं योग्य नाही. कारण एकमेकांची मनं जुळल्यानंतर वाढत जाणारं प्रेम हे या वयाच्या अंतराला नक्कीच कमी करतं. एकमेकांची घट्ट सोबत ही अनेक निरर्थक गोष्टींवर मात करते.



मनं जुळणं महत्त्वाचं
मुलगी एकदा वयात आली की, घरी लगेच स्थळ बघण्याची, लग्नाची चर्चा सुरू होते. प्रत्येकजण आपापल्या पिढीप्रमाणे वेगवेगळी मतं व्यक्त करतो. मग त्यांच्याच मताशी सहमत होऊन मुलांना आपल्या आई-वडिलांच्या आज्ञेचं पालन करावं लागतं. पण आताचा दृष्टिकोन मात्र बदलला आहे. मुलं अगोदर आपल्या करिअरचा विचार करतात. त्यासाठी खूप शिकून आधी आपलं भविष्य उज्ज्वल करतात. हे सर्व करेपर्यंत त्यांचं वय हे २४-२५ च्या घरात जातं. त्यामुळे घरचे पूर्णपणे याला विरोध करतात. मुळात लग्न करताना वय हा मुद्दा महत्त्वाचा नसतोच. तेव्हा महत्त्वाचं असतं ते दोघांची मनं जुळून येणं. त्यासाठी पत्रिकांचे जुळणारे गुण महत्त्वाचे नसतात. जरी दोघांच्या वयात खूप फरक असला तरी आपण त्याकडे लक्ष न देता त्या दोघांमधील प्रेम, त्यांचं करिअर याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. लोकांचं असं म्हणणं असतं की, वयामध्ये खूप अंतर असलेल्या जोडप्याचं लग्न यशस्वी होऊ शकत नाही. पण कधी-कधी मात्र असंही होतं की, दोघांचं योग्य वय असूनही, पत्रिका जुळूनही जोडप्याचं लग्न अयशस्वी होतं. म्हणूनच आई-वडिलांनी लग्नासाठी मुलांवर जबरदस्ती करू नये. कारण लग्नासाठी वय हा मुद्दा महत्त्वाचा नसतो. कुणी प्रेमात असेल आणि त्यांच्या वयात जास्त अंतर असलं तरी त्यांची मनं जुळलेली असतात हे अधिक महत्त्वाचं आहे.



मनापासून…इच्छेनं
लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण असतो. लग्न झाल्यावर या नव्या नात्याला सुरुवात होते आणि आयुष्यातल्या एका नव्या टप्प्यात पती-पत्नीचा प्रवेश होतो. लग्नं जुळवली जातात, काही प्रेमविवाह करतात. सध्या प्रेमविवाहांचं प्रमाण वाढतं आहे. हल्ली तर वयात बरंच अंतर असलेली जोडपीसुद्धा लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. मुळात लग्नासारख्या पवित्र गोष्टीला जात, धर्म, वंश, रंग, वय यांचं बंधन नसावं. जर दोन व्यक्तींची मनं एकमेकांशी जुळत असतील आणि त्या दोघांचं मनापासून एकमेकांवर प्रेम असेल तर वय, वंश आणि इतर गोष्टींचा विचार करण्याची गरजच नाही. लग्न हा आयुष्याला नवीन रंग देणारा क्षण असतो. ज्या दोन व्यक्तींचं लग्न होणार असतं त्या व्यक्तींचे विचार, त्यांचं सुख हे घटक महत्त्वाचे असतात. वयात अंतर असलेली अनेक जोडपी आज सुखाने संसार करत आहेत. लग्न हे मनापासून आणि इच्छेप्रमाणे झालं तर निश्चितच ते यशस्वी ठरतं. त्यामुळे वय, रंग, धर्म, जात या गोष्टींना अतिमहत्त्व देण्याची गरज नाही.



