दुकान खरेदी ऑनलाईन खरेदी

किराणा दुकान सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

किराणा दुकान सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती मिळेल का?

2
प्रथमतः हा तुम्ही जो व्यवसाय निवडत आहात तो खरच खूप छान व्यवसाय आहे. सध्या कोरोनाने सगळ्या नोकऱ्या व व्यवसायांचे काय हाल झाले आहेत हे तर आपण पाहतच आहोत. म्हणून मी अशा बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट सेलिंग करण्यास का सांगतो आहे, हे समजून घ्यावे. कारण कुठलीही मंदीचा फरक डायरेक्ट सेलिंग व्यवसायवर पडत नसतो. हा जगातील एकमेव व्यवसाय असा आहे की, कुठल्याही मंदीत देखील हा व्यवसाय चालतो.

छोट्या  दुकानसाठी तुम्हाला 1 ते 150 लाख रुपये पर्यंत खर्च येवू शकतो. ही रक्कम तुमचा दुकान कुठे आहे त्यावर अवलंबून आहे.जशी जागा असेल त्याप्रमाणे तुम्हाला व्यवसायात पैसे टाकावे लागतील हे आधी लक्षात घ्या.म्हणून, सर्वात आधी किराणा दुकान नवीन सुरू करता वेळी कमीत कमी गुंतवणूक करा.

मला जर कुणी विचारले सर्वात सुरक्षित व्यवसाय कोणता तर मी किराना मालाच्या दुकानाचा पर्याय सुचवेन कारण माणसाला जगन्यासाठी जेवण जेवायला लागेल सोबत सकाळी उठल्यापासून दात घासने , आंघोळ , मेकअप , जिभेचे चोचले पुरवन्यासाठी कोल्ड्रिंक आणि इतर नमकीन ह्या सर्व वस्तू मिळण्याचे ठिकाण म्हणजे किराना मालाचे दूकान ; ज्या धंद्याला मरण नाही आसा व्यवसाय म्हणजे किराना मालाचे दूकान आणि किराना मालाच्या दुकानाचे मॉडर्न स्वरुप किवा साध किराना मालाचे दूकान आणि मोठे पॉश मॉल यांचा सुवर्णमध्य म्हणजे सुपर मार्केट ( मिनी मॉल )
सर्वात प्रथम भरपूर लोकवस्ती असलेल्या ठिकाणी *_चौकात / नाक्यावर किवा किमान रोडला लागून ग्राउंड फ्लोअरला_* स्वताचा गाळा पाहिजे किवा नसेल तर भाड्याचा गाळा शोधने . तुम्हाला जर साध किराना मालाचे दूकान टाकायचे असेल तर 300 sqft चे दूकान enough आहे पण सुपर मार्केट टाकायचे असेल तर किमान 600 sqft क्षेत्रफलाचा गाळा पाहिजे .

गाळ्याची व्यवस्था झाल्यावर फर्नीचर ( साध दूकान असेल तर लाकडी मांडण्या / शोकेस आणि सुपर मार्केट असेल तर लोखंडी रॅक बनवून घ्यावेत )

बाजारात फिरून थोड़ा त्रास सहन करून चार ठिकाणी  चौकश्या करून स्वस्तात किराना माल भरायचा ; जास्तकरून unbranded item खरेदी करताना आस करायला लागते आणि approx 8 - 30 % सूट भेटते ह्याच मार्जिनमधून आपल्याला वाहतूक , गाळ्याच भाड़े , आणि इतर खर्च भागवून आपला फायदा काढावा लागतो.

सर्व शासकीय परवानग्या घ्या जसे की शहरात दूकान असेल तर गुमास्ता , खेड्यात असेल तर ग्रामपंचायतीची NOC , फ़ूड लायसन्स , GST वैगरे आणि सुरवातीला महत्वाचे वाटत नसेल तरी वरील कागदपत्रांच्या आधारावर दुकानाच्या नावाने करंट अकाउंट उघडून घ्या नंतर व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी बिजनेस लोन मिलवन्यासाठी ,  स्वाइप मशीनसाठी आश्या अनेक कारणांसाठी करंट अकाउंट गरजेचे आसते.
उत्तर लिहिले · 16/5/2020
कर्म · 55350
0
किराणा दुकान सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती खालीलप्रमाणे:

1. व्यवसायाची योजना (Business Plan):

  • तुमच्या व्यवसायाचा उद्देश काय आहे?
  • तुम्ही किती गुंतवणूक करणार आहात?
  • तुमचे ग्राहक कोण असतील?
  • तुम्ही दुकानाचे ठिकाण कोठे निवडणार आहात?
  • तुमच्या प्रतिस्पर्धकांबद्दल माहिती.

2. आवश्यक परवाने आणि नोंदणी (Licenses and Registration):

  • दुकान परवाना (Shop License): स्थानिक महानगरपालिका किंवा नगरपालिकेकडून घ्यावा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
  • GST नोंदणी (GST Registration): जर तुमचा व्यवसाय एका विशिष्ट उलाढालीपेक्षा जास्त असेल तर GST नोंदणी आवश्यक आहे. GST पोर्टल
  • FSSAI परवाना (FSSAI License): खाद्यपदार्थ विक्रीसाठी FSSAI परवाना आवश्यक आहे. FSSAI

3. जागा निवड (Location):

  • dukanaस योग्य जागा निवडा. जिथे जास्त लोकांची वर्दळ असते आणि तुमच्या ग्राहकांना सोपे जाईल.

4. भांडवल (Capital):

  • dukanaसाठी लागणारे भांडवल किती आहे? जसे की जागा, माल, कामगार आणि इतर खर्च.

5. मालाची खरेदी (Purchasing Goods):

  • mal खरेदी करण्यासाठी चांगले वितरक (Distributors) शोधा.

6. दुकानाची मांडणी (Shop Layout):

  • dukanaत माल व्यवस्थित मांडा. ज्यामुळे ग्राहकांना सर्व वस्तू सहज दिसतील.

7. कामगार (Staff):

  • जर तुम्हाला मदतीसाठी कामगार हवे असतील, तर त्यांची नेमणूक करा.

8. जाहिरात (Advertisement):

  • dukanaची जाहिरात करा, ज्यामुळे लोकांना तुमच्या दुकानाबद्दल माहिती मिळेल.

9. तंत्रज्ञान (Technology):

  • तुम्ही तुमच्या दुकानासाठी POS (Point of Sale) सिस्टम वापरू शकता, ज्यामुळे बिलिंग आणि स्टॉक व्यवस्थापन सोपे होईल.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 860

Related Questions

ऑनलाईन क्लासेस अधिक आकर्षक होण्यासाठी आणि संपूर्ण देशातील मुलांना ते उपलब्ध करून देता यावेत यासाठी ५ सूचना कशा सुचवाल?
माझे 10वी चे प्रमाणपत्र हरवले आहे, तर ऑनलाइन सरकारी वेबसाइटवरून काढलेले प्रमाणपत्र पोलीस भरतीसाठी ग्राह्य धरले जाईल का? त्यावर प्रमाणपत्र क्रमांक आणि ई-सही नसेल तर चालेल का?
शेतीची मोजणी फी ऑनलाईन कशी भरायची?
शिधापत्रिकेचे (रेशनकार्ड) प्रकार किती व कोणते आहेत? कोणत्या शिधापत्रिकेवर (रेशनकार्डवर) किती धान्य (रेशन) मिळते? शिधापत्रिकेमधील (रेशनकार्ड) वरील नाव कमी करणे आणि नवीन नाव टाकण्याची प्रक्रिया कशी करावी? शिधापत्रिका (रेशनकार्ड) ऑनलाईन करण्याची प्रक्रिया काय आहे?
ऑनलाइन क्लास अधिक आकर्षक होण्यासाठी आणि संपूर्ण मुलांना ते उपलब्ध करून देता यावे यासाठी पाच सूचना कोणत्या कराल?
हवा म्हणजे काय? मला इयत्ता 11 वी साठी ऑनलाईन मोफत हवा आहे का?
एखाद्या व्यक्तीस आपल्याकडून GPay ने पेमेंट हवे असेल, तर आपल्याकडे त्याची कोणती माहिती असायला हवी?