प्रवास सामान्य ज्ञान विमान जग

जगातील सर्वात मोठे विमानतळ आणि सर्वात जुने वर्तमानपत्र कोणते?

2 उत्तरे
2 answers

जगातील सर्वात मोठे विमानतळ आणि सर्वात जुने वर्तमानपत्र कोणते?

4
1. किंग फहाद इंटरनॅशनल एअरपोर्ट, सौदी अरेबिया
2. देन्वेर इंटरनॅशनल एअरपोर्ट, यूएस 
3. डल्लास इंटरनॅशनल एअरपोर्ट, यूएस, टेक्सास 
4. शांघाय पुडाँग इंटरनॅशनल एअरपोर्ट, शांघाय 5. चार्ल्स द गॉल एअरपोर्ट, फ्रान्स 

प्रसारमाध्यमे प्रगत झाली असली तरीही वर्तमानपत्र वाचल्याशिवाय अनेकांची सकाळ उगवत नाही. बातमीची विश्वासार्हता वर्तमानपत्रांनी आजही टिकवून ठेवली आहे. मुद्रित शास्त्राचा शोध लागला आणि वर्तमानपत्र, नियतकालिके, साप्ताहिके छापली जाऊ लागली. भारतात वृत्तपत्र व्यवसायाला 18 व्या शतकात सुरुवात झाली. पण, 17 व्या शतकात जगातील पहिले वृत्तपत्र छापले गेले होते हे फार कमी लोकांना ठावूक आहे. 1605 साली जर्मनमधून रिलेशन (Relation aller Fürnemmen und gedenckwürdigen Historien) हे पहिले जर्मन भाषिक वृत्तपत्र जॉन कॅरलॉस यांनी सुरू केले .
जगातील पहिले वर्तमानपत्र कोणते या विषयावर अनेक मतमतांतरे आहेत. मात्र वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर या जागतिक संस्थेने रिलेशन हेच पहिले वर्तमानपत्र म्हणून घोषित केले आहे. 1605 साली जॉन कॅरलॉस यांनी हे छापील वर्तमानपत्र छापले. मात्र या वर्तमानपत्राचे फारसे पुरावे उपलब्ध नसल्याने याची गणना प्रथम वर्तमानपत्र म्हणून करण्यात आली नव्हती. जर्मनीमधील मेन्झ गुटेनबर्ग या शहरांत जगातील पहिल्या प्रिटिंग प्रेसचं कार्यालय आहे. या कार्यालयात रिलेशन या वर्तमानपत्राचे पुरावे होते. हे पुरावे त्यांना जर्मनमधीलच स्ट्रासबर्ग येथे सापडले, जेथून रिलेशन या वर्तमानपत्राची सुरुवात झाली होती. हे पुरावे वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपरमध्ये सादर केल्याने त्यांनी रिलेशन या वर्तमानपत्राला प्रथम वर्तमानपत्र म्हणून घोषित केले.
उत्तर लिहिले · 26/5/2021
कर्म · 650
0

जगातील सर्वात मोठे विमानतळ सौदी अरेबियामधील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळ (King Fahd International Airport) आहे.

या विमानतळाचे क्षेत्रफळ 776 चौरस किलोमीटर (300 चौरस मैल) आहे.

स्रोत: arabnews.com

जगातील सर्वात जुने वर्तमानपत्र हे जर्मनीमधील "Relation aller Fürnemmen und gedenckwürdigen Historien" आहे.

हे वर्तमानपत्र 1605 मध्ये सुरू झाले.

स्रोत: Wikipedia

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1040

Related Questions

या जगात सर्वात मोठे काय आहे?
सर्वांची नावे सांगा?
जगातील सर्वात उंच मिनार कोणते?
जगात एकूण देश व त्यांची नावे सांगा?
ची निर्मिती कशी झाली?
नेपोलियन बोनापार्टने कोणत्या देशाला निद्रिस्त ड्रॅगन म्हणून संबोधले?
ब्राझील देशाच्या बोधचिन्हा विषयी माहिती मिळेल का?