अक्कलकोट संस्थान बद्दल माहिती सांगा?

2 उत्तरे
2 answers

अक्कलकोट संस्थान बद्दल माहिती सांगा?

6
🔹 अक्कलकोट संस्थान 🔹
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव
_________________________
अक्कलकोट हे सोलापूर पासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. अक्कलकोट हे अठराव्या शतकापासून अस्तित्वात असलेले स्वतंत्र संस्थान होते.
फतेहसिंह भोसले हे संस्थानाचे पहिले अधिपती होते. हे संस्थान डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या आधिपत्याखाली होते.
संस्थान ४९८ चौरस मैलांत पसरलेले होते. संस्थानाची सीमा हैदराबाद संस्थान व बॉम्बे प्रेसिडेन्सीला लागून होती.
इतिहास :: सोळाव्या व सतराव्या शतकांत विजापूरअहमदनगर येथील मुसलमान सत्ताधीशांत अक्कलकोट प्रदेशाबद्दल तंटे चालू असत. विजापूरच्या बादशहाने शहाजींना हा प्रदेश जहागीर म्हणून दिला होता. पुढे १६८७ च्या सुमारास औरंगजेबाने हा प्रदेश जिंकला. १६९९मध्ये त्याने शाहूच्या लग्नप्रसंगी त्याना जहागीर म्हणून अक्कलकोट परगणा दिला होता. दौलताबादच्या पारद गावचा पाटील शहाजी लोखंडे हा मोगलांतर्फे लढत असता शाहूकडून एका चकमकीत मारला गेला. तेव्हा त्याच्या विधवेने आपला मुलगा राणोजी यास शाहूच्या पायावर घातले. शाहूने या मुलाचा सांभाळ करण्याचे अभिवचन देऊन त्यास अक्कलकोट परगण्याची जहागिरी दिली व त्याचे नाव फत्तेसिंग ठेवले. हेच या संस्थानाचे संस्थापक होय. यांनी शाहूबरोबर अनेक लढायांत भाग घेतला. या घराण्यातील पाचवा राजा दुसरा शहाजी ( १८२८-१८५७) यांचा काळ धामधुमीचा गेला. १८२८मध्ये हा लहान असल्यामुळे या संस्थानचा कारभार साताऱ्याचे प्रतापसिंह पहात असे. १८३० मध्ये बोरगावच्या शंकरराव सरदेशमुखाच्या नेतृत्वाखाली रयतेने बंड केले. रयतेच्या प्रतापसिंहाविरुद्धच्या तक्रारी रास्त असल्याचा निर्णय घेऊन इंग्रजांनी संस्थानचा कारभार प्रतापसिंहाकडून काढून इंग्रज रीजंटाकडे सोपविला.
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव
_________________________


​इ.स. १७०८मध्ये राणोजी लोखंडे याला पहिल्या छत्रपती शाहूंनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव फतेहसिंह भोसले झाले. इ.स. १८४८ पर्यंत अक्कलकोट सातारा संस्थानचा एक भाग होते. जेव्हा साताऱ्याच्या शाहूंना ब्रिटिश सरकारने राज्यभ्रष्ट केले, तेव्हापासून अक्कलकोटला स्वतंत्र संस्थानाचा दर्जा मिळाला. त्यानंतर, स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत अक्कलकोट मध्ये कोणतीही राजकीय घटना घडली नाही.  संस्थातले स्थैर्य आणि संस्थानिकाचा शिवाजी महाराजांच्या घराण्याशी असलेला संबंध बघून अक्कलकोटच्या भोसले घराण्याचे अनेक मराठा सरदार घराण्यांशी नातेसंबंध जुळले.
🔹अक्कलकोटचे प्रमुख संस्थानिक 🔹
१७०७-१७६०- फतेहसिंहराजे भोंसले
१७६०-१७८९ - शहाजी (बाळासाहेबराजे) भोसले
१७८९-१८२२ - दुसरे फतेहसिंह (अप्पासाहेबराजे) भोंसले
१८२२-२३ - मलोजी (बाबासाहेब) भोसले
१८२३-१८५७ - दुसरा शिवाजी (अप्पासाहेबराजे) भोसले
१८५७-१८७० - दुसरे मालोजी (बुबासाहेब) भोसले
१८७०-१८९६ - तिसरा शिवाजी (बाबासाहेबराजे) भोसले
१८९५-१९२३- कॅप्टन फतेहसिंह(तिसरे) भोसले
१९२३-१९५२ - विजयसंहराव भोसले
१९५२-१९६५ - जयसिंहराव भोसले
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरातच वल्लभभाई पटेलांनी अक्कलकोट संस्थान भारतात विलीन केले आणि मुंबई इलाख्यात दाखल केले.त्या अगोदर  अक्कलकोट संस्थानाने विलीनीकरणास नकार दिला होता. श्री. रत्नाप्पा कुंभार त्यांनी तेथे सत्याग्रह सुरू केला. परिणामी हे संस्थान १९४८ मध्ये त्या वेळच्या मुंबई प्रांतात विलीन करण्यात आले. या  भाषावार प्रांतरचना झाल्यावर अक्कलकोट आणि त्याचा सातारा जिल्हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला.
या घराण्यातील श्रीमती निर्मलाराजे भोसले या १९५२ पासून मुंबई विधानसभेच्या सदस्य, १९५६ ते १९६० पर्यंत शिक्षण खात्याच्या उपमंत्री आणि १९६२ ते १९६५ पर्यंत महाराष्ट्र राज्याच्या समाजकल्याण खात्याच्या मंत्री होत्या.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=998953370502586&id=100011637976439
अक्कलकोट शहराची ख्याती सबंध महाराष्ट्रभर आणि देशभर पसरली ती म्हणजे दत्तावतारी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचेमुळे. श्री स्वामी समर्थाचा हा अवतार श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे कारकीर्दीत झाला. श्रीमंत मालोजीराजे भोसले हे स्वामी भक्त होते. अक्कलकोट मधील २२ वर्षांच्या वास्तव्यात श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेक चमत्कार करून यांची महती सर्व महाराष्ट्रभर पसरली. श्री. स्वामी समर्थाच्या या पावननगरी मध्ये अन्नछत्र असावे ही कल्पना सन्मा. जन्मेजय भोसले महाराजांनी उचलुन धरली व २९ जुलै १९८८ श्री गुरुपोर्णिमेच्या मुहूर्तावर हे अन्नछत्र सुरु झाले.

0
अक्कलकोट संस्थान हे भारतातील एक मराठा शासित संस्थान होते. हे राज्य सध्याच्या महाराष्ट्र राज्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थित होते.

इतिहास:

  • अक्कलकोट संस्थानाची स्थापना 1708 मध्ये झाली.
  • या संस्थानावर भोसले घराण्यातील मराठा शासकांचे राज्य होते.
  • अक्कलकोटचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा दावा करतात.
  • 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर, अक्कलकोट संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले.

प्रशासन:

  • अक्कलकोट संस्थानाचे प्रशासन राजे स्वतः करत असत.
  • राज्याच्या प्रशासनात मदत करण्यासाठी दिवाण आणि इतर अधिकारी असत.
  • संस्थानाचे अनेक महालांमध्ये विभाजन केले गेले होते, ज्यांचे प्रमुख देशमुख असत.

संस्कृती:

  • अक्कलकोट संस्थान हे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जात होते.
  • अक्कलकोट स्वामी समर्थांचे निवासस्थान असल्यामुळे हे शहर प्रसिद्ध आहे.
  • येथे अनेक प्राचीन मंदिरे आणि धार्मिक स्थळे आहेत.

अर्थव्यवस्था:

  • अक्कलकोट संस्थानाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित होती.
  • या संस्थानात कापूस, ज्वारी, बाजरी आणि तेलबियांसारखी पिके घेतली जात होती.
  • अक्कलकोटमध्ये वस्त्रोद्योग आणि इतर लघुउद्योग देखील विकसित झाले होते.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 860