तीच योग्य वेळ
‘अभ्यासाविना दिलेल्या परीक्षेच्या निकालाची खात्री देता येत नाही’ ही विवाहासाठी अगदी योग्य उपमा आहे. लग्न हे कुणी आणि कधी करायचं, हा त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न आहे. आजची युवा पिढी ही करिअरस्टीक झाल्यामुळे सर्वांचाच कल शिक्षणाकडे वाढत चालला आहे. लग्न काय असतं हे समजणं आणि ती जबाबदारी घेण्याची मानसिक, शारीरिक आणि आणि आर्थिक तयारी असणं हे मुलासाठी किंवा मुलीसाठी अत्यंत गरजेचं असतं. हीच लग्न करण्याची योग्य वेळ असते. विवाह निश्चित करताना प्रगल्भता महत्त्वाची आहेच. मुलगा-मुलगीमध्ये किती वर्षांचं अंतर आहे, हे देखील पाहणं आवश्यक आहे. कारण जर वर आणि वधू यांच्यात प्रमाणापेक्षा जास्त अंतर असेल तर त्यांच्या विचारात दरी निर्माण होते. भविष्यात ही दरी त्यांच्या नात्यामधल्या प्रेमाचा ओलावा कमी करत असते. प्रत्येकजण एका 'परफेक्ट लाइफ पार्टनर'च्या शोधात असतो. मात्र तो शोधत असताना स्वत:मध्ये व समोरच्या व्यक्तीमध्ये प्रगल्भता असणं फार गरजेचं आहे. विवाह झाल्यानंतर काही दिवसांतच घटस्फोट होण्यामागचं ते एक महत्त्वाचं कारण असू शकतं. यासाठीच एकमेकांवर विश्वास व दोघेही समजूतदार असायला हवेत. असं झालं तरच लग्न यशस्वी ठरू शकते.



प्रेम-विश्वास हवा
पूर्वी आपल्या देशात बालविवाहाची प्रथा सुरू होती. काही काळानंतर ही प्रथा बंद झाली. पण अजूनही काही ठिकाणी हे पाहायला मिळतंच. ज्या वयात मुलींना शिक्षणाची खरी गरज असते त्या वयात त्यांना प्रपंच, संसार सांभाळायला लागतो. मुलगी जेव्हा शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हाच तिचं लग्न करून दिलं पाहिजे. कारण आजही आपल्या समाजात स्त्रीला नेहमी कमी लेखलं जातं. लग्न करताना योग्य ते वयाचं अंतर असावं, पण वयाबरोबर प्रेम आणि विश्वास खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा दोन मनं जुळतात तेव्हा अशा नातेसंबंधांत कोणतीही बाधा येत नाही. लग्न हे प्रेम आणि विश्वासावर टिकून राहतं. आपण वेगवेगळे चित्रपट बघतो. त्यामध्ये हिरो-हिरोइन जसं वागतात तसं आपण वागायला बघतो. पण आपलं आयुष्य खरं आहे हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. प्रेम म्हणजे हातात हात घालून फिरणं, गुलाबाचं फुल देणं किंवा एकत्र कॉफी पिणं नव्हे. तर प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं, नेहमी एकमेकांना सुखदुःखात साथ देणं होय. माझ्या मते वयातलं अंतर लक्षात घेऊन मगच नातेसंबंध जुळवायला पाहिजेत. यातून दोघांची मतं जुळतात आणि हे नातं आयुष्यभरासाठी टिकून राहतं.



विचारात तफावत असते
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे. लग्नाच्या अतूट बंधनात अडकताना जोडीदाराची योग्य निवड करणं गरजेचं आहे. प्रेमाच्या दुनियेत वावरणाऱ्या आणि प्रेमाच्या बेडीत अडकलेल्या दुनियेला वयाचं भानच राहिलेलं नाही. प्रेमात जरी मनं जुळलेली असली, तरी एकमेकांच्या विचारात फार तफावत असू शकते. नात्यात प्रेम असणं महत्वाचं आहे. पण करिअर देखील तितकंच महत्त्वाचं आहेच. दोघांच्या पत्रिकेतले जुळणारे गुणसुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पुढच्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात. हे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ नयेत म्हणून या सर्व गोष्टींचा सुरुवातीलाच विचार करून, विचारपूर्वक निर्णय घेतले गेले पाहिजेत. एकमेकांच्या वयामध्ये खूप अंतर असणाऱ्या जोडप्यांचं लग्न यशस्वी होत असतील असं मला वाटत नाही. कारण त्या दोघांमध्ये वादाचे प्रसंग घडण्याचे प्रकार व असे अनेक प्रॉब्लेम निर्माण होण्याची शक्यता असते.



