संचित म्हणजे काय?
2 उत्तरे
2
answers
संचित म्हणजे काय?
0
Answer link
१. संचित (हा जन्म व पुर्वजन्म) मानायचे का. नसेल तर वर वर्णन केलेली टोकाची परिस्थिती उपभोगण्याला कारणे कोणती. २. जे आस्तिक आहेत त्यांचे काय मत आहे (व काय उत्तर आहे ह्या टोकाच्या परिस्थितीवर).
३. जे धर्म पुर्वजन्म मानत नाहीत (क्रिस्त धर्म) त्यांचे काय उत्तर असेल.
४. अशी टोकाची परिस्थिती काहीच का उपभोगतात म्हणजे हे जर रँडमली (मराठी पर्यायी शब्द) होत असेल तर त्यांनाच का उपभोगायला लागते इतरांना का नाही. लॉटरी समजण्या सारखे सोपे आहे का इत्यादी.
५. शास्त्रीय समर्पक उत्तर आहे का ह्याला - की काहीच लोकांना का भोगायला लागतात हे भोग.
काही शब्दांच्या परिभाषा दिल्या आहेत.
संचित – मनुष्याने आजच्या क्षणा पर्यंत केलेले सर्व कर्म (त्या कर्मांच्या परिणामांचा साठा). त्याचे दोन भाग प्रारब्ध आणि अनारब्धकार्य.
प्रारब्ध (किंवा प्रारब्धकार्य) – संचितापैकी जेवढ्या कर्माची फळे भोगण्यास सुरवात झाली त्याला म्हणतात.
अनारब्धकार्य – ज्या कर्माची फळे भोगायला अद्याप सुरवात झाली नाहीत त्याला म्हणतात.
लेखनविषय: धर्म मनोरंजन विरंगुळा सामाजिक दुवे:
Comments
पुर्वजन्म व पुनर्जन्म
शिपाईगडी [18 Dec 2010 रोजी 07:38 वा.]
पुर्वजन्म व पुनर्जन्म असे काहिही नसते, आपल्याला मिळालेला जन्म हा पहिला आणि शेवटचा आहे.
शिपाईगडी
झेंड
आपले म्हणणे मला पटते पण ते आपण केवळ नास्तिक द्वेषातून लिह्ल्यासारखे वाटते, माझे उत्तर आहे कि होय संचित आहे पण त्यास ठोस पुरावा नाही, केवळ श्रद्धा आहे निखळ तर्क नाही.
आपली हि स्थिती नसल्यास खालील प्रश्नांची उत्तर आपण देऊ शकाल काय ?
हा क्याच आहे -
१. प्रारब्ध आहे तर कर्म करायची स्वतंत्रता कशी असेल?
२. आणि कर्म करू शकत नाही तर भोग का भोगू?
३. कर्म करण्यास स्वतंत्र असेल आणि भोगात पारतंत्र्य आहे तर कर्म स्वतंत्रपणे कसे करू ?
---------------------
३. भोग हे कर्मा चे परिणाम आहेत. अलिप्तपणे कर्म करण्याने भोग उत्पन्न होत नाहीत (कर्म विपाक होतो). पण असलेले भोग हे भोगायलाच लागतात व कर्म त्या मध्येच करावे लागते.
२. नाही ठरवले तरी होत राहते. आपण श्वास घेतो, सकाळ चे विधी करतो हे ही कर्मात मोडले जाते. जिवंत आहोत तो पर्यंत कर्म सुटत नाही. कसे करायचे ते आपल्या हातात असते.
१. प्रारब्ध नेहमीच आपल्या स्थितीवर परीणाम (इन्फ्लुअंस) करत असते. पण आपला आत्मा व बुद्धी (सदसदविवेक) च्या सहाय्याने कर्म करावे लागते व असे करावे की ज्याने त्याचा कर्म विपाक होत राहील.
मग प्रारब्ध (वाईट ह्या अर्थी) असेल तर अलिप्तपणे कर्म करायची बुद्धी झाली नाही तर कर्म विपाक न होता अजून प्रारब्ध निर्माण होणार.
मग कायमच त्या चक्रात अडकणार, मग अलिप्तपणे कर्म करायचे स्वात्यंत्र कुठे आहे?
>>पण आपला आत्मा व बुद्धी (सदसदविवेक)
एका उदाहरणाप्रमाणे दुर्धर रोग घेऊन एका चोराच्या घरी गरीब परिस्थितीत जन्मास आलेल्या माणसाने सदसदविवेक बुद्धी कशी कामास लावावी? त्याचे प्रारब्ध त्याला अशा प्रकारचे अलिप्त काम करण्याचे स्वात्यंत्र देते का?
का ?
धक्का [19 Dec 2010 रोजी 05:26 वा.]
मी जरी "प्रारब्ध" वगैरे माननार्या गटातील नसलो तरीही आपल्या प्रश्नाची उत्तरे देतो.
१. प्रारब्ध आहे तर कर्म करायची स्वतंत्रता कशी असेल?
> प्रारब्ध म्हणजे काय २४X७ चालू असणारी गोष्ट नव्हे. तुमच्यावर २४X७ संकटे येणार नाहीत. आले तरी ते १२X३०X२४X७ राहणार नाहीत.
तुम्हाला कार्य करण्याची मुभा असणार आहेच. तुम्ही कर्म करायला मोकळे आहात.
तसेच तुम्हाला प्रारब्धामधुन जो काही इतर वेळ मिळत असतो त्यात तुम्ही कर्म करा.
२. आणि कर्म करू शकत नाही तर भोग का भोगू?
> तेच.
३. कर्म करण्यास स्वतंत्र असेल आणि भोगात पारतंत्र्य आहे तर कर्म स्वतंत्रपणे कसे करू ?
>तेच.
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
:) नाही
आजूनकोणमी [19 Dec 2010 रोजी 06:00 वा.]
>>प्रारब्ध म्हणजे काय २४X७ चालू असणारी गोष्ट नव्हे.
प्रत्येक क्षणी प्रारब्ध लागू आहे हे गृहीतक आहे... :)
>>तुम्हाला कार्य करण्याची मुभा असणार आहेच
आभासी मुभा आहे असा मुद्दा आहे, प्रारब्ध नुसार बुद्धी होते, व त्याप्रमाणे कर्म घडते. मुभा नाही.
प्रत्येक क्षणी ?
धक्का [19 Dec 2010 रोजी 08:22 वा.]
>> प्रत्येक क्षणी प्रारब्ध लागू आहे हे गृहीतक आहे... :)
असे कोण म्हणले ?
मला मान्य आहे की आपण श्वास नेहमी घेतो.. पण दोन श्वासांमधे थोडा अवधी हा असतोच.
इथे प्रारब्धाला श्वासाची तुल्ना द्या.
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
भ्रामक कल्पना
चंद्रशेखर [18 Dec 2010 रोजी 09:59 वा.]
प्रारब्ध, संचित, कर्म, आस्तिक, नास्तिक, देव, परमेश्वर या सारख्या अनेक कल्पना माणसाने आपण इतर प्राणीमात्रांपेक्षा निराळे आहोत आणि जगाच्या उद्धारासाठी आपला जन्म झाला आहे असल्या भ्रामक समजुतींच्या पोटी निर्माण केलेल्या आहेत. जीवशास्त्रानुसार मुंगीचा जन्म, मृत्यू व माणसाचा जन्म किंवा मृत्यू यात काहीही फरक नाही.
कर्मसिद्धांत
प्रारब्धाची गोष्ट वेगळी आहे. मनुष्यांना आपल्या कर्माची उचित फळे (सत्कर्माची गोड फळे आणि दुष्कर्माची कटू फळे) भोगावी लागतात. या मताला कर्मसिद्धांत हे नाव आहे. कर्माचे एकूण तीन वर्गात कर्मसिद्धांतानुसार वर्गीकरण केले जाते - क्रियमाण, प्रारब्ध व संचित. क्रियमाण म्हणजे आपण करीत असलेली कर्मे. यांचा संचय होत असतो आणि तो पूर्वीच्या संचित कर्मामध्ये जमा होतो. संचित कर्मापैकी काहींची फळे भोगण्याकरिता वर्तमान जन्म मनुष्याला प्राप्त झालेला असतो. त्यांना प्रारब्ध कर्मे म्हणतात. भविष्यात केव्हा काय होईल हे आपण कर्म केल्याबरोबर निश्चित होते असे प्रारब्धवादात म्हटले जाते. आपल्याला गोड फळे हवी असतील तर आपण सत्कर्मे करावी म्हणजे झाले.
