आयुष्य प्राणी पाळीव प्राणी

मांजरीचे आयुष्य किती असते?

2 उत्तरे
2 answers

मांजरीचे आयुष्य किती असते?

14
मांजरी चे आयुष्य 20 ते 25 वर्ष असते.

मांजर हा मार्जार जातीतील एक मांसाहारी भूचर सस्तन प्राणी आहे. जगातील व प्रदेशांत मांजर पाळीव प्राणी म्हणून ओळखले जाते. मांजराला वाघांची मावशी असे म्हणतात, आणि वाघांना शिकार करायला मांजराने शिकवले आहे.

मांजर हा पाळीव प्राणी म्हणून खूप प्रसिद्ध आहे. मांजराचे अनेक प्रकार आहेत. मांजर हा प्राणी अनेक रंगामध्ये असतो. मांजराचे मुख्य भक्ष्य उंदीर, विविध पक्षी, इतर छोटे प्राणी व दूध आहे . क्वचित मांजर गवत देखील खाताना आढळते, परंतु असे आचरण साधारणतः क्षुधापूर्तीसाठी नसते. मांजराकडे पालेभाज्या पचवण्याची क्षमता नसल्याने, जेव्हा मांजर गवत खाते, अशा वेळेस, वमन क्रियेद्वारे मांजराच्या पोटातून गवताबरोबर इतर अपायकारक पदार्थ बाहेर पडतात. मांजर हा असा प्राणी आहे जो दिशा लक्षात घेऊन घरी परत येतो. माणसाच्या शरीरात 206 हाडे असतात पण मांजराच्या शरीरात 280 हाडे असतात. मांजरं आपल्या उंचीच्या तिनपट उंचीवर उडी मारून सुरक्षित अवस्थेत परत जमिनीवर येतात. मांजर हे प्राणी जन्मतःपासून भांडखोर वृत्तीचे असतात. मांजरीण एकावेळी 3 ते 5 पिल्लांना जन्माला घालते.
उत्तर लिहिले · 9/7/2019
कर्म · 3930
0

मांजरीचे सरासरी आयुष्य 12 ते 15 वर्षे असते. काही मांजरी 20 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जगू शकतात.

मांजरीच्या आयुष्यावर परिणाम करणारे काही घटक:

  • आहार: संतुलित आणि पौष्टिक आहार मांजरीच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
  • घरामध्ये राहणे: घरामध्ये राहणाऱ्या मांजरी बाहेर फिरणाऱ्या मांजरींपेक्षा जास्त काळ जगतात, कारण त्यांना अपघात आणि रोगांचा धोका कमी असतो.
  • आरोग्य सेवा: नियमित लसीकरण आणि पशुवैद्याकांकडून तपासणी मांजरीला निरोगी ठेवण्यास मदत करते.
  • जाती: काही जाती इतर जातींपेक्षा जास्त काळ जगतात.

तुम्ही तुमच्या मांजरीची योग्य काळजी घेतल्यास, ती दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकेल.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5060

Related Questions

अहमदाबाद येथे कुत्र्यांच्या ट्रस्ट बद्दल माहिती द्या?
नर मांजर दोन दिवसांपासून घरी आले नाही?
मांजरी घर सोडून जाऊ नये यासाठी काही उपाय आहे का?
रोड डॉग पाळल्यास काय काय अडचणी येतात?
मस्त कडकनाथ कोंबडी विषयी माहिती मिळेल का?
कविता आकलनाच्या विविध पध्दतींची थोडक्यात माहिती लिहा?
दोन पाळीव प्राण्यांची नावे लिहून त्यांचे उपयोग कसे लिहाल?