2 उत्तरे
2
answers
विंदा करंदीकर यांना समीक्षा कशी असावी असे वाटते?
1
Answer link
गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा.
करंदीकर'(जन्मः २३ ऑगस्ट १९१८ - मृत्यूः १४ मार्च २०१०) हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला.[१] वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले.

गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर'(जन्मः २३ ऑगस्ट १९१८ - मृत्यूः १४ मार्च २०१०) हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला.[१] वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले.
गोविंद विनायक करंदीकर
जन्म नाव
गोविंद विनायक करंदीकर
टोपणनाव
विंदा, विंदा करंदीकर
जन्म
ऑगस्ट २३, १९१८
[धालवली ], सिंधुदुर्ग
मृत्य
राष्ट्रीयत्व
भारतीय
कार्यक्षेत्र
कवी, समीक्षक
साहित्य प्रकार
कविता, बालसाहित्य, अनुवादित साहित्य, समीक्षण,विरूपिका
विषय
मराठी
प्रसिद्ध साहित्यकृती
अष्टदर्शने, स्वेदगंगा
वडील
विनायक हरी करंदीकर
पत्नी
सुमा गोविंद करंदीकर (कु .कुसुम दामले )
अपत्ये
आनंद (नंदू ) , उदय , सौ .जयश्री काळे
पुरस्कार
ज्ञानपीठ पुरस्कार, कबीर सन्मान,
जनस्थान पुरस्कार, कोणार्क सन्मान
कौटुंबिक
विंदाचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयं संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. केवळ लेखन करण्यासाठी, इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली.
विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर या लेखिका होत्या. त्यांना एक मुलगी सौ .जयश्री विश्वास काळे आणि आनंद आणि उदय असे दोन मुलगे आहेत.
ज्ञानपीठ पुरस्कार
विंदांना इ.स. २००३ साली बेचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. [२] त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्द केली होती. या रकमेच्या व्याजातून दरवर्षी ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे अन्य भाषेतून मराठीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाला पुरस्कार द्यावा असे त्यांनी सुचविले होते.[३]
विंदांचे समग्र वाङ्मय
विंदांनी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली, मराठी बालकवितेची मुहूर्तमेढ रोवली. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचतील असे पाहिले. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला.
काव्यसंग्रह
सहित्यकृती प्रकाशनवर्ष साहित्यकृती प्रकाशनवर्ष
धृपद इ.स. १९५९ जातक इ.स. १९६८
विरूपिका इ.स. १९८१ अष्टदर्शने इ.स. २००३) (या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार)
स्वेदगंगा इ.स. १९४९ मृद्गंध इ.स. १९५४
संकलित काव्यसंग्रह संपादन करा
आदिमाया (इ.स. १९९०) (संपादन - विजया राजाध्यक्ष)
विंदा करंदीकर यांची समग्र कविता (पॉप्युलर प्रकाशन, २०१५, प्रस्तावना - वसंत पाटणकर, किंमत १००० रुपये)
संहिता (इ.स. १९७५) (संपादन - मंगेश पाडगावकर)
विंदांवरील पुस्तके संपादन करा
इरावती कर्वे आणि विंदा करंदीकर (संपादित, संपादिका : डाॅ. पुष्पलता राजापुरे-तापस)
विंदांची कविता (डाॅ. रमेश धोंगडे)
विंदा करंदीकरांची कविता : स्वरूप आणि समीक्षा (डाॅ. शैलेश त्रिभुवन)
ञानपीठ त्रिमूर्ती (अनिल बळेल)
ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्म दर्शने (प्रा.मधु पाटील)
बालकविता संग्रह संपादन करा
साहित्यकृती प्रकाशनवर्ष साहित्यकृती प्रकाशनवर्ष
अजबखाना इ.स. १९७४ पिशीमावशी आणि तिची भुतावळ इ.स. १९८१
अडम तडम इ.स. १९८५ बागुलबोवा इ.स. १९९३
एकदा काय झाले इ.स. १९६१ राणीची बाग इ.स. १९६१
एटू लोकांचा देश इ.स. १९६३ सर्कसवाला इ.स. १९७५
टॉप इ.स. १९९३ सशाचे कान इ.स. १९६३
परी गं परी इ.स. १९६५ सात एके सात इ.स. १९९३
ललित निबंध संपादन करा
आकाशाचा अर्थ (इ.स. १९६५)
करंदीकरांचे समग्र लघुनिबंध (इ.स. १९९६)
स्पर्शाची पालवी (इ.स. १९५८)
समीक्षा संपादन करा
उद्गार (इ.स. १९९६)
परंपरा आणि नवता (इ.स. १९६७)
इंग्रजी समीक्षा संपादन करा
अ क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज (इ.स. १९९७)
लिटरेचर अॅज अ व्हायटल आर्ट (इ.स. १९९१)
अनुवाद संपादन करा
अॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र (इ.स. १९५७)
फाउस्ट (भाग १) (इ.स. १९६५)
राजा लिअर (इ.स. १९७४) (मूळ लेखक- विल्यम शेक्सपियर) : २३ एप्रिल २०१६ रोजी कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात येथे 'राजा लिअर' नाटकाचा प्रारंभाचा प्रयोग होणार झाला. नंतरही ठाणे, मुंबई येथे प्रयोग होत गेले. नाटकाचे दिग्दर्शन डॉ. शरद भुथाडिया यांचे आहे.
