इंटरनेटचा वापर कागदपत्रे अर्थ उत्पन्न दाखला

उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन कसा काढावा?

2 उत्तरे
2 answers

उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन कसा काढावा?

8
उत्पन्नाचा दाखला(Income Certificate) काढायचा आहे अन तोही अगदी घरबसल्या ?? मग हा लेख तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र सरकारने apalesarkar.mahaonline.com नावाने पोर्टल सुरु केले आहे ज्यावरून तुम्ही अगदी घरबसल्या अनेक कागदपत्रे काढू शकता. आजच्या लेखात आपण त्यापैकी तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा हे पाहणार आहोत.

लागणारी कागदपत्रे :-

ओळखीचा पुरावा (Identification Proof)- आधार कार्ड / मतदार कार्ड / driving Licence / शासनमान्य इतर पुरावे
पत्ता(Address Proof) – वीजबिल / रेशन कार्ड / रहिवासी दाखला /
उत्पन्नाचा पुरावा(Income Proof) – शेतकरी किंवा इतर असल्यास तलाठ्याकडून उत्पन्नाचा दाखला/नोकरदारांनी १६ नंबरचा फॉर्म / पेन्शनधारकांनी बँकेचे प्रमाणपत्र / व्यावसाईक असल्यास आयकर विवरणपत्र

अनुक्रमणिका hide
1 Online उत्पन्नाचा दाखला कसा मिळवावा? / How To Get Income Certificate Online
1.1 Step 1 – आपले सरकार पोर्टल / Aaple Sarkar Maharashtra
1.2 Step 2 :- उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अर्ज करणे / Filling Income Certificate Form
1.3 Step 3: Document Upload For Income Certificate / दाखल्यासाठी कागदपत्र अपलोड करणे
1.4 Step 4 :- Fee For Income Certificate
Online उत्पन्नाचा दाखला कसा मिळवावा? / How To Get Income Certificate Online
Step 1 – आपले सरकार पोर्टल / Aaple Sarkar Maharashtra
1.सर्वप्रथम aaplesarkar.mahaonline.com उघडा

2. जर तुम्ही register असाल तर Log in करा. जर तुम्ही अजून register केले नसेल तर New User? register Here वर click करा आणि register करा.

Aaple Sarkar Registration
तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर अन आधार कार्डने अगदी सहजगत्या register करू शकता. जर तुम्हाला यामध्ये Problems येत असतील तर कमेंट मध्ये कळवा आम्ही याबाबत माहिती देऊ

3. Log In केल्यानंतर डाव्या कोपऱ्यातील Column ला Scroll करून (खाली जाऊन) Revenue Department वर क्लिक करा.

Online Utpannacha Dakhala
4. Sub-Department समोर Scroll Down Menu (खाली सरकणारा मेनू) मधून Revenue Services निवडा. आता तुमच्या समोर आपले सरकार पोर्टलच्या विविध सुविधा येतील

Utpannacha Dakhala kasa Kadhava
5. समोर आलेल्या सुविधांपैकी तुम्ही कोणतीही सुविधा निवडू शकता. आज आपण उत्पन्नाचा दाखला काढत आहोत तेव्हा Income Certificate निवडा व Proceed वर click करा

Income Certificates in Maharashtra
६. आता एक नवीन Window Open झाली असेल. या नवीन उघडलेल्या window मध्ये INCOME Certificate नावाच्या TAB वर click करा

Aaple sarkar Income Certificate
Step 2 :- उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अर्ज करणे / Filling Income Certificate Form
आता तुमच्यापुढे एक फॉर्म आलेला असेल (Application Form) या फॉर्ममध्ये चित्रात दाखवल्याप्रमाणे आपली माहिती भरा

