कागदपत्रे ऊर्जा महावितरण

नवीन वीज मीटरसाठी लागणारी कागदपत्रे काय आहेत?

2 उत्तरे
2 answers

नवीन वीज मीटरसाठी लागणारी कागदपत्रे काय आहेत?

3
घरगुती/ वाणिज्यिक वीजजोड मिळणेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
घरगुती/ वाणिज्यिक मागणीसाठी विहित नमुन्यातील A1 फॉर्म स्वाक्षरीसह भरून त्यासोबत खालील अ,ब व क मधील आवश्यक ती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
अ. जागेचा / निवासाचा व मालकीचा पुरावा (खालील पैकी एक)
1.रेशन कार्ड
2.महापालिका मिळकतकर बील/ पावती
3.सक्षम प्राधिकाऱ्यांकडील मंजूर नकाशा
4.निवडणूक ओळखपत्र
5.आधारकार्ड
6.ड्रायव्हींग लायसन्स
7.खरेदीखत/ विक्री करारनामा
8.अर्जदार भाडेकरू असल्यास मूळ मालकाचा नाहरकत दाखला/ भाडे करारनामा/ तीन महिन्याच्या भाडे पावती.
9.जागा मालका / ताबेदार / शासकीय संस्था यांचे बरोबर केलेला विकसन करारनामा
10.मालमत्ता उतारा (प्रॉपर्टी कार्ड) किंवा ७/१२ उतारा
11.सोसायटी नोंदणी प्रमाणपत्र
12.वरील पैकी कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्यास र.रू.२००/- च्या स्टॅम्प पेपरवर विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र

ब. ओळखपत्र पुरावा (खालील पैकी एक)
1.निवडणूक ओळखपत्र
2.जिल्हाधिकारी/ शासकीय मान्यताप्राप्त फोटो ओळखपत्र
3.आधार कार्ड
4.पारपत्र (पासपोर्ट)
5.पॅनकार्ड
6.वाहन परवाना
7.फोटोपास (शासकीय मान्यता प्राप्त विभागाकडील)
8.शासनामार्फत दिलेले ज्येष्ठ नागरीक ओळखपत्र
9.खरेदीखत/ विक्री करारनामा

क. इतर कागदपत्रे (लागू असल्यास)
1.जातीचा दाखला (SC/ ST)
2.दारीद्रय रेषेखालील प्रमाणपत्र (BPL)
3.कामाच्या स्वरूपानुसार शासकीय संस्थेकडील परवाना (व्यावसायिक विजजोडसाठी(लागू असल्यास)
उत्तर लिहिले · 6/1/2020
कर्म · 455
0
नवीन वीज मीटर (electric meter) साठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:
  • अर्जदाराचा फोटो: अर्जदाराचा पासपोर्ट साईझ फोटो.
  • ओळखीचा पुरावा: आधार कार्ड (UIDAI), मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, किंवा ड्रायव्हिंग लायसेन्स यापैकी कोणतेही एक.
  • पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड, वीज बिल, पाणी बिल, घरपट्टी किंवा भाडे करार (rent agreement).
  • मालकीचा पुरावा: मालमत्तेच्या मालकीचा पुरावा आवश्यक आहे. उदा. प्रॉपर्टी कार्ड, खरेदीखत (sale deed).
  • भोगवटा प्रमाणपत्र: जर तुम्ही नवीन बांधकाम करत असाल, तर भोगवटा प्रमाणपत्र (occupancy certificate) आवश्यक आहे.
  • इतर कागदपत्रे: आवश्यकता असल्यास, अर्जदाराला इतर कागदपत्रे देखील सादर करावी लागू शकतात.

हे कागदपत्रे सादर केल्यानंतर, वीज वितरण कंपनी तुमच्या अर्जाची पडताळणी करेल आणि नवीन वीज मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू करेल.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1680

Related Questions

सिंगल लाईन डायग्राम सोलर म्हणजे काय?
ट्रान्समिशन लाईन कोणती पॉवर तयार करते?
FYBA SOC101 शक्ती साधनांचे प्रकार स्पष्ट करा?
पतंग उडवण्यासाठी कोणत्या ऊर्जा साधनाचा वापर करावा लागेल?
कोणत्या प्रकाशात जास्त ऊर्जा असते?
बायोगॅसचे निष्कर्ष काय?
कोणत्या प्रकाशात सर्वात जास्त ऊर्जा असते?