2 उत्तरे
2
answers
अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द काय?
0
Answer link
अमृत म्हणजे काय?
अमृत हे देव-दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून निर्माण झालेले शेवटचे रत्न आहे. देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठीच समुद्र मंथन केले होते अशी पुराणांमध्ये नोंद आहे. अमृत हे असे पेय आहे की जे प्यायलानंतर अमरत्व प्राप्त होते. भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप घेऊन ते दानवांकडून मोठ्या चलाखीने काढून घेऊन देवांकडे दिले अशी आख्यायिका आ अमृत व्याख्या
अमृत—न. १ देवलोकींचें पेय (यानें वृद्धावस्था किंवा मृत्यु येत नाहीं); समुद्रमंथनांत निघालेल्या चौदा रत्नांपैकीं १४ वें; सुधा; पीयूष; सुधारस. 'जोडे अमृताची सुरसरी । तैं प्राणांतें अमर करी ।' -ज्ञा १७.२१९. २ दूध आटवून त्यांत खडीसाखर, जायफळ, वेलदोडे वगेरै पदार्थ घालून रात्रीं थंडींत उघड्यावर ठेवून दुसऱ्या दिवशीं प्रातःकाळीं तें दूध घुसळून त्यावर फेंस येतो तो. ३ मरणापासून मुक्तता, सुटका; मोक्ष. 'जिणें गरळ पाजिलें अमृत पाजिलें तीस तां ।' -केका ९१. ४ उदक; (ल.) देवाचें चरणतीर्थ. ५ ब्रह्म. 'अमृत म्हणजे अविनाशी ब्रह्म हा अर्थ उघड असून' -गीर ३५८. ६ दूध. 'सर्प पोसूनिया दुधाचाहि नाश । केलें थीता विष अमृताचें ।' -तुगा ३०७३. 'अमृता चवी यावलागून । साकर घालून पहावी ।' 'अमृतें तरिच मरिजे । जरी विखेंसीं सेविजे ।' -ज्ञा २.२२४. ७ पंचमहायज्ञ करून जें अन्न शिल्लक राहतें तें किंवा यज्ञशेष अन्न. -गीर २८८.८ (उत्तरहिंदुस्थान) पेरू; जांब. [तुल॰ फा. अमरूद] ९ शीख पंथांतील एक संस्कार-एका मोठ्या भांड्यांत पाण व साखर घालून तें मंत्र म्हणत किरपाणानें ढवळतात व मग तें प्राशन करावयास देतात. सामाशब्द-ज्ञानामृत, गीतामृत, अधरामृत. म्ह॰ १ अमृताचें जेवण मुताचें आंचवण = भव्य व चांगला आरंभ केला असून त्याचा शेवट क्षुद्रपणानें किंवा कमीपणानें झाला असतां योजितात. २ पासला पाडून अमृत पाजणें = बळजबरीनें एखाद्यास त्याच्या कल्या- णाच्या किंवा हिताच्या मार्गास लावणें. ३ अमृत देणाऱ्यास (तें चाख- ण्यास) जीभ दे असें सांगणें लागत नाहीं. 'अमृतप्रदा म्हणावें न लगे रसना मुखांत दे खाया.' -मोआश्रम ५.११. ४ अमृत सेवन करुनहि मरण येतें = एकाद्याच्या दुदैंवानें त्याला अमृत मिळालें तरी मृत्यु (हानि) येतो. 'अमृत सेवितांचि पावला मृत्य राहो । (राहू).' -दा १.१.२५. [सं. अमृत]. -वि. अमर; मरणाधीन नसलेला; मृत्युपासून सुटका झालेला. [सं.] ॰कर-पु. चंद्र. [सं.] ॰कळा- स्त्री. १ गाल; गालफाड. २ घशांतल्या गांठी (टॉन्सिल) 'येकांच्या बैसल्या अमृतकळा. -दा ३.५.४. म्ह॰ अमृतकळा बसणें = मृत्यूचा काळ जवळ येणें. 'अ॰ बसल्या आतां वाचणें कठिण.' ३ 'चंद्राची सत- रावी कळा' -ज्ञा १२.