मनं जुळावी, वय नव्हे
वय हे आयुष्यात खूप महत्त्वाचं ठरतं असं मला वाटतं. एकंदरीत लहान मुलांना शाळेत घालण्यापासून ते अगदी त्याच्या लग्नापर्यंत सर्वच बाबतीत. साधारणतः प्रेमविवाहात वयाची आडकाठी आणली जात नाही. परंतु ठरवून केलेल्या लग्नामध्ये वय महत्त्वाची भूमिका बजावते. मला वाटतं, लग्न म्हणजे दोन मनांचं, जिवांचं, कुटुंबाचं सुंदर मिलन आहे. जिथे दोन मनं जुळतात तिथे वय जुळणं गरजेचं आहे असं मला तरी अजिबात वाटत नाही. लग्नाच्या वेळेस वयातलं अंतर हे त्या जोडप्याच्या भविष्याचा विचार करून घेतलं जातं. पत्रिकांच्या जुळणाऱ्या गुणांपेक्षा दोन मनांचं, दोन विचारांचं जुळणं खूप महत्त्वाचं असतं. नात्यांत असणारं प्रेम माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं जिथे प्रेम, सामंजस्य, आपुलकी असते तिथे वयाचं बंधन नसतं.



सामंजस्याला प्राधान्य
लग्न करताना वयामध्ये तफावत किंचित असावी. कारण ही गोष्ट विचारांमध्येही तफावत निर्माण करते. लग्न हा निर्णय विचार करून घ्यावा लागतो. कारण हा विचार म्हणजे दोन मनांचं मिलन आहे. इथे वयाच्या अटीपेक्षा दोघांमधल्या विचारांत सामंजस्य असणं महत्त्वाचं असावं. पत्रिकेतले गुण कितीही जुळले तरीही दोघांनी गुण-दोषांसकट एकमेकांना जाणून घेणं आयुष्यात महत्त्वाचं ठरतं. प्रेमाला ना कोणतं बंधन आहे ना कसली अट. इथे वयापेक्षा भावना आणि जोडीदाराबद्दल असलेल्या विश्वासालाच जास्त महत्त्व आहे. वयाची अट ही निश्चितपणे फक्त ठरवून होणाऱ्या लग्नामध्ये लागू होते. सगळ्याशी जुळवून घेण्याची तुमची मानसिकता असली तर तुमच्या नातेसंबंधांत कसलीही दरी निर्माण होणार नाही. जर ही वैचारिक दरी खोल असेल, तर इथे तुमच्या वयामधलं अंतर स्वाभाविकपणे कमी असणं गरजेचं आहे. समंजसपणा असला तर ही नाती आयुष्यभर टिकतात. फक्त अविश्वासाची भावना निर्माण झाली तर नात्यातली दरी खोल होत जाते तीही घटस्फोटापर्यंत.

-

चांगली-वाईट…दोन्ही बाजू


लग्न म्हटलं की मुलांच्या आई-बाबांवर एक मोठी जबाबदारीच असते. प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न हे योग्य वयात व्हावं. जोडीदार चांगला मिळावा. परंतु आजच्या नवीन पिढीमध्ये तरुण-तरुणी हे पसंतीनुसार आपला जोडीदार निवडत आहेत. कुणाची मनं सोशल साईट्सवर जुळतात तर कुणी वेबसाइट्सवर आपला जोडीदार शोधत असतो. हा निर्णय घेत असताना मात्र ते काही गोष्टींकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. पूर्वी समाजात मुलीचं वय १८ होण्याआधीच तिचं लग्न केलं जायचं. कारण पूर्वी शिक्षणाला तेवढं महत्त्व नव्हतं. मुली सासरी जाऊन घरकामच करणार या विचारानं तिला जास्त शिक्षण न देऊन तिचं लग्न केलं जायचं. परंतु आता कायद्यानंच मुलीचं आणि मुलाचं लग्नाचं वय ठरवून दिलं आहे. पण इतक्या या वयात लग्न करायचं म्हटलं तर करिअरकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. लग्नानंतर करिअर म्हटलं तरी हे प्रत्येक मुलींसाठी नक्कीच तारेवरची कसरत असते. नाण्याला जशा दोन बाजू आहेत तशाच या विषयालासुद्धा दोन बाजू आहेत. चांगली आणि वाईट. जर मुलगा व मुलगी यांच्यामध्ये वयातला फरक जास्त असेल तर त्यांच्या विचारांमध्ये फरक होतो. त्यामुळे भविष्यात त्यांना अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. दुसरी बाजू म्हणजे दोघांमधला वयाचा फरक जास्त असूनही चांगली टिकलेली नाती आज आपण बघतोय यामागचं कारण म्हणजे दोघांमध्ये असलेला समजूतदारपणा. नात्यामध्ये समजूतदारपणा आणि प्रगल्भता असणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण जर तेच नसेल तर वयामध्ये कमी फरक असलेलं नातंसुद्धा जास्त काळ टिकणं अवघड होऊ शकतं. त्यामुळे तरुणाईनं सगळ्या दृष्टिकोनातून आपल्या सुखी जीवनाचा विचार करून आपल्या जीवनातल्या या महत्त्वाच्या टप्प्यावरील हा निर्णय घ्यावा. जेणेकरून दोघांनाही पुढच्या आयुष्यात अडचण निर्माण होणार नाही.




स्वभावगुण जुळावेत

लग्नाच्या बेडीत अडकताना आजकाल काय तर पूर्वीपासून वयाचा विचार केला जातो. ज्या व्यक्तीशी आपलं लग्न होणार आहे तो आपल्यासाठी कितपत योग्य आहे हे एका बायोडाटा म्हणजे कागदावरच्या माहितीवरून ठरवलं जातं. ती माहिती बघूनच नंतर जोडीदाराची भेट करून दिली जाते. हा प्रकार मुळात फार चुकीचा आहे. हे कुठेतरी थांबायला हवं. आजकाल प्रेम करताना पण वय बघितलं जात नाही. मान्य आहे की प्रेम हे कधी आणि कोणासोबत होईल ते सांगता येणार नाही, पण निदान थोडी वयोमर्यादा पाळायला हवी, असं मला वाटतं. लग्न म्हणजे दोन जीवांचे विचार आणि मन जुळणं फार महत्त्वाचं आहे. तेच जर जुळलं नाही तर संसार कसा होईल. लग्न करताना पत्रिकेतील गुण बघण्यापेक्षा स्वभाव गुण किती जुळतायेत ते बघायला हवं.


उत्तर लिहिले · 14/3/2022
कर्म · 121765
0

लग्न करताना मुला-मुलीच्या वयात 10/12 वर्षांचे अंतर असल्यास काही फरक पडू शकतात, जे खालीलप्रमाणे आहेत:

1. सामाजिक दृष्टीकोन (Social Perspective):

  • समाजाचा दृष्टिकोन: काही समाजांमध्ये वयातील जास्त अंतर स्वीकारले जात नाही. लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ शकतात आणि नकारात्मक प्रतिक्रिया येऊ शकतात.
  • समवयस्कांशी तुलना: दोघांच्या मित्र-मैत्रिणींमध्ये आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये वयाचे अंतर जाणवू शकते, ज्यामुळे सामाजिक संबंधांमध्ये काही अडचणी येऊ शकतात.

2. भावनिक आणि मानसिक जुळcomponent (Emotional and Mental Compatibility):

  • विचार आणि समजूतदारपणा: दोघांच्या विचारसरणीत आणि समजूतदारपणात फरक असू शकतो, कारण दोघांनी वेगवेगळ्या पिढ्या पाहिल्या आहेत.
  • गरजा आणि अपेक्षा: आयुष्यातील गरजा आणि अपेक्षांमध्ये बदल येऊ शकतात. एकाला स्थिर जीवन हवे असेल, तर दुसर्‍याला आणखी काहीतरी नवीन करण्याची इच्छा असू शकते.

