विवाह ज्योतिष लग्न

लग्न पत्रिकेतील गण व रास जमत नाही तर काय करावे?

3 उत्तरे
3 answers

लग्न पत्रिकेतील गण व रास जमत नाही तर काय करावे?

7
भारतातील पंडितांचे नासा वाले पण आश्चर्य करतात, कारण हे १०१ रुपयांमध्ये ग्रहांची दिशा बदलतात.
काय भाऊ, तुम्ही २१ व्या युगात आहात आणि अशा गोष्टींवर विश्वास ठेवता? रास, गण, इत्यादी...माणुसकी जुळते का ते पहा, बाकी सर्व गोष्टी सोडा भाऊ...
उत्तर लिहिले · 29/2/2020
कर्म · 16390
3
हे बघा लग्नासाठी गुण किंवा रास हे सगळं काही एक प्रकारचा कर्मकांड किंवा जुनी परंपरा आहे. तिचा आता सध्याच्या युगात जास्त काही वैज्ञानिक पाठपुरावा होत नाही. त्यामुळे फक्त गुण आणि रास जमत नाही ह्या कारणामुळे लग्न मोडू नये. तुमचा जर खूपच या गोष्टींवरती विश्वास असेल आणि घरचेही ही मान्य करायला तयार नसतील तर तुम्ही एखाद्या गुरूला भेटून यावर एक तोडगा किंवा उपाय म्हणून काही एखादा विधि करता येईल का हे विचारून घ्या. आणि मग तो विधी करून  पत्रिका जुळण्यास मदत होईल की नाही हे देखील गुरूंना विचारून घ्या. आणि आणि लग्न जमून घ्या बघा.
याबरोबर हे देखील सांगतो, कधी कधी जर मुलीकडच्यांना काही कारणास्तव किंवा मुलाकडच्याना काही कारणास्तव स्थळ पसंत नसेल तर पत्रिका जुळत नसल्याचे कारण हे फार प्रसिद्ध कारण झाले आहे. त्यामुळे जर लोक पत्रिका जुळत नाही हे लावून धरत असतील तर विषय सोडून द्या. व दुसरे स्थळ बघा.. 💐
उत्तर लिहिले · 29/2/2020
कर्म · 61495
0

लग्न पत्रिकेतील गण आणि रास जुळत नसल्यास काही उपाय केले जाऊ शकतात. या संदर्भात काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे:

  1. तज्ञांचा सल्ला:

    ज्योतिषशास्त्रातील तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. ते तुमच्या पत्रिकांचे विश्लेषण करून योग्य मार्गदर्शन करू शकतात.

  2. गण आणि राशीचे महत्व:

    Hindu विवाह पद्धतीत गण आणि राशीला महत्व आहे, परंतु ते एकमेव निर्णायक घटक नाहीत. पत्रिकेतील इतर गुणधर्म जसे की नाडी, भकूट, आणि ग्रह मैत्री देखील विचारात घेतले जातात.

  3. उपाय:

    जर गण आणि राशी जुळत नसेल, तर काही ज्योतिषीय उपाय केले जातात. ज्यामुळे दोषांचे निवारण होते.

  4. इतर गुणधर्म:

    गण आणि राशी सोबत पत्रिकेतील इतर गुणधर्म जसे की नाडी, भकूट, आणि ग्रह मैत्री देखील विचारात घेतले जातात. जर ते जुळत असतील, तर दोषांचे निवारण होऊ शकते.

Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे आणि ती केवळ माहितीपर आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2760

Related Questions

लग्न जमल्यास मुलीला कॉलवरती काय बोलावे, कोणत्या विषयांवर बोलावे?
ग्रामपंचायत मध्ये विवाह नोंदणी फी २५० पर्यंत आकारले जाऊ शकते का?
ग्रामपंचायत मध्ये विवाह नोंदणीसाठी फी किती घेतली जाते?
घाट माथ्यावर मराठा समाजातील कोणकोणत्या पोटकुळात विवाह होतात?
जाधवांच्या कोणत्या शाखेतील महिलेचे पुनर्विवाह झालेले आहे का?
पुनर्विवाह कोर्ट लावून करण्याची काय पद्धत आहे?
कोकणात लिंगायत मराठा समाजात लग्नात सहाणेला पाय लावण्याची पद्धत का नाही?