2 उत्तरे
2
answers
पत्र कसे पाठवतात?
4
Answer link
पत्र पाठवण्यासाठी आपल्याला लागेल.
१. कागद पेपर
२. लिफाफा
३. पत्ता
४. पोस्ट अॉफिस
वहिच्या कागदावर आपण हवं ते लिहून समोरच्याला पाठवू शकतात. जे लिहायचं आहे ते लिहून झाल्यावर कागद लिफाफ्यात घडी करून टाकायचा. लिफाफा बोले तो "ऐन्वेलोप" इंग्रजीत. आणि लिफाफ्याच तोंड डिंकाने किंवा स्टेपल्स पिनांनी बंद करावे.
आता लिफाफ्याची ची समोरची बाजु आहे त्यावर मोठ्या ठळक अक्षरांमध्ये "प्रति," असं लिहून खाली जिथं पत्र पाठवायचं आहे त्या व्यक्तीचा किःवा जागेचा संपुर्ण पत्ता लिहावा. आणि न विसरता त्या जागेचा पिन कोड लिहावा. आणि लिफाफ्याचा मागच्या बाजूला "कडून," असं लिहून तुमचा संपुर्ण पत्ता लिहावा. जर पत्र पोहोचले नाही तर ते तुमच्या ह्या पत्त्यावर परत येईल.
मग ते पत्र पोस्टात द्यावे. ते पत्राच वजन करतील आणि कुठे पाठवायचे आहे त्या हिशोबाने ४-५ रूपयाचं त्याला तिकीट लावतील. आपणांस तिकिट लावायला दिले तर आपण ते तिकीट पत्राच्या समोरील बाजूवर कुठेही चिपकवू शकतात.
स्पिड पोस्ट सेवा आपण वापरू शकता ज्याने २०-४० रूपये वरचे द्यावे लागतात परंतू पत्र लवकर पोहोचते. एकदा तिकीट लावून झालं, पैसे दिले गेले की ते पत्र घेवून बाहेर लावलेल्या लाल पेटीत टाकून द्यावे. आपले पत्र आठवड्या भरात हवं तेथे पोहोचून जाईल.

0
Answer link
पत्र पाठवण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
- पत्र लिहा: सर्वप्रथम, तुम्हाला जे काही लिहायचे आहे ते एका कागदावर लिहा.
- पत्राचा मसुदा तपासा: पत्र लिहून झाल्यावर, एकदा तो व्यवस्थित तपासा. व्याकरण आणि स्पेलिंगच्या चुका तपासा.
- योग्य आकारात फोल्ड करा: पत्र योग्य आकारात फोल्ड करा.
- लिफाफा (Envelope):
- एक लिफाफा घ्या.
- लिफाफ्याच्या समोरच्या बाजूला ज्याला पत्र पाठवायचे आहे त्याचे नाव, पत्ता आणि पिन कोड लिहा.
- लिफाफ्याच्या मागच्या बाजूला तुमचा स्वतःचा पत्ता लिहा.
- तिकीट लावा: तुमच्या पत्त्याजवळील पोस्ट ऑफिसमधून योग्य किमतीचे तिकीट खरेदी करा आणि ते लिफाफ्यावर लावा.
- पोस्ट करा: तुमचे पत्र पोस्ट ऑफिसमध्ये जमा करा किंवा पोस्ट बॉक्समध्ये टाका.
हे सर्वसाधारण मार्गदर्शन आहे आणि तुमच्या गरजेनुसार यात बदल होऊ शकतात.
अधिक माहितीसाठी, तुम्ही भारतीय पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: भारतीय पोस्ट