य़ा मतात अडचण एवढीच आहे की सत्कर्म कोणते व दुष्कर्म कोणते हे सांगणे कठिण आहे. ते आपल्या धर्मग्रंथातून कळू शकेल असे कोणी म्हणेल. परंतु धर्मही बदलत असतो, त्यात सुधारणा होत असते.एके काळी ब्राह्मणानी मांसाहार करणे दुष्कर्म नव्हते पण आता ते निषिद्ध मानले जाते. दुसरे म्हणजे कोणत्या कर्माला कोणती फळे मिळाली आहे हे आपल्याला कधीच कळू शकत नाही. त्याचे एक कारण म्हणजे पूर्व जन्मातील फळे या जन्मी भोगावी लागतात. परंतु आपण कोणती कर्म केली याचे स्मरण कोणालाही नसते. या कारणामुळे प्रारब्धवाद ही एक असत्य उपपत्ती आहे असेच म्हणावे लागते.
-दि य देशपांडे
(विवेकवाद)
पूर्व जन्मातील फळे
पूर्व जन्मातील कर्मानुसार आपले आयुष्य जाणार. त्यात फेरफेर करण्याचा आपल्याला हक्कच नाही. हा जन्म सुखी कसा होईल हे पाहण्यापेक्षा, या जन्म-मरणाच्या (कधीही कुणीही सिद्ध न केलेल्या) फेर्यातून सुटका कशी होईल ते पाहणे आणि त्या करता सर्वात सोपा मार्ग म्हणजे परमेश्वराची भक्ती. ती आयुष्यभर करत राहणे, गतजन्मीचे भोग तक्रार न करता भोगत राहणे हीच आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता असे ज्या समाजातील धुरिण मानतात तो समाज अल्पावधीतच जगात शून्य क्रमांकावर पोचणार हे नक्की!
रूढीची बंधने तोडून टाकणारे (शूद्र जातीतील) तरुण जेव्हा आम्ही गावकीची घाणेरडी कामे करणार नाही असे बजावत, तेव्हा त्याच्या घरचे वृद्ध लोकच 'अरे आपल्या पूर्व जन्मीची पापे आहेत ही, त्याचे भोग भोगायला पाहिजेत' अशी त्यांची समजूत घालत असत. अब्राहम लिंकनने यादवी युद्ध जिंकून गुलामगिरीची प्रथा नष्ट करणारा कायदा केला तरी शेकडो गुलाम 'आम्हाला नको स्वातंत्र्य, आम्ही गुलामगिरीतच सुखी आहोत' असे म्हणत होते. तसा हा प्रकार आहे. अशा राष्ट्राची कशी प्रगती होणार?
-डॉ. शरद अभ्यंकर
(जरा शहाणे होऊ)
प्रतिसाद
प्रियाली [19 Dec 2010 रोजी 12:58 वा.]
प्रतिसाद आवडला.
पूर्वजन्म, पुनर्जन्म, संचित, प्रारब्ध वगैरे आहेत की नाही हे माहित नाही, त्यामुळे ते नाही असे मानून चालले तरी या संज्ञांनी स्वतःचा स्वार्थ साधून दुसर्यांना दोषी ठरवण्यात बराच हातभार लावला आहे.
+१
नितिन थत्ते [24 Dec 2010 रोजी 02:27 वा.]
>>स्वतःचा स्वार्थ साधून दुसर्यांना दोषी ठरवण्यात
असेच म्हणतो.
ज्यांच्यापाशी आहे ते (संचितामुळे) असण्याचे अधिकारी आहेत तेव्हा तक्रार करू नका असे सांगण्यासाठीची (उठावाची कल्पना मारून टाकण्याची) थिअरी आहे.
नितिन थत्ते
का चांगले काम निरपेक्ष करा म्हणजे संचित साठणार नाही.
रणजित चितळे [24 Dec 2010 रोजी 06:45 वा.]
संचित ही एक थीअरी (संकल्पना, सिद्धांत ..) आहे. आपल्या कडे ही कल्पना फार पुर्वी पासुन आहे तरी सुद्धा उठाव होतच राहीले आहेत. लोकमान्य टिळक सुद्धा स्वराज्या साठी लढले. ते ही संकल्पना मानत होते. संचिताचा आड घेउन स्वराज्या ची कल्पना धुतकारली नाही.
लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्ये (पान २४४) ह्या विषयावर खुप खोलवर विचार व टिपणी केली आहे. आपण वाचावी ही विनंती.
मी, कोंबड्या आणि म वा.]