अर्वाचीनीकरण संपादन करा
संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचे अर्वाचीन मराठीत रूपांतर (इ.स. १९८१)
पुरस्कार आणि पदवी
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार
कवितांविषयी
विंदांच्या शब्दात
विंदांविषयी मान्यवरांचे विचार
विनायक करंदीकर उर्फ ‘विंदा करंदीकर'(जन्मः २३ ऑगस्ट १९१८ – मृत्यूः १४ मार्च २०१०) हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले.
समग्र वाङ्मय
काव्यसंग्रह : धृपद; जातक; विरूपिका; अष्टदर्शने; स्वेदगंगा; मृद्गंध
संकलित काव्यसंग्रह : आदिमाया (इ.स. १९९०) (संपादन – विजया राजाध्यक्ष); विंदा करंदीकर यांची समग्र कविता; संहिता (इ.स. १९७५) (संपादन – मंगेश पाडगावकर)
बालकविता संग्रह : अजबखाना; पिशीमावशी आणि तिची भुतावळ; अडम तडम; बागुलबोवा; एकदा काय झाले; राणीची बाग; एटू लोकांचा देश; सर्कसवाला; टॉप; सशाचे कान; परी गं परी; सात एके सात
0
Answer link
विंदा करंदीकर यांना समीक्षा कशी असावी याबद्दलचे विचार:
- समीक्षेची भूमिका: समीक्षेची भूमिका केवळ गुणदोषांचे विश्लेषण न करता, साहित्यकृतीचा अर्थ उलगडून दाखवणारी असावी. समीक्षकाने तटस्थपणे आणि वस्तुनिष्ठपणे साहित्यकृतीकडे पाहावे.
- समग्र दृष्टीकोन: समीक्षकाने साहित्यकृतीला एका विशिष्ट चौकटीत न पाहता, ती कोणत्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भात निर्माण झाली आहे, हे लक्षात घ्यावे.
- सर्जनशीलतेचा आदर: समीक्षकाने लेखकाच्या सर्जनशीलतेचा आदर करावा. केवळ टीका न करता, लेखकाने काय साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे, हे समजून घ्यावे.
- भाषा आणि शैलीचे महत्त्व: समीक्षकाने साहित्यकृतीतील भाषेचा आणि शैलीचा विचार करावा. भाषेच्या माध्यमातून लेखक कसा अर्थ निर्माण करतो, हे स्पष्ट करावे.
- समीक्षेची भाषा: समीक्षेची भाषा सोपी आणि स्पष्ट असावी, क्लिष्ट आणि दुर्बोध नसावी. सामान्य वाचकालाही समीक्षा समजावी.
विंदा करंदीकर यांच्या दृष्टीने समीक्षा ही साहित्यकृतीला समजून घेण्याची आणि तिचा आस्वाद घेण्याची एक प्रक्रिया आहे. त्यामुळे समीक्षकाने पूर्वग्रहदूषित न होता, खुल्या मनाने साहित्यकृतीचा स्वीकार करावा, असे त्यांचे मत होते.