2 उत्तरे
2
answers
अमिताभ बच्चन यांचा अपघात कसा झाला?
4
Answer link
अमिताभला एका बुक्कीत गार करणारा पुनीत इस्सार !! ‼*_
साल होतं १९८२. बेंगलोरमध्ये मनमोहन देसाई आपल्या कुली सिनेमाच शुटींग करत होते.अमिताभ सोबत ऋषी कपूर, वहिदा रेहमान, कादर खान, निळू फुले, सुरेश ओबेरॉय, अमरीश पुरी अशी एकापेक्षा एक तगडी स्टारकास्ट होती. रती अग्निहोत्री, शोभा आनंद(हम पांच मधली अशोक सराफची दुसरी बायको बिना) या दोन हिरोईन होत्या.
महत्वाच म्हणजे फायटिंगवाली जबरदस्त स्टोरी होती.
५ जुलैला दुपारी २ वाजता अमिताभ आणि ऋषी कपूर नेहमी प्रमाणे एका कार मधून शुटींगला आले.
पहिला सीन ऋषी कपूरचा होता. त्याला वीस फुटावरून उडी मारायची होती. खाली त्याच्या सुरक्षिततेसाठी बॉक्स आणि जाळी ठेवलेली होती. अक्शन डायरेक्टरने सीन समजावून सांगितला आणि ऋषी कपूरने उडी मारली पण त्याची उडी चुकली. तोंडाला थोड फार खरचटलं.
हे सगळ अमिताभ बघत उभा होता. त्याने ऋषी कपूरला अस्सल अस्सल शिव्या घातल्या. अॅक्टरनी स्वतःची काळजी कशी घ्यावी यावर एक चांगल लेक्चर दिलं. ऋषीने खाली मान घालून ऐकून घेतल.
पुढचा सीन अमिताभचा होता. एका मवाल्याबरोबर तो मारामारी करतोय असा सीन होता. त्या मवाल्याचा रोल केला होता पुनीत इस्सारने. सव्वा सहा फुट उंच, भारदस्त शरीरयष्टी, तसाच दमदार आवाज असलेला, मार्शल आर्ट्सचा चम्पियन पुनीतचा हा पहिलाच पिक्चर होता. आणि तोही बच्चन बरोबर म्हणून खूप एक्साईटेड होता. त्याला सीन समजावून सांगण्यात आला.माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,बच्चनची आणि पुनीतची मारामारी सुरु झाली. एकवेळ अशी होती ज्यात त्याला अमिताभला बुक्की मारायची होती. त्याने बुक्की मारली, अमिताभ कळवला आणि खाली पडला. एका सेकंदासाठी सगळा सेट शांत झाला. काय झालं काय झालं? पुनीतचा ठोसा खरोखर अमिताभला लागला होता हे दिसत होतं. पण काही सेकंदातच बच्चन उभा राहिला.
*“वा बच्चन साबने क्या अॅक्टिंग की है.”*
सगळ्यांनी सेटवर टाळ्या वाजवल्या. बच्चनने सुद्धा अगदी कमरेत वाकत वाकत अभिवादन केलं. एका टेकमध्ये शॉट ओके झाला होता. पुढच्या सीनची तयारी सुरु झाली. एवढ्यात ऋषी कपूरला एक मेकअपमन येऊन म्हणाला,
*अमितजी को कुछ तो हुआ है वो गार्डन मै लेटे हुये है.”*
ऋषी कपूर जाऊन पाहतो तर काय बच्चन अगदी वेदनेने तडपत होता. काही क्र्यू मेम्बर्सनां वाटल की बच्चन आता पण अॅक्टिंगच करतोय. पण काही वेळाने कळाल मॅटर सिरीयस आहे. त्याला हॉटेलवर नेण्यात आल. बेंगलोरच्या डॉक्टरांनी काही तरी जुजबी उपचार केले. पण बच्चनची वेदना काही कमी झाली नाही.
