कागदपत्रे जात व कुळे जात जात प्रमाणपत्र

ST जातीचा दाखला काढण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात?

2 उत्तरे
2 answers

ST जातीचा दाखला काढण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात?

12
जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे :
1. विहित नमुन्यात अर्ज
2. प्रतिज्ञापत्र
3. अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला.(जातीच्या उल्लेख असलेला )
4. रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचा पुरावा.(शाळेचा दाखला /जन्म – मृत्यु नोंद असलेला)
5. समाज संघटनेकडील जातीचे प्रमाणपत्र ( ओ.बी.सी )
6. तलाठी यांचा रहिवाशी व जातीचा दाखला.
7. रेशनकार्ड.
8. महसुली पुरावा म्हणुन 7/12 व नाते प्रस्थापित करणेसाठी वारसा डायरी.टीप :
1. अनुसूचित जाती ( एस.सी) 1950 पूर्वीच्या जातीचा पुरावा
2. विमुक्त जाती (व्ही.जे ) 1961 पुर्वीचा पुरावा
3. भटक्या जाती (एन.टी ) 1961 पुर्वीचा पुरावा
4. इतर मागास (ओ.बी.सी) 1967 पुर्वीचा पुरावा
5. विशेष मागास प्रवर्ग ( एस.बी.सी ) 1961 पुर्वीचा पुरावा
6. अनुसूचित जमाती ( एस.टी ) 1950 पुर्वीचा जातीचा पुरावा
उत्तर लिहिले · 23/1/2019
कर्म · 35170
0

ST (अनुसूचित जमाती) जातीचा दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे:

अर्जदाराची माहिती:
  • अर्जदाराचा फोटो
  • ओळखपत्र (आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड, इ.)
  • जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
  • ration card (रेशन कार्ड)
वडिलांविषयी माहिती:
  • वडिलांचा जातीचा दाखला (असल्यास)
  • वडिलांचा जन्म दाखला
  • वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला
  • वडिलांचे आधार कार्ड
इतर आवश्यक कागदपत्रे:
  • वंशावळ (family tree)
  • ग्रामपंचायत / नगर पालिका दाखला
  • तलाठी यांचा दाखला
  • affidavit (शपथपत्र)

नोंद: जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी संबंधित शासकीय कार्यालयाकडून (तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्र) अधिकृत माहिती घेणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी, आपण महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: https://sjsa.maharashtra.gov.in/

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 2200

Related Questions

मी SC कॅटेगरीत आहे, मला माझ्या मुलींचा जातीचा दाखला काढायचा आहे. माझ्याकडे कागदपत्रांसाठी 1950 अगोदरचे कोणतेही कागदपत्र नाही, तर मी काय करावे?
कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी यामध्ये काय फरक आहे? जात मराठा आहे पण आरक्षणासाठी कुणबी काढले आहे. जातीच्या दाखल्यावर फक्त कुणबी असा उल्लेख आहे, मराठा कुणबी असा नाही, तर फक्त कुणबी उल्लेख असल्यामुळे अडचण येणार नाही ना?
माझ्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू-मराठा जात लिहिली आहे आणि माझ्या वडिलांच्या दाखल्यावर हिंदू-इतर लिहिले आहे, तर मी हिंदू ओबीसीचा दाखला काढू शकतो का? वडिलांचा जन्म 1964 सालचा आहे, पण आजोबांच्या दाखल्याचा काहीच पुरावा मिळत नाही, म्हणून मी ओबीसीचा दाखला काढू शकतो का?
भारतीय सैन्य मध्ये जात वैधता SC जाती साठी लागू आहे का?
माझ्या शाळेतील दाखल्यावर हिंदू वंजारी मराठा अशी जात लागली आहे, माझी जात हिंदू वंजारी आहे. मला दाखल्यावर हिंदू वंजारी जात लावायची आहे, त्यासाठी काय करावे लागेल?
माझे वडील कर्नाटकचे होते, जन्म १९४७ चा आहे. ते चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात स्थायिक झाले. ते आता हयात नाहीत. मला अनुसूचित जातीचा दाखला दोन्हीकडील तहसीलदार नाकारत आहेत. मी काय करावे? जातीचा पुरावा कर्नाटकचा व इतर सर्व महाराष्ट्रातील आहे.
मी ओबीसी आहे, मला ओपन मध्ये जात बदल करता येणार का?