कागदपत्रे जात व कुळे सामाजिक जात वैधता प्रमाणपत्र

जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे काय ते कोठे काढायचे असते?

3 उत्तरे
3 answers

जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे काय ते कोठे काढायचे असते?

3
तुमच्या जातीचा पुरावा म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र. तुमच्या तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयात तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल. जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे: (१) आधार कार्ड, मतदान कार्ड, व लायसन्स यापैकी कोणतेही एक. (२) पोलीस पाटील दाखला, सरपंच दाखला. (३) तुमच्या जन्माचा दाखला. (४) कोतवाल बुकची नक्कल. (५) उत्पन्नाचा दाखला...
उत्तर लिहिले · 29/4/2020
कर्म · 6980
2
जात पडताळणी प्रमाणपत्र आता सर्वच शैक्षणिक कामासाठी सक्तीचे करण्यात आले आहे..शिष्यवृत्ती तसेच इतर शैक्षणिक कामासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे..

जात वैधता कागद पत्र. (Caste-Validity Certificate)


१. प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला.

२. माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला.

३. कॉलेज सोडल्याचा दाखला.

४. प्राथमिक शाळा प्रवेश रजिस्टरचा उतारा.

५. माध्यमिक शाळा प्रवेश रजिस्टरचा उतारा.

६. जन्म-मृत्यू नोंदावहीचा उतारा.

७. कोतवाल नोंदवाहीचा/ राष्ट्रीयत्वचा नोंद्वहीचा उतारा.

८. जमिनीचा ७/१२ चा उतारा.

९. महसूल विभागाकडील कागदपत्र.

१०. नावामध्ये/ आडनावामध्ये बदल यासंबंधीचे राजपत्र.

११. उमेदवाराचा जातीचा ओरिजनल दाखल.

१२. सेवापुस्तकाच्या पहिल्या पानाचा उतारा.

१३. जात वैधता प्रमाणपत्र.

१४. वारसा हक्क प्रमाणपत्र.

15.आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास गाव नमुना क्र.१४ उतारा जन्म मृत्यू नोंदीचा दाखला.

16. अर्जदाराच्या कुटुंबातील वडील,मुलगा,मुलगी,भाऊ,बहिण,यांची जात प्रमाणपत्र पडताळणी झाली असल्यास त्या प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत.

17. जर वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखलयात किंवा जन्म मृत्यू दाखल्यात जातीचा उल्लेख नसेल तर अर्जदाराचे काका,आजोबा,आत्या,पंजोबा,खापर पंजोबा,यांचे जातीचे स्पष्ट नोंद आहे अस प्राथमिक शाळा सोडल्याचे किंवा जन्म मृत्यूचे दाखले.

18.  नाते संबंध सिद्धतेसाठीमहसुली पुरावे ज्यात ७/१२ उतारा,वारसनोंद,वाटणीनोंद,हक्काचे पत्रक,फेरफार नोंद,कडईपत्रक.

19.  १०० रुपयाच्या स्टँपवरील अर्जदाराचे वैयक्तिक प्रतिज्ञापत्र मूळप्रत जोडावे. व

20.१०० रुपयाच्या स्टँपवरील वंशावळ मुळप्रत जोडावी.

20. नाव आडनाव यात बदल असल्यास राजपत्र अथवा प्रतिज्ञापत्र जोडावे.




उत्तर लिहिले · 15/5/2020
कर्म · 55350
0

जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) म्हणजे तुम्ही सादर केलेली जात (Caste) खरी आहे आणि तुम्ही त्या जातीचेच आहात हे सरकार मान्य करते.

जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी खालील प्रक्रिया आहे:

  1. अर्ज कोठे करावा:

    • तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात (Caste Certificate Scrutiny Committee Office) अर्ज करू शकता.
  2. आवश्यक कागदपत्रे:

    • जात प्रमाणपत्र (Caste Certificate).
    • शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate).
    • जन्माचा दाखला (Birth Certificate).
    • रेशन कार्ड (Ration Card).
    • आधार कार्ड (Aadhar Card).
    • वडील आणि आजोबांच्या जात प्रमाणपत्राची प्रत (Copy of Caste Certificate of Father and Grandfather).
    • इतर आवश्यक कागदपत्रे जी समिती कार्यालयाद्वारे मागितली जातील.
  3. अर्ज प्रक्रिया:

    • अर्ज भरून तो आवश्यक कागदपत्रांसह सादर करा.
    • समिती तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करते.
    • पडताळणीत सर्व काही जुळल्यास तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र दिले जाते.

अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.

टीप: कागदपत्रे आणि प्रक्रियेमध्ये बदल होऊ शकतात, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित कार्यालयातून खात्री करून घ्यावी.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

कास्ट व्हॅलिडिटी (Caste Validity) ची संपूर्ण प्रक्रिया काय आहे? कास्ट व्हॅलिडिटी कशी काढायची, याबद्दल सर्व माहिती द्या.
आदिवासी जात वैधता प्रमाणपत्र फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे अपलोड करावी लागतात?
कास्ट व्हॅलिडिटी कशी काढावी व कोणती कागदपत्रे लागतील?
कृपया मला कास्ट व्हॅलिडिटी (जात वैधता प्रमाणपत्र) काढायची आहे, तरी कृपया अनुभवी आणि ज्यांनी काढली असेल त्यांनी माहिती देऊन सहकार्य करावे?
माझी कास्ट एस.टी. आहे, मग कास्ट व्हॅलिडिटीसाठी आंबेडकर भवनमधून होईल की ठाण्याला जावे लागेल?
मला माझी कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे, पण माझ्याकडे 1972 चा पुरावा मागत आहेत. माझ्याकडे तो पुरावा नाही आहे, तर मी काय करू?
कास्ट व्हॅलिडिटी कसे काढावे ?