Utpannacha Dakhala Form
दाखला ३ वर्षासाठी हवा असेल तर Income Year मध्ये ३ वर्षासाठी किंवा १ वर्षासाठी निवडा
Applicant Details :- पुढच्या Section मध्ये तुमची वैयक्तिक माहिती नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, राष्ट्रीयत्व, Occupation तत्सम माहिती निवडा.
Applicants Address :-गाव, तालुका, जिल्ह्यासोबत या section मध्ये तुमचा पत्ता भरा.
जर तुमच्याकडे PAN कार्ड असेल तर PAN Card चा नंबर भरा.
Family Education Details :- तुमच्या कुटुंबातील सदस्यांची शैक्षेनिक माहिती भरा
Beneficiary Information :- इथे ज्याच्यासाठी दाखला काढायचा आहे त्याची माहिती आणी कशासाठी दाखला लागत आहे कारण लिहा
Family Farm Income :- कुटुंबातील सदस्याचे नाव, त्याच्या नावावर असलेली जमीन, जमिनीचा प्रकार, जिल्हा, तालुका, अन गाव जिथे ही जमीन आहे हे भरा
Other source of Income details :- विविध क्षेत्रातून निघणाऱ्या तुमच्या उत्पन्नाचे विवरण इथे लिहा.
Attachment :- इथे तुम्ही जोडणार असणारे कागदपत्र निवडा. I ACCEPT वर टिक करा आणी समावेश करा वर click करा

Step 3: Document Upload For Income Certificate / दाखल्यासाठी कागदपत्र अपलोड करणे
माहितीचा फॉर्म भरून “समावेश करा” वर click केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरा एक फॉर्म येईल. इथे तुम्हाला लागणारी कागदपत्रे जोडायची आहेत. खालील दिलेल्या चित्राप्रमाणे माहिती तुम्हाला भरायची आहे.

Utpannacha Dakhala kasa Kadhal
तुम्ही अपलोड करणारे Documents हे 75 ते 500KB या size मध्ये हवे आहेत तेव्हा. अर्ज भरण्यापूर्वीच या https://picresize.com/ website वर जाऊन तुम्ही तुमचे Documents ची size वाढवू किंवा कमी करू शकता

200 ते 212 पिक्सेल उंची अन 160 पिक्सेल रुंदी याप्रमाणात तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. ज्यांच्याकडे अशा प्रमाणात फोटो आहे त्यांनी फोटो अपलोड करा.
२. बहुतांश लोकांकडे याप्रमाणात फोटो नसतो, ज्यांच्याकडे याप्रमाणात फोटो नाही किंवा ज्यांना माहितीच नाही आपल्या फोटोची size त्यांनी CLICK Here To Crop Photo यावर click करा. एक नवीन window उघडेल. या नवीन window मध्ये आपल्याकडे असेलला फोटो अपलोड करा. तिथे तुमचा फोटो योग्य प्रमाणात crop होईल. हा Crop झालेला फोटो download करा. अन मग तो अपलोड करा.
पत्याचा पुरावा:- दिलेल्या १२ कागदपत्रापैकी 75 – 500 KB च्या sizeमध्ये किमान एक पुरावा अपलोड करा.
इतर दस्तावेज :- जर तुम्हाला वैद्यकीय कारणासाठी उत्पन्नाचा दाखला लागत असेल तरच डॉक्टरांचे / वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तशा आशयाचे प्रमाणपत्र इथे जोडा अन्यथा हे मोकळे सोडा
वयाचा पुरावा:- दिलेल्या 4 कागदपत्रांपैकी किमान एक पुरावा अपलोड करा.
उत्पन्नाचा पुरावा :- जर तुम्ही व्यावसाईक असाल तर आयकर विभागाचे विवरणपत्र जोडावे लागेल. शेतकरी असाल तर तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला. नोकरी करत असाल तर वेतन मिळत असल्याचा फॉर्म नंबर १६ तुम्हाला इथे जोडावा लागेल. दिलेल्या ५ कागदपत्रांपैकी एक तुम्ही इथे Upload करू शकता.
अनिवार्य कागदपत्रे:-
खाली दिलेलं स्वयंघोषणापत्र download करून ते त्यातील सगळी माहिती भरून सही, फोटोसहित ते तुम्हाला “स्वयंघोषणापत्र” म्हणून Upload करायचे आहेत. इतर कागदपत्राच्या ठिकाणी इतर अधिक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
Upload Documents म्हणाल्यानंतर सगळी Documents अपलोड होतील.

Step 4 :- Fee For Income Certificate
आता शेवटची स्टेप म्हणजे पैसे भरणे. यानंतर तुम्ही कोणत्याही (Online Banking/ Credit Card/ Debit Card/ PayTm / ATM / BHIM App / UPI)पद्धतीने पैसे भरून. पैसे भरल्यानंतरच तुमचा अर्ज तत्सम अधिकाऱ्याकडे जाईल. अर्ज केल्यापासून 21 दिवसात तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला मिळेल.

उत्तर लिहिले · 10/11/2019
कर्म · 2955
0
उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन काढण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स आहेत:

1. वेबसाइटवर जा:

  • महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या वेबसाइटला भेट द्या.

2. नवीन वापरकर्ता नोंदणी (New User Registration):

  • जर तुम्ही या वेबसाइटवर नवीन असाल, तर तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
  • "नवीन वापरकर्ता? येथे नोंदणी करा" (New User? Register Here) या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून नोंदणी करा.

3. लॉग इन करा:

  • नोंदणी झाल्यावर, तुमचा युजर आयडी (User ID) आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.

4. सेवा निवडा:

  • लॉग इन केल्यावर, तुम्हाला विविध सेवांची यादी दिसेल.
  • त्यामध्ये 'महसूल विभाग' (Revenue Department) निवडा.
  • 'उत्पन्न दाखला' (Income Certificate) हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.

5. अर्ज भरा:

  • उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज दिसेल.
  • अर्ज व्यवस्थित भरा. तुमचे नाव, पत्ता, व्यवसाय, वार्षिक उत्पन्न आणि इतर आवश्यक माहिती अचूकपणे द्या.

6. कागदपत्रे अपलोड करा:

  • ओळखीचा पुरावा (Identity Proof) जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, इत्यादी.
  • पत्त्याचा पुरावा (Address Proof) जसे की आधार कार्ड, लाईट बिल, पाणी बिल, इत्यादी.
  • उत्पन्नाचा पुरावा (Income Proof) जसे की मागील वर्षाचे आयकर रिटर्न (ITR),Form 16, किंवा तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला.
  • स्वयंघोषणा पत्र (Self Declaration)

7. शुल्क भरा:

  • अर्ज भरून झाल्यावर, तुम्हाला ऑनलाईन शुल्क भरावे लागेल.
  • तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे शुल्क भरू शकता.

8. अर्ज सादर करा:

  • शुल्क भरल्यानंतर, अर्ज सादर करा.
  • तुम्हाला अर्जाची पावती (Acknowledgement Receipt) मिळेल, ती डाउनलोड करा आणि जपून ठेवा.

9. अर्जाची स्थिती तपासा:

  • तुम्ही आपल्या अर्जाची स्थिती (Application Status) वेळोवेळी तपासू शकता.
  • 'आपले सरकार' वेबसाइटवर लॉग इन करून 'अर्जाची स्थिती तपासा' या पर्यायावर क्लिक करा.

10. दाखला डाउनलोड करा:

  • अर्ज मंजूर झाल्यावर, तुम्ही तुमचा उत्पन्नाचा दाखला वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1760

Related Questions

हे वर्ष 2020 चालू आहे, तर मला पुढच्या दोन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला मिळेल काय?
उत्पन्नाचा दाखला किती वर्षांचा असतो?
उत्पन्नाचा दाखला किती महिन्यांसाठी वैध असतो?
उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन काढता येतो का?
महा सेवा पोर्टलवर उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज केल्यावर हार्ड कॉपी तहसील कार्यालयात जमा करावी लागते का?
सोलापूर सेतू मध्ये उत्पन्न दाखला काढण्यासाठी नवीन ऑनलाईन प्रक्रिया चालू आहे का, त्याबद्दल माहिती मिळेल का?
1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी काय कागदपत्रे लागतात?