2 उत्तरे
2
answers
शिवाजी महाराजांनी मुरुंब देवाच्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला?
0
Answer link
नीरा-वेळवंडी नद्यांच्या खोऱ्यात मुरुंबदेवाचा डोंगर आहे. या डोंगरावरचा किल्ला म्हणून बहामनी राजवटीत राजगडास पूर्वी मुरुंबदेव असे नाव होते. मुरुंबदेव चौकी काही काळ निजामशाही तर काही काळ आदिलशाहीच्या आधिपत्याखाली होती. मावळ प्रांतात राज्यविस्तार करण्यासाठी तोरणा आणि मुरुंबदेव हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. इ.स. १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले राजकीय केंद्र होते. परंतु राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी रायगडावर नेली.
0
Answer link
शिवाजी महाराजांनी मुरुंब देवाच्या डोंगरावर राजगड किल्ला बांधला.
राजगड:
- राजगड हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये आहे.
- हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या राजवटीची राजधानी होता.
- राजगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व खूप मोठे आहे.
अधिक माहितीसाठी, आपण येथे भेट देऊ शकता:
विकिपीडिया - राजगड