2 उत्तरे
2
answers
अभिनेत्री अलका इनामदार यांच्याबद्दल माहिती सांगा?
3
Answer link
लक्ष्या बेर्डेची आई : अलका इनामदार
http://bit.ly/2Qqe1ve
___________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव
___________________________
मराठी चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे असेल तर त्याच्या आईची भूमिका अलका इनामदार असणार हे समीकरण अनेक चित्रपटांमध्ये दिसले.काहीजणाना तर अलका इनामदार यांच लक्ष्याच्या खरया आई आहेत असे वाटत असे.

विनोदीपट असो वा सामाजिक चित्रपट असो त्यांनी अनेक भुमिका जीव तोडून केल्या आहेत.त्यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.पण त्यांना खाष्ट सासु कधीच रंगविता आली नाही.कारण त्यांचा तो स्वभावच नव्हता.मायाळु खेडवळ भाबडी आई त्यांनी अनेक चित्रपटात रंगिवली.अलका इनामदार या कोल्हापुरात मंगळवार पेठ, पाण्याचा खजिना परिसरात राहत होत्या.त्यांचे पती दिनकर इनामदार हे सुध्दा नाटय व सिनेकलावंत.प्रारंभी मेळे,नाटकामध्ये दिनकर इनामदार काम करत असत. प्रकाश हिलगे यांच्या "वैभव म्युझिकल नाईट" मध्ये ते काम करत असत.त्याकाळी "मेळे" हा प्रकार कोल्हापूर भागात खुप प्रसिद्ध होता.पतीच्या बरोबरीने अलका इनामदार यांनी पण नाटकात भुमिका करायला सुरुवात केली. ते दोघे पतीपत्नी ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपट निघत होते तेव्हापासुन काम करत होते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,जवळच जयप्रभा स्टुडिअो असल्याने व बाबा म्हणजे भालजी पेंढारकर यांचा त्यांच्यावर लोभ होता.चित्रपटात छोट्या मोठ्या भुमिका करत त्यांनी अनेक दिग्दर्शकांचे लक्ष वेधुन घेतले.दादा कोंडके यांच्या चित्रपटात दिनकर इनामदार यांची छोटीशी का असेना पण भुमिका असे.पळवापळवी मध्ये त्यांनी उषा चव्हाण यांच्या बापाची भुमिका केली होती.त्याचबरोबर दिनकर इनामदार यांनी झपाटलेला या चित्रपटात "धनाजीराव" ही भूमिका साकारली होती.लक्ष्मीकांत या चित्रपटात बोलक्या बाहुल्यांचा खेळ करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. याच बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून धनाजीराव यांची टिंगल करत लक्ष्मीकांत यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले होते.
अलका इनामदार यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आई म्हणुन बरेच चित्रपटात काम केले. अलका इनामदार यांनी अनेक चित्रपटात लक्षाच्या आईची भूमिका साकारली.
माहेरची साडी, हृदयस्पर्श, आई पाहिजे, दे दणादण, मुंबईचा फौजदार, शेम टू शेम यासारखे चित्रपट त्यांनी गाजवले.वयाची सत्तरी पार केल्यानंतरही पडद्यावरील त्यांचा वावर उत्साही आणि सहकलाकारांना प्रेरणा देणारा असायचा.
एवढेच नाही तर अभिनया सोबत त्यांनी राजकारणात देखील प्रवेश केला होता. कोल्हापूरच्या महानगर पालिकेत नगरसेविकेच्या पदाचा भार त्यांनी सांभाळला होता.त्या मंगळवार पेठ येथुन अपक्ष म्हणुन निवडुन आल्या होत्या.
२२ जानेवारी २००४ रोजी अलका इनामदार यांचे निधन झाले त्यापश्चात त्यांचे पती दिनकर इनामदार यांनी देखील १२ ऑगस्ट २००५ रोजी अखेरचा श्वास घेतला.
अलका आणि दिनकर इनामदार यांना संजय आणि विनोद ही दोन मुले. संजय इनामदार यांनी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या जनसंपर्क अधिकारी पदाचा भार सांभाळला आहे. सध्या त्यांचे कुटुंब कोल्हापूर येथे स्थायिक आहे.
कोरा लिंक https://bit.ly/3eScOq0
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498
0
Answer link
div >
अभिनेत्री अलका इनामदार यांच्याबद्दल माहिती खालीलप्रमाणे:
अलका इनामदार एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहेत.
त्यांनी अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे.
त्यांच्या काही प्रसिद्ध कामांमध्ये 'वास्तव', 'सिंघम', आणि 'नटसम्राट' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
नाटकांमधील त्यांच्या योगदानालाही खूप महत्त्व आहे.
अलका इनामदार यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे.
त्यांच्याबद्दल अधिक माहिती इंटरनेटवर विविध ठिकाणी उपलब्ध आहे.