प्रवास
रंग
परिवहन
सार्वजनिक वाहतूक
महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या ज्या विविध रंगाच्या बसेस आहेत त्या रंगांचा नेमका अर्थ काय?
2 उत्तरे
2
answers
महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या ज्या विविध रंगाच्या बसेस