सगळ्यांना वाटत होत फक्त एक बुक्की तर लागली आहे, त्यात एवढ महाभारत होण्यासारखं काय आहे. पण जसा जसा वेळ जाईल बच्चनची कंडीशन बिघडत चालली होती. तो कोमामध्ये गेला. त्याला तातडीने मुंबईच्या ब्रीचकँडी हॉस्पिटलला हलवण्यात आल. तिथल्या डॉक्टरांनी जाहीर केलं,
*इंडिया सुपरस्टार अमिताभ बच्चन जिंदगी और मौत की लढाई लढ रहा है.*
अख्खा देश हादरला. देशाच्या पंतप्रधानांपासून ते फुटपाथ झोपणाऱ्या फाटक्या माणसापर्यंत सगळे जण आपला हिरो वाचवा म्हणून देव पाण्यात घालून बसले. ब्रीचकँडीच्या बाहेर तुफान गर्दी झाली. अगदी आपले मिथुनदा चक्रवर्ती यांनी सुद्धा आपली छाती चिरून त्या रक्ताने काली मांचा अभिषेक केला. रोज पेपरची हेडलाईन बच्चनच्या तब्येतीची असायची.
या दरम्यान पुनीतची काय हालत झाली असेल तुम्ही विचार करा. त्या एका बुक्कीमुळे तो देशाचा शत्रू नंबर वन झाला होता. अनेकांना वाटत होतं की त्याने मुद्दामहून तो शॉट मारला होता. पण तस काही नव्हत. बिचाऱ्या पुनीतला रोज धमक्या येऊ लागल्या. त्याने घाबरून घरातून बाहेर पडायचंही बंद केलं होत.
इकडे बच्चनच ऑपरेशन झालं. त्याच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होऊ लागली.
एकदिवस मनमोहन देसाई पुनीतला भेटायला आला. त्याने त्याला ब्रीचकँडी हॉस्पिटलला नेलं. पुनीत घाबरत घाबरत बेडवर झोपलेल्या बच्चनला सामोरे गेला. पण अमिताभने त्याला दिलासा दिला.
“हा अपघात होता आणि तो माझ्या हातूनही झाला असता. DONT WORRY. मी तुझ्यावर चिडलेला नाही आहे.”
एवढच नाही अमिताभ पुनीतच्या खांद्याचा आधार घेत बाहेर आला. त्याने तिथे जमलेल्या जनतेपुढे येऊन हात हलवला. त्यातून लोकांना कळाल की बच्चनने पुनीतला माफ केलं आहे. पुनीतचा जीव वाचला.
पुढे अमिताभ बरा होऊन परत आला. अर्धवट राहिलेलं शुटींग पूर्ण केलं. कुली रिलीज देखील झाला. मनमोहन देसाई यांनी एक हुशारी केली होती. बच्चनला अपघात झाला तो सीन पडद्यावर आला की काही काळ तिथे सिनेमा थाबायचा. आणि संदेश दिसायचा,
*“इसी शॉट में अमिताभ बच्चन को चोट लगी थी.”*
पुनीत इस्सारचा तो शक्तिशाली ठोसा बघून थिएटरमधलं पब्लिक ही थरारून जायची. पुनीतच्या नावाने बोट मोडली गेली.

0
Answer link
अमिताभ बच्चन यांचा अपघात 1982 मध्ये 'कुली' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाला होता.
कुली चित्रपटातील एका फाइट सीनचे शूटिंग बंगळूरमध्ये चालू होते. या सीनमध्ये अभिनेते पुनीत इस्सर यांना अमिताभ बच्चन यांच्या दिशेने ठोकर मारायची होती.
टेबल आणि अमिताभ बच्चन यांच्यातील वेळेचा अंदाज चुकला आणि टेबलचा कोपरा त्यांच्या पोटाला लागला.
या अपघातामुळे त्यांच्या आतड्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना अनेक महिने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर, संपूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता आणि त्यांचे चाहते त्यांच्या आरोग्यासाठी चिंतित होते.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: