साहित्य

प्राचीन साहित्य म्हणजे काय? प्राचीन साहित्याची वैशिष्ट्ये लिहा?

2 उत्तरे
2 answers

प्राचीन साहित्य म्हणजे काय? प्राचीन साहित्याची वैशिष्ट्ये लिहा?

9
प्राचीन मराठी साहित्य
प्रारंभ ते इ.स. सु. १८१८ : मराठी वाङ्मयाचा मूलस्त्रोत स्त्रीगीते, अन्य लोकगीते, कथा-कहाण्या अशा प्रकारच्या अलिखित लोकसाहित्यात दिसून येतो. अकराव्या शतकाच्या पूर्वार्धात लिहिला गेलेला ज्योतिपरत्नमाला हा मराठीतील पहिला ग्रंथ होय, असे मत राजवाड्यांनी व्यक्त केले; पण त्याची भाषा उत्तरकालीन वाटते. सन ११८८ मध्ये लिहिला गेलेला⇨मुकुंदराजांचा विवेकसिंधु हा मराठीतील पहिला ग्रंथ, असे एक मत आहे; पण त्या ग्रंथाचा नेमका काळ निश्चित करण्याचा प्रयत्न करताना ग्रंथातील शकसंवत्सरांचा मेळ बसत नाही, असे दिसून येते. एकनाथ-मुक्तेश्वरांसारखे कवी मराठीतील या आदिकवीचा उल्लेखही करीत नाहीत आणि विवेकसिंधूतील मराठीचे स्वरूपही उत्तरकालीन वाटते, असे महत्वाचे आक्षेप या मतावर घेतले गेले आहेत.
या आक्षेपांत तथ्य आहे.या ओवीबद्घ ग्रंथाची अठरा प्रकरणे असून त्याचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग आहेत. यात शांकरवेदान्त स्पष्ट केला असून काव्यात्मकतेपेक्षा तत्त्वप्रतिपादनावर कवीचा भर अधिक आहे. ब्रह्मविद्येचा ‘सुकाळु हो देयावा’ हा ग्रंथाचा हेतू. यातील तत्त्व विवेचनाची गंभीर पातळीही त्याला मराठीतील आद्यग्रंथ मानण्याच्या आड येते; काही विद्वानांच्या मते विरोधीच ठरते. निर्विवाद पुराव्यानेच बोलावयाचे असेल, तर सु. १२७८ मध्ये⇨म्हाइंभट्टांनी (मृ.सु. १३००) संकलित केलेले लीळाचरित्र हा मराठीतील पहिला ग्रंथ म्हणता येईल. हा गद्य आहे हा त्याचा एक विशेष आहे.
म्हाइंभट्टांचे लीळाचरित्र: धर्म हा लोकाभिमुख असावा, असा एक नवा विचार दहाव्या-अकराव्या शतकाच्या सुमारास भारतामध्ये सर्वत्र निर्माण झालेला दिसतो. केवळ उच्चवर्णियांनाच समजणारासंस्कृतमधील धर्मविचार सर्वसामान्यांच्या भाषेत आणला पाहिजे, ही प्रेरणा यातून निर्माण झाली व ती अर्वाचीन देशभाषांतील वाङ्मयाच्या निर्मितीस कारण ठरवी. बाराव्या शतकात महाराष्ट्रामध्ये महानुभाव व वारकरी हे प्रभावशाली संप्रदाय उदयाला आले. नाथपंथाचा प्रवेश तर येथे त्याच्याही आधी झाला होता. मराठीच्या प्रारंभकालातील वाङ्मय या तीन पंथांच्या अनुयायांकडून लिहिले गेले. यातील अग्रदूताचा मान महानुभाव लेखकांकडे जातो. त्या पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधर आणि संघटक नागदेवाचार्य यांनी आपल्या पंथाच्या अनुयायांनी सर्वत्र मराठीचाच वापर केला पाहिजे, असा आग्रह धरला होता. मराठी ही या पंथाची धर्मभाषाच झाली. स्वत: चक्रधर व नागदेवाचार्य यांनी कोणताही ग्रंथ लिहिलेला नाही; पण त्यांच्या प्रेरणेतून या पंथाच्या अनुयायांकडून मात्र विपुल ग्रंथरचना झाली.
महींद्र व्यास उर्फ म्हाइंभट्ट ह्यांनी संकलित केलेला लीळाचरित्र हा या पंथातील पहिला ग्रंथ होय. चक्रधरांच्या महानिऱ्याणानंतर त्यांच्या आठवणी ऊर्फ लीळा लिहून काढण्याची प्रेरणा म्हाइंभट्टास झाली. नागदेवाचाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली गावोगाव फिरून त्यांनी एकूण १,५०९ लीळा गोळा केल्या. त्यांचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग केले. पैठणला येऊन लोकांना उपदेश करण्यास प्रारंभ करण्यापूर्वी चक्रधर एकाकी भ्रमण करीत होते. त्या काळातील काही आठवणी त्यांनी आपल्या निकटवर्तीयांना सांगितल्या होत्या. त्या एकत्र करून त्याला ‘एकांक’ असे नाव देण्यात आले. असे या ग्रंथाचे अखेर तीन भाग झाले. संकलनकार या दृष्टीने म्हाइंभट्टांनी केलेली कामगिरी केवळ अपूर्व म्हणावी अशी आहे.
यातील प्रत्येक लीळा त्या त्या संबंधित व्यक्तीकडून मिळवलेली आहे आणि त्यातील बारीकसारीक तपशील अचूकपणाने टिपण्यात आले आहेत. शंका उत्पन्न झाली, तेव्हा ती शंका किंवा मतभेद आढळला तेथे तो मतभेद नोंदलेला आहे. प्रत्येक लीळा नागदेवाचाऱ्याकडून तपासून घेण्यात आली आहे. चक्रधर हे साक्षात परमेश्वराचे अवतार, तेव्हा त्यांचे उदगार जसेच्या तसे नोंदले जातील. असा प्रयत्न कसोशीने करण्यात आला आहे. वास्तव वर्णने, आकर्षक शब्दचित्रे, नाट्यपूर्ण संवाद हे या ग्रंथाचे डोळ्यांत भरणारे विशेष आहेत. येथे वर्णिलेले प्रसंग दररोज घडणारे असे आहेत; पण त्या साध्यासाध्या प्रसंगांतून प्रकट होणारी व्यक्तिचित्रे व समाजचित्रे अतिशय जिवंत व बोलकी आहेत. वाक्ये छोटी आहेत, शब्द नित्याच्या वापरातील आहेत. भाषा सजवण्याचा कोणताही प्रयत्न येथे केलेला नाही. मराठीमधील या पहिल्या ग्रंथातील अभिव्यक्ती सहज व अकृत्रिम अशी आहे. लीळाचरित्र हा मराठीतील आद्य चरित्रग्रंथही आहे.
ऋद्धिपूरला राहणारे चक्रधरांचे गुरू गोविंदप्रभू ऊर्फ गुंडम राऊळ यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या आठवणी म्हाइंभट्टांनी गोळा केल्या व त्यांतून ३२५ लीळांचा ऋद्धिपुरलीळा (ऋद्धिपूरचरित्र हेही एक पऱ्यायी नाव) ऊर्फ गोविंदप्रभुचरित्र (सु. १२८८) हा ग्रंथ सिद्ध झाला. लीळाचरित्राची सारी वैशिष्ट्ये त्यांच्या या ग्रंथातही उतरली आहेत. श्रीकृष्ण, दत्तात्रेय व गोविंदप्रभूंचे गुरू चांगदेव राऊळ ह्यांच्या कथा चक्रधर आपल्या शिष्यांना सांगत असत, त्या एकत्र करून म्हाइंभट्टांनी त्यांचीही चरित्रे सिद्ध केली आहेत. पण ती पुराणांच्या थाटाची आहेत. नागदेवाचाऱ्याच्या निऱ्याणानंतर त्यांच्या आठवणी संग्रहित करणारे स्मृतिस्थळ हे मुळात नरेंद्र व परशराम यांनी सिद्ध केले (सु. १३१२) असे म्हटले जाते. त्यामध्ये नागदेवाचाऱ्याच्या बरोबर म्हाइंभट्ट, केसोबास आदी इतर शिष्यांच्या कथाही आल्या आहेत. लीळाचरित्र, ऋद्धिपुरलीळा व स्मृतिस्थळ हे मराठी वाङ्मयाच्या प्रारंभकाळात सिद्ध झालेले तीन चरित्रग्रंथ होत. थोर पुरुषांच्या आठवणी गोळा करून सत्याशी संपूर्ण इमान राखणारी अशी चरित्रे सिद्ध करण्याची ही प्रथा मराठीत पुढे चालू राहिली असती, तर मराठी वाङ्मयाचे हे दालन अपार समृद्ध झाले असते.
उत्तर लिहिले · 8/1/2020
कर्म · 16430
0
प्राचीन साहित्य:

प्राचीन साहित्य म्हणजे भूतकाळातील लेखन. हे साहित्य अनेक प्रकारांचे असू शकते, जसे की महाकाव्य, नाटके, स्तोत्रे आणि कथा.

प्राचीन साहित्याची वैशिष्ट्ये:
  • भाषेचा वापर: प्राचीन साहित्यात संस्कृत, पाली, प्राकृत आणि अपभ्रंश यांसारख्या प्राचीन भाषांचा वापर केला गेला आहे.
  • धार्मिक आणि नैतिक विचार: प्राचीन साहित्यात धार्मिक आणि नैतिक विचारांना महत्त्व दिले गेले आहे.
  • कल्पना आणि प्रतीक: प्राचीन साहित्यात कल्पना आणि प्रतीकांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
  • छंद आणि अलंकार: प्राचीन साहित्यात विविध प्रकारचे छंद आणि अलंकारांचा वापर केला जातो, ज्यामुळे ते अधिक सुंदर आणि आकर्षक बनते.
  • तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब: प्राचीन साहित्य हे त्यावेळच्या समाजाचे, चालीरितींचे आणि परंपरांचे प्रतिबिंब असते.

प्राचीन साहित्याच्या अभ्यासाने आपल्याला इतिहासातील जीवनशैली, विचार आणि संस्कृती समजून घेण्यास मदत होते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 860

Related Questions

एका गोगलगाईची तक्रार कुणी व का केली असावी?
रामायण हे महाकाव्य कोणत्या ऋषींनी रचले?
कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेचा परामर्श द्या?
लोककथांचे वाड्मयीन सौंदर्य विशद करा?
लोकसाहित्याची स्वरूप व व्याप्ती थोडक्यात स्पष्ट करा?
मराठी बालपुस्तकांचा इतिहास थोडक्यात स्पष्ट करा?
साहित्याचे प्रकार लिहा?