3. शारीरिक आणि आरोग्य विषयक (Physical and Health Related):

  • शारीरिक क्षमता: दोघांच्या शारीरिक क्षमतेत फरक असू शकतो. एकाला जास्त ऊर्जा आणि उत्साह असेल, तर दुसर्‍याला आरामाची गरज भासू शकते.
  • आरोग्याच्या समस्या: वाढत्या वयानुसार आरोग्याच्या समस्या येतात, ज्यामुळे दोघांच्या जीवनशैलीत बदल होऊ शकतात.

4. जीवनशैली आणि प्राधान्यक्रम (Lifestyle and Priorities):

  • आवडीनिवडी: दोघांच्या आवडीनिवडींमध्ये फरक असू शकतो. करमणूक, छंद आणि सामाजिक Car्यांमध्ये दोघांच्या अपेक्षा वेगवेगळ्या असू शकतात.
  • ध्येय आणि महत्त्वकांक्षा: दोघांच्या ध्येयांमध्ये आणि महत्त्वकांक्षांमध्ये फरक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नात्यात काही प्रमाणात तणाव निर्माण होऊ शकतो.

5. लैंगिक जीवन (Sexual Life):

  • लैंगिक गरजा: दोघांच्या लैंगिक गरजांमध्ये फरक असू शकतो, ज्यामुळे दोघांनाही समजूतदारपणे तोडगा काढण्याची आवश्यकता असते.

सकारात्मक दृष्टीकोन:

  • अनुभव आणि मार्गदर्शन: जास्त वय असलेल्या व्यक्तीच्या अनुभवाचा फायदाRelationship जोडीदाराला होऊ शकतो.
  • समजूतदारपणा आणि सहनशीलता: Relationship टिकवण्यासाठी समजूतदारपणा आणि सहनशीलता महत्त्वाची आहे, जी दोघांमध्ये असणे आवश्यक आहे.

टीप: हे सर्व मुद्दे सर्वसाधारण आहेत आणि प्रत्येक Relationship व्यक्तीनुसार बदलू शकते. दोन व्यक्ती एकमेकांना किती समजून घेतात आणि त्यांच्यात किती प्रेम आहे, यावर गोष्टी अवलंबून असतात.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 960

Related Questions

माझं लग्न ठरलं आहे आणि माझं अरेंज मॅरेज आहे. मी कधी मुलीशी जास्त बोललो नाही, मग मी माझ्या होणाऱ्या बायकोसोबत बोलण्याची सुरुवात कशी करावी?
माणसाने लग्न कधी केले पाहिजे?
मुलगीचा घटस्फोट झालेला आहे आणि मी सिंगल आहे, तर लग्न केले तर काही अडचणी येतील का?
मुलीसोबत १३ गुण मिळत असतील तर लग्न करावे कि करू नये?
माझ्या वहिनीच्या भावाच्या भाचीशी लग्न केलं तर चालेल का? माझं तिच्यावर प्रेम आहे आणि ती पण माझ्यावर प्रेम करते. पण आमच्या दोघांच्या वयातील फरक सात वर्षांचा आहे. मी काय करावं, मला काही कळत नाहीये?
एक मुलगी मला आवडत होती, ५ वर्षांआधी ती १२ वी मध्ये होती, म्हणून वाटले १-२ वर्षांनी मागणी पाठवू. पण तिने त्याच वेळेस एका मुलासोबत पळून जाऊन लग्न केले, १ वर्ष राहिली तिथे, तो मारायचा वगैरे म्हणून घटस्फोट झाला. आता तिच्यासोबत संपर्क झाला आहे, आणि ती आवडते, प्रेम आहे, तर मी लग्न केले तर चालेल का?
प्रिया तेंडुलकर यांनी 'लग्न' या कथेत कशाचे महत्त्व सांगितले आहे ते लिहा?