७. ॰कुंड-न. स्वर्गांतील अमृत भरलेलें पात्र- भांडें. ॰कुंडली-स्त्री. वाजविण्याचें एक चर्मवाद्य. ॰घटका, घडी- वेळ पहा. ॰घुटका-घुटिका-पु. १ अमृताचा घोट. २ मजे- दार गोष्टींचा चुटका. ३ छोटीशी व सुंदर गाण्याची चीज. ॰झोप-स्त्री. पहाटेची साखरझोंप. ॰धारा स्त्री. एक वृत्त. ॰ध्वनि-पु. एक छंद, वृत्त. ॰पाक-पु. रव्याच्या एका प्रकारच्या वड्या. ॰पान-प्राशन- न. अमृत पिणें; अमृतसेवन; अमृतघुटका; (ल.) विष पिणें-खाणें 'खुरशेट मोदी यानें अमृतप्राशन केलें.' ॰पी-प्राशी-वि. अमृत पिणारा. ॰फळ-न. १ जें फळ खाल्लें असतां मनुष्य अमर होतो तें. एक काल्पनिक फळ. राजा भर्तृहरीला असें फळ मिळालें होतें. २ पेरू, आंबा, द्राक्ष, बेदाणा, खिसमिस वगैरे. ३ एक पक्कान्न;मोदक. 'कीं देवाचिये सन्निधी अमृतफळें । पावतें जाली.' -ऋ ८२. 'निंबें नारिंगें नारेळे । अपूप लाडू अमृतफळें.' -एरुस्व ६.८६. 'तिळवे लाडू अमृतफळें' -वसा २६. ॰मंथन-न. अमृतासाठीं देव व दैत्य यांनीं केलेलें समुद्राचें मंथन, घुसळणें. 'एऱ्हवीं अमृतमंथना । सारिखें होईल अर्जुना ।' -ज्ञा १८.१४८२. ॰महाल-स्त्री. म्हैसूर राज्यांतील या नांवाच्या महालांतील बैलांची एक जात. 'खिलारी, अ॰ व कृष्णा- कांठ या जातीचे बैल तयार करणें.' -के १८.७.३१. ॰वर्षाव पु. अमृताचा पाऊस, त्यावरून चांगल्या व संतोषकारक गोष्टींचा किंवा पदार्थांचा वर्षाव किंवा देणगी; समृद्धि. ॰वल्ली-स्त्री. १ जिच्यामुळें अमरत्व प्राप्त होतें अशी एक काल्पनिक वेल. २ (ल.) भांग. ३ अमरवेल; गुळवेल. ॰वेळ-स्त्री. १ तीस घटकांपैकीं एक शुभ काल. एकंदर दिनमानाचे व रात्रिमानाचे ८ भाग धरून मुख्यतः आठ वेळा कल्पिल्या आहेत. ३ ।।। घटका हें यांचें मध्यम प्रमाण आहे. दिन- मानाप्रमाणें त्यांचा काल कमीजास्त होतो (वेळ पहा). 'अमृत- वेळ प्रसंगज्ञान । कैसें तें ऐकावें ।' -दा ४.१.२०. २ करमणूक; विलास व उपभोग यांची योग्य वेळ. ३ औषध देण्याची योग्य वेळ (सकाळ). ४ शांत, खुषींत असण्याचा-स्नेहभावाचा काल. ॰संजीवनी-स्त्री. १ मृतास जीवंत करणारी विद्या; मृतसंजीवनीचा पर्याय. २ अमृत. ३ (ल.) अद्वैतबोधरूपी अमृत. 'ते नमस्करूं अमृत संजीवनी । श्री देववाणी ।' -ऋ १.४ चंद्राची अमृत झिरपणारी १७ वी कळा.
शब्द जे अमृत शी जुळतात
अनुमृत · ओष्ठामृत · चंद्रामृत · जीमृत · मृ
शब्द जे अमृत सारखे सुरू होतात
अमुक · अमुक्ताभरण · अमुत्र · अमुप · अमुर्पिका · अमूप · अमूपार · अमूर्त · अमूल्य · अमूस · अमृता · अमृती · अमृतोपम · अमृत्यु · अमेज · अमेध्य · अमेय · अमोघ · अमोज · अमो
शब्द ज्यांचा अमृत सारखा शेवट होतो
अंगीकृत · अकृत · अधिकृत · अध्याहृत · अनादृत · अनावृत · अनृत · अपंचीकृत · अपसृत · अप्रकृत · अलंकृत · अवभृत · अविकृत · अव्याकृत · असंस्कृत · आदृत · आविष्कृत · आवृत · आहृत · उदहृत
«