प्रवास
मुंबई
रेल्वे प्रवास
मुंबई ते तुळजापूर तुळजाभवानी आईच्या दर्शनासाठी ट्रेन आणि एसटी बसने कसे जावे लागेल? तसेच, तिकीट खर्च साधारणपणे किती असेल?
3 उत्तरे
3
answers
मुंबई ते तुळजापूर तुळजाभवानी आईच्या दर्शनासाठी ट्रेन आणि एसटी बसने कसे जावे लागेल? तसेच, तिकीट खर्च साधारणपणे किती असेल?
4
Answer link
तुळजापूरच्या ठिकाणी सकाळी जाणे योग्य ठरते साधारणता सर्वजण तुळजापूर तिथे प्रथेप्रमाणे सुरवातीच कल्लोळात आंघोळ करून जाण्याची पद्धत आहे आणि माझ्यामते तरी योग्य वेळ सकाळची ठरते आणि त्यानंतर अक्कलकोट व पंढरपूरही दुसरे गाव हे तेथील प्रसिद्ध असल्याने ते सर्व मार्ग क्रमाने वेळ देण्याचा प्रेफरन्स ने सकाळी प्रवास योग्य वेळेस ठरतो त्याप्रमाणे आपल्याला खालील रेल्वे पत्रक पाठवले आहे प्रामुख्याने तुम्हाला तुळजापूर पर्यंत मुंबईहून थेट गाडी मिळवणे खूप कठीण आहे तुम्हाला याबाबत सोलापूर पासून योग्य वारंवारिता वेळा प्रमाणे नियमित एसटी ही गाडी मिळेल तुम्ही सोलापूर या शहराला येऊन तिथून पुढील प्रवास ठरवावा जर रेल्वेचा प्रवास तुम्हाला तिकीट मिळत नसल्यामुळे अयोग्य वाटत असेल तर सरळ तुम्ही 4 दिवसाच्या महाराष्ट्र राज्य एसटी परिवहन ट्रान्सपोर्ट सेवेचा महाराष्ट्रात कुठे फिरण्याचा पास काढावा तो साधारणता तुम्हाला एकासाठी बाराशे रुपये पर्यंत लागेल तो निवडला तर तुम्हाला शिवशाही सारख्या बस प्रवास करू शकतात असा निवडून प्रवास करू शकता आणि एसटीने साधारणत मुंबई ते तुळजापूर प्रवास हा कमीत कमी दहा तासाचा असू शकतो
१.सी एस एम टी गदग एक्सप्रेस(१११३९)
सीएसटीपासून(वेळ२१.२०)ते सोलापूर(५.२५)
२.हुसेनसागर एक्सप्रेस(१२७०१)
सीएसटीपासून(वेळ२१.५०)ते सोलापूर(५.४०)
३.कोईमतूर एक्सप्रेस(११०१३)
लोकमान्य टिळक टर्मिनसपासून(वेळ२२.३५)ते सोलापूर(६.३०)
४.सिद्धेश्वर एक्सप्रेस(१२११५)
सीएसटीपासून (वेळ २२.४५) ते सोलापूर(६.५०)
रेल्वेचे दर साधारणतः अडीशे ते साडेतीनशे रुपये पर्यंत एका व्यक्तीस आहे तेही सद्यपरिस्थितीत मिळत नाही तात्काळ मध्ये पाहिले तर साडेचारशे ते पाचशे रुपये पर्यंत एकाचे त्याप्रमाणे आपण प्रवासाचे एस्टिमेट काढावे नाहीतर मुंबई ते तुळजापूर एसटी चे साधारणत कमीत कमी एका व्यक्तीचे सातशे रुपये 800 रुपये हे गृहीत धरून तयारी ठेवावी नाही तर माझ्या मते वरील पास हा योग्य आहे

हे एक वर्षापूर्वीचे यानुसारच पुढील दर ठरवावे आणि महाराष्ट्रात चांगल्या ठिकाणी शिवशाही सारखी बस ही जास्त अनुषंगाने प्रवासात वापरले जात असल्याने आंतरराज्य हे सर्व महाराष्ट्रीयन बस यासाठी पास चालत असलेल्या पासचा वापर करावा

0
Answer link
मुंबई ते तुळजापूरला तुळजाभवानी आईच्या दर्शनासाठी ट्रेन आणि एसटी बसने कसे जायचे, याची माहिती खालीलप्रमाणे आहे:
१. ट्रेनने:
-
मुंबई ते सोलापूर:
- मुंबईहून सोलापूरसाठी अनेक ट्रेन्स उपलब्ध आहेत.
- तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) किंवा दादर (Dadar) येथून सोलापूरला जाणाऱ्या ट्रेन्स शोधू शकता.
- सोलापूरला जाण्यासाठी साधारणपणे ८ ते १० तास लागतात.
-
तिकीट खर्च:
- जनरल क्लास: रु. २००-३००
- स्लीपर क्लास: रु. ४००-६००
- एसी (AC) क्लास: रु. १२००-२००० (डब्यानुसार)
-
सोलापूर ते तुळजापूर:
- सोलापूर रेल्वे स्टेशनवरून तुळजापूरसाठी तुम्हाला बस किंवा टॅक्सी पकडावी लागेल.
- सोलापूर ते तुळजापूर साधारणपणे ५०-६० किलोमीटर आहे.
- बसने जायला साधारणपणे १ ते १.५ तास लागतात.
- बस तिकीट खर्च: रु. ८०-१२०
- टॅक्सीने जायला १ तास लागतो आणि खर्च रु. ८००-१२०० असतो.
२. एसटी बसने:
-
मुंबई ते तुळजापूर:
- मुंबई सेंट्रल बस डेपो (Mumbai Central Bus Depot) किंवा दादर (Dadar) येथून तुम्हाला तुळजापूरसाठी थेट एसटी बसेस मिळतील.
- मुंबई ते तुळजापूर बसने जायला साधारणपणे १२ ते १४ तास लागतात.
-
तिकीट खर्च:
- साधी बस: रु. ५००-७००
- निमआराम (Semi-Luxury) बस: रु. ७००-९००
- आराम (Luxury) बस: रु. ९००-१२००
३. एकूण अंदाजित खर्च:
-
ट्रेनने:
- जनरल क्लास: रु. २८०-४२०
- स्लीपर क्लास: रु. ४८०-७२०
- एसी क्लास: रु. १२८०-२१२०
- एसटी बसने: रु. ५००-१२०० (बस प्रकारानुसार)
४. महत्वाचे:
- तिकीट बुकिंग करताना, प्रवासाच्या वेळेनुसार आणि उपलब्धतेनुसार दरांमध्ये बदल होऊ शकतात. त्यामुळे तिकीट काढण्यापूर्वी दरांची खात्री करा.
- तुम्ही IRCTC (https://www.irctc.co.in/ - भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट) किंवा MSRTC (https://msrtc.maharashtra.gov.in/ - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ) च्या वेबसाईटवर ऑनलाइन तिकीट बुक करू शकता.