मी खाल्लेल्या कोंबड्या आणि मासे भुते बनून किंवा त्यांचे पुनर्जन्म झाले तर मला सतावतील की काय अशी शंका मला वाटते खरी. ;-)
:)
आजूनकोणमी [18 Dec 2010 रोजी 17:53 वा.]
तांत्रिक रित्या बघितल्यास आपण माणसाचे देखील मास खाऊ शकतो, मुद्दा असा कि प्रत्येकाचा ब्रेक पॉइंट ठरलेला आहे. :)
आणि अगदीच तुम्हाला उत्तर द्यायचे तर, तुम्हाला कोणीच त्रास देत नाहीत का? सगळच आनंदी आनंद आहे का? मग हे त्रास देणारे कोण हा विचार करा , कदाचित हेच ते मासे आणि कोंबड्या असतील :प मला झाडे आणि फळे त्रास देतात :)
त्रास
प्रियाली [19 Dec 2010 रोजी 00:37 वा.]
तुम्हाला कोणीच त्रास देत नाहीत का? सगळच आनंदी आनंद आहे का? मग हे त्रास देणारे कोण हा विचार करा , कदाचित हेच ते मासे आणि कोंबड्या असतील :प
तसा मला कोणी त्रास देत नाही कारण सर्वांना त्रास देण्याचे कंत्राट माझ्याकडे आहे. ;-) पण त्रास होतच नाही असे नाही तेव्हा मला त्रास देणारे कोंबडे आणि मासे यांच्याबद्दल सहानुभुती वाटते. पकपकपकाक!
मला झाडे आणि फळे त्रास देतात :)
अरे हो की! मी त्यांना कशी विसरले. आज येतील झाडे-फळे स्वप्नात घाबरवायला असे वाटते. ;-)
:प
आजूनकोणमी [19 Dec 2010 रोजी 06:02 वा.]
>>आज येतील झाडे-फळे स्वप्नात घाबरवायला असे वाटते
आली होती का? :)
मोक्ष मिळाला
प्रियाली [19 Dec 2010 रोजी 12:18 वा.]
आली होती का? :)
नाही त्यांना मोक्ष मिळाला असावा. ;-)
पण काल श्रद्धा-अंधश्रद्धेशी निगडित स्वप्न पडले होते. उपक्रमाची कृपा! ते इथे अस्थानी असल्याने देत नाही. :P
बरे झाले...सुटले बिचारे :प
आजूनकोणमी [19 Dec 2010 रोजी 15:12 वा.]
:) वाह. खरडवही आहेच, किवा "स्वप्नांचा अर्थ" असा नवीन धागा काढा, जोरात चालेल :P...ह. घ्या. :)
उत्तरे
१. संचित (हा जन्म व पुर्वजन्म) मानायचे का. नसेल तर वर वर्णन केलेली टोकाची परिस्थिती उपभोगण्याला कारणे कोणती.
नाही, कारणे नाहीत. (कशालाच कारण नसते असे दाखवून देणारे/मानणारे इथे आहेत.)
२. जे आस्तिक आहेत त्यांचे काय मत आहे (व काय उत्तर आहे ह्या टोकाच्या परिस्थितीवर).
त्यांचे मत त्यांनी द्यावे. विविधांगानी दिलेले आढळेल.
३. जे धर्म पुर्वजन्म मानत नाहीत (क्रिस्त धर्म) त्यांचे काय उत्तर असेल.
त्यांचे उत्तर मी द्यावे अशी अपेक्षा नसावी. पण त्यांची उत्तरे त्यांच्या ग्रंथांत मिळत
0
Answer link
संचित म्हणजे साठवणे किंवा जमा करणे. हे अनेक संदर्भांमध्ये वापरले जाते:
सामान्य अर्थ:
- जतन करणे: एखाद्या गोष्टीचा साठा करणे, जसे की माहिती, वस्तू किंवा ऊर्जा.
- जमा करणे: हळूहळू वाढवणे किंवा एकत्र करणे, जसे की पैसे, अनुभव किंवा ज्ञान.
विशिष्ट अर्थ:
- अर्थशास्त्र: साठवलेली संपत्ती, नफा किंवा भांडवल.
- मानसशास्त्र: भूतकाळातील अनुभव आणि आठवणी ज्या वर्तमानावर परिणाम करतात.
- संगणक विज्ञान: डेटा साठवण्यासाठी वापरली जाणारी मेमरी.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
- विकिपीडिया: संचय - विकिपीडिया
हे स्पष्टीकरण आपल्याला मदत करेल अशी आशा आहे.