सोशिअल मीडिया लग्न सामाजिक शुभेच्छा

लग्नाच्या शुभेच्छा स्टेटस?

2 उत्तरे
2 answers

लग्नाच्या शुभेच्छा स्टेटस?

8

'विवाह' हा एक संस्कार आणि सोहळादेखील आहे. लग्नसोहळ्यामुळे वधूवरांसोबतच दोन कुटुंब एकत्र येतात. एखाद्याचं लग्न ठरलं की, त्यांच्या कुटुंबाबरोबरच जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या आनंदाला देखील पारावार राहत नाही. जवळच्या मित्रमैत्रिणीचं अथवा भावंडाचं लग्न असेल तर कपडे, दागदागिने कोणते घालायचे, काय काय मजा करायची, कोणती भेटवस्तू द्यायची अशा गप्पा लग्नसोहळ्याच्या आधी अनेक महिन्यांपासून ठरतात. आजकाल डेस्टिनेशन वेडिंगचा जमाना असल्यामुळे तीन-चार दिवस एकत्र येऊन विवाहसोहळा साजरा केला जातो. लग्नाच्या तयारीत अनेक गोष्टींचा समावेश केला जातो. मात्र यासोबत सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे  लग्नात वधूवरांना शुभेच्छा काय द्यायच्या.


लग्न ही वधूवर आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक खास गोष्ट आहे. लग्नामुळे मुळे दोन जीव आयुष्यभरासाठी एकत्र येतात. त्यांच्या सहजीवनाची सुरूवात शुभेच्छा आणि आर्शिवादाने व्हावी हीच सर्वांची इच्छा असते. अशा  वेळी वधूवरांना आर्शिवाद आणि शुभेच्छा देण्यासाठी सर्वांना शुभेच्छा संदेश हवे असतात.भेटवस्तू अथवा भेटकार्डावर लिहण्यासाठी हे शुभेच्छा संदेश तुमच्या नक्कीच उपयोगी पडतील. मनातील भावना शब्दात मांडण्यासाठी आम्ही तुम्हाला लग्नात वधूवरांना आर्शिवाद देण्यासाठी काही शुभेच्छा संदेश देत आहोत जे तुम्हाला नक्कीच आवडतील.


वधू वरांना देण्यासाठी शुभेच्छा संदेश

1. लग्न म्हणजे दोन जीवांची रेशीमगाठ... लग्नबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा

2. लग्न म्हणजे एक पवित्र बंधन, दोन नात्याची जन्मोजन्मींची गुंफण... लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा

3. लग्न, आयुष्याचा अनमोल आणि अतुट क्षण… लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

4. आयुष्याच्या या पायरीवर, तुमच्या नव्या जगातील, नव्या स्वप्नांना, बहर येऊ दे...लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा


5.  हे बंध रेशमाचे, एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले...नांदा सौख्यभरे

6. नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेम भरलेल्या रेशीमगाठीत बांधलेली, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

7. लग्न म्हणजे दोन मनांचं जुळणं आहे, तहानलेल्या समुद्राकडे नदीने येऊन मिळणं आहे… लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

8. लग्न म्हणजे जुळलेले बंध, लग्न म्हणजे नवे अनुबंध... लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

9. विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन, सनईचौघड्याच्या सुरात नवजीवनात केलेले पदार्पण लग्नसोहळ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा

10. आयुष्याच्या वेलीवरचं हळुवार पान, दोन जीवांना जोडणारा प्रेमळ धागा…. लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा

11. दोन अनोळखी जीव, कधी न भेटलेले, निरनिराळ्या ठिकाणी वाढलेले अन बागडलेले आज एक झाले लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

12. लग्न म्हणजे एक प्रवास, दोन जीवांचा, दोन मनांचा, दोन भिन्न व्यक्तीमत्वांच्या मिलनाचा... लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

13. लग्न म्हणजे केवळ दोन अक्षरे नव्हेत तर ते असतात सप्तपदी चालत जोडले जाणारे ऋणानुबंध...लग्नाच्या या  गोड प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा

14. लग्न म्हणजे काय असतं, दोन जीवांचा मेळ असतो, राजा राणीने मांडलेला भातुकलीचा खेळ असतो. हा खेळ मांडण्यासाठी हार्दिक शुभेच्छा

15. एकमेकांमध्ये असलेला विश्वास ही तुमची कहाणी, कारण त्यामुळेच मिळाली आज राजाला त्याची राणी.. लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा

16. तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे, यश तुम्हाला भरभरून मिळू दे लग्नासाठी मनपूर्वक शुभेच्छा

17. तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा, तुम्हा दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा

18. तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्म रहावं, परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावे लग्नासाठी मनापासून शुभेच्छा

19. हळदीचा वास आणि मेंदीचा रंग, खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

20. आज तुमच्या सहजीवनाचा प्रवास सुरू होत आहे तुमच्या सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा

21. लग्नबंधनाने साता जन्माचं नातं जुळलं या बंधनाच्या पावित्र्यात तुमचं सहजीवन बहरत राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

22. हळद लागली, मेंदी सजली, नवरीचं रूप आलं खुलून संसाराच्या नव्या सुरूवातीसाठी… तुला आर्शीवाद भरभरून

23. चांदीच्या दिव्यात तुपाची वात, शुभेच्छा आणि आर्शीवादाने करा नव्या जीवनाला सुरूवात

24. महालक्ष्मीच्या गळ्यात सोन्याचा साज, शुभेच्छांनी साजरा कराल लग्नसोहळा आज

25.सुखी संसारासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा, तुमचा संसार सुखाचा व्हावा हिच आमची इच्छा
उत्तर लिहिले · 15/2/2020
कर्म · 7285
0

लग्नाच्या शुभेच्छा स्टेटस:


  • "नवीन सुरुवात, स्वप्नांची भरारी,
    तुमची जोडी दिसे खूप न्यारी!
    लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!"

  • "दोन जीवांचे मिलन,
    एक सुंदर बंधन,
    तुमच्या लग्नाची ही आठवण,
    सदैव राहो जतन!
    शुभ विवाह!"

  • "आयुष्याच्या या नवीन वाटेवर,
    तुमची स्वप्ने साकार होवोत,
    तुमची जोडी बनोNumber One,
    लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!"

  • "बंध रेशमाचे,
    जुळले आजPreeteeचे,
    लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!"

  • "नवी नाती, नवी स्वप्ने,
    नवीन आशा, नवीन जीवन,
    लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!"


तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी स्टेटस तयार करू शकता.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1020

Related Questions

आजच्या तरुणांची व्यसनाधीनता?
वृद्धांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय धोरण स्पष्ट करा?
स्वच्छ भारत अभिनायचा जनक कोनाला म्हणतात?
स्वच्छ भारत अभियानाचे काय?
'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेतील पाणी प्रश्नाचे स्वरूप विशद करा?
गोरगरिबांना उद्धारण्यासाठी, बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणून समाजसुधारकांनी सहकारी संस्था हे संघटन तयार करून उभे केले, ते टिकले पाहिजे. यासाठी निस्वार्थ सेवा देणारे खरे सेवार्थी हवे आहेत, याबद्दल आपले मत काय आहे?
'स्त्री-पुरुष समानता' या विषयावर प्रबोधनपर कीर्तनाची संहिता लिहा. (२० ते ३० ओळी)?