4 उत्तरे
4
answers
आदर्श घराबद्दलची कल्पना काय आहे?
5
Answer link
आदर्श घर म्हणजे काय? घर म्हणजे चार भिंती नव्हे, त्या घरातील माणसे सुसंस्कृत असली पाहिजे. आई-वडिलांचा आदर ठेवणारी, परक्यांचा मान ठेवणारी, 'अतिथि देवो भव' सन्मान करणारी, मुख्यतः सुनेला मुलीसारखे वागवणारे, संकट समयी धावून जाणारी, गोरगरिबांना मदत करणारी, परोपकारी, भूतदयेची जाण असणारी, नसानसात धार्मिकता भिनलेली ह्याला आदर्श घर म्हणतात.
3
Answer link
आदर्श घर ही कल्पना समाजाच्या नजरेतून असते, असे मला वाटते. समाजातील काही जनता ज्या घराला 'आदर्श घर 'म्हणते, काही जनतेचे त्याच घराविषयीचे मत त्याविरुद्ध असते.
तरी देखील माझ्या मते,
ज्या घरी सर्व सदस्य एकमेकांना समजून घेऊन कुटुंब निर्वाह करीत असल्याचे दिसते,
सर्वांचा मान सन्मान ज्या घरी व्यवस्थित होतो,
ते घर *आदर्श घर* म्हणावे.
तरी देखील माझ्या मते,
ज्या घरी सर्व सदस्य एकमेकांना समजून घेऊन कुटुंब निर्वाह करीत असल्याचे दिसते,
सर्वांचा मान सन्मान ज्या घरी व्यवस्थित होतो,
ते घर *आदर्श घर* म्हणावे.
0
Answer link
उत्तरासाठी येथे काही कल्पना आहेत:
आदर्श घर ही एक अशी जागा आहे जिथे प्रेम, आपुलकी आणि सुरक्षितता असते. हे केवळ विटा आणि सिमेंटचे बांधकाम नसते, तर ते एक भावनात्मक आणि मानसिक আশ্রয়स्थान असते.
आदर्श घराची काही वैशिष्ट्ये:
- सुरक्षित वातावरण: घरात शारीरिक आणि मानसिक सुरक्षितता असावी.
- प्रेमळ संबंध: कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, आदर आणि समजूतदारपणा असावा.
- स्वच्छता आणि आरोग्य: घर स्वच्छ आणि आरोग्यदायी असावे.
- सुविधा: घरात आवश्यक सुविधा असाव्यात, ज्यामुळे जीवन सुखकर होईल.
- व्यक्तिमत्त्वाचा विकास: घरात प्रत्येक सदस्याला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याची संधी मिळावी.
याव्यतिरिक्त, आदर्श घर हे प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार बदलू शकते. त्यामुळे, आदर्श घराची व्याख्या व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकते.