नोकरी अर्ज राजीनामा अर्ज

नोकरी/काम सोडण्याचा अर्ज कसा करावा?

2 उत्तरे
2 answers

नोकरी/काम सोडण्याचा अर्ज कसा करावा?

4


नोकरी सोडण्याची अनेक कारणे असू शकतात, घर ते काम अंतर जास्त असणे, वेतन कमी व अनियमित मिळणे. व्यवस्थापक व सहकारी कर्मचाऱ्यांशी वाद निर्माण होणे किंवा आजारपण अशी अनेक कारणे नोकरी सोडण्यासाठी जबाबदार असू शकतात.

 नमुना मराठी.
वाढत्या बेरोजगारीमुळे सध्याच्या काळात नोकरी मिळणे कठीण बनले आहे. त्यामुळे नोकरी मिळवण्यापासून ते नोकरी टिकवण्यापर्यंत ही एक मोठी कसरतच असते. नोकरी करत असताना आपल्याला जादा काम, ऑफिस मध्ये जास्त वेळ थांबावे लागणे, सहकाऱ्यांशी वाद, बॉसची कटकट अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते पण नोकरी टिकवण्यासाठी ते सर्व सहन करावे लागते.

नोकरी एक व्यवसायाप्रमाणेच उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. दैनंदिन जीवनातल्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी काही लोकांना नोकरी करणे भाग पडते, आणि काही वेळा वेतन कमी व अनियमित मिळत असले तरी नोकरी करणे भाग पडते.


 
 नोकरी सोडण्याबाबत राजीनामा अर्ज/पत्र संबंधित मॅनेजरला कसे लिहिले जावे याविषयी माहिती दिली आहे.

Resignation Letter I
नमूना पत्र १:

सुरेश कुमार,                                   

संस्कृती अपार्टमेंट,                                

पुणे 30 31 12. 

                                  

माननीय व्यवस्थापक,                           

आयटी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड,                                     

पुणे 30 31 12.                                    

विषय: नोकरी सोडणे बाबत राजीनामा पत्र

माननीय महोदय,

मी सुरेश प्रेम कुमार आपल्या कंपनीत कॉम्प्युटर ऑपरेटर या पदावर कार्यरत असून काही वैयक्तिक कारणांमुळे मला कामावर हजर राहता येणार नाही, त्यामुळे मी दिनांक 10/1/2021 रोजी कॉम्प्युटर ऑपरेटर या पदाचा राजीनामा देत आहे. आपण मला आपल्या कंपनीत काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. कॉम्प्युटर ऑपरेटर या पदावर काम करत असताना अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या तसेच मॅनेजर साहेबांचे व सहकारी कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे आपल्या सर्वांचा मी खूप आभारी आहे, आपण दिलेल्या संधीमुळे माझ्या वैयक्तिक जीवनात तसेच व्यावसायिक जीवनात खूप प्रगती झाली आहे. आपल्या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन माझ्या आयुष्यात एक नवा आदर्श बनेल असे मला वाटते.  

धन्यवाद,

आपला नम्र

सुरेशकुमार




उत्तर लिहिले · 24/11/2021
कर्म · 121765
0

नोकरी सोडण्याचा अर्ज (Resignation Letter) कसा करावा यासाठी काही मार्गदर्शन:

अर्ज करण्याची पद्धत:
  • कंपनीचे नियम तपासा: तुमच्या कंपनीचे राजीनामा देण्यासाठी काही विशिष्ट नियम आहेत का, जसे नोटीस पिरीयड (notice period) किती दिवसांचा आहे, अर्ज कोणाला सादर करायचा आहे, हे तपासा.
  • लिखित स्वरूपात अर्ज: अर्ज नेहमी लिखित स्वरूपात (written format) सादर करा. ईमेलद्वारे किंवा छापील प्रत (printed copy) जमा करा.
  • नोटीस पिरीयड: तुमच्या नोकरी करारात (job contract) नमूद केलेल्या नोटीस पिरीयडचे पालन करा. सामान्यतः, १ महिना ते ३ महिन्यांचा नोटीस पिरीयड असतो.
अर्जाचा नमुना:

आपण खालीलप्रमाणे अर्ज करू शकता:

विषय: राजीनामा अर्ज

आदरणीय [तुमच्या बॉसचे नाव],

मी तुम्हाला कळवू इच्छितो/इच्छिते की मी माझ्या [पदाचे नाव] पदाचा राजीनामा देत आहे. मी [तारीख] पासून कंपनीमध्ये काम करत आहे आणि माझ्या कारकिर्दीत मला खूप काही शिकायला मिळालं, त्याबद्दल मी आभारी आहे.

माझ्या राजीनाम्याचा नोटीस पिरीयड [तारीख] रोजी संपेल. कृपया माझा राजीनामा स्वीकार करावा.

मी कंपनीच्या नियमांनुसार, माझा कार्यभार (workload) व्यवस्थित सोपवून देईन आणि कंपनीला माझ्याकडून अपेक्षित असलेले सर्व सहकार्य करेन.

तुमच्या सहकार्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मी तुमचा आभारी आहे.

धन्यवाद!

आपला नम्र,
[तुमचे नाव]
[दिनांक]

टीप:
  • आपण आपल्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार अर्जात बदल करू शकता.
  • अर्ज सादर केल्यानंतर, त्याची एक प्रत आपल्याकडे ठेवा.
ॲक्युरसी:
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

राजीनामा अशा लिहायचा?