संस्था सामाजिक

नाम फाऊंडेशनची संपर्कासह सविस्तर माहिती मिळेल का?

3 उत्तरे
3 answers

नाम फाऊंडेशनची संपर्कासह सविस्तर माहिती मिळेल का?

7
नाम फाऊंडेशन हे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेया मराठी सिनेअभिनेत्यांनी सुरु केलेली एक धर्मादाय संस्था आहे. ह्या संस्थेची स्थापना सप्टेंबर २०१५मध्ये झाली. ही संस्था महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करते.
सुरुवातीला नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २०१५ या वर्षी आत्महत्या केलेल्या २३० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजारांचा धनादेश, ब्लँकेट, साडी-चोळी, वर्षभराचे मेडिकल किट असे मदतीचे स्वरूप होते.परंतु, फक्त काही निवडक कुटुंबीयांना मदत करण्यापेक्षा या मदतीची व्याप्ती वाढवण्यासाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एका सामाजिक संस्थेची स्थापना करण्याचे ठरवले. मदतीचे स्वरूप फक्त आर्थिक मदत न रहाता, शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना काही पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे याकडे पण लक्ष देता यावे यासाठीसुद्धा या संस्थेची कल्पना पुढे आली. या कल्पनेचे रुपांतर नाम फाउंडेशन या संस्थेमध्ये झाले. नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये पुण्यातील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात संस्थेची नोंदणी केली.

http://naammh.org/contact/

वरील वेबसाईटवर तुम्हाला संपर्क आणि अधिक महिती मिळेल.
उत्तर लिहिले · 9/1/2019
कर्म · 99520
1
फोन नंबर द्या.
उत्तर लिहिले · 4/3/2023
कर्म · 20
0

नाम फाऊंडेशन ही महाराष्ट्रातील एक सामाजिक संस्था आहे, जी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत करते. याची स्थापना अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी केली आहे.

संपर्क:

  • पत्ता: नाम फाऊंडेशन, एफ-१०, म्हाडा कॉलनी, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०००५१.
  • दूरध्वनी: +91 9820251008
  • ईमेल: namfoundation@gmail.com
  • वेबसाईट: नाम फाऊंडेशन

नाम फाऊंडेशन विषयी अधिक माहिती:

  • नाम फाऊंडेशन शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवते, जसे की जलसंधारण, शेती प्रशिक्षण, आणि आर्थिक मदत.
  • या संस्थेमुळे अनेक शेतकर्‍यांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यात यश मिळाले आहे.

तुम्ही अधिक माहितीसाठी त्यांच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 2200

Related Questions

गरीब कुटुंब कुटुंबप्रमुखाचे मृत्यू कथा लेखन?
मराठा व्यक्ती लिंगायत धर्माचा स्वीकार कसे करू शकतात?
वाढदिवसाच्या शुभेच्छा, भावी अधिकारी?
Birthday wishes line sathi kahi vakya?
खेड्यांच्या विकासासाठी ग्राम गौरव प्रतिष्ठानने कोणती उद्दिष्ट्ये बाळगली आहेत?
वृद्धाश्रम चालवण्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करावी लागतात?
वृद्धांची सेवा क्षेत्रे किती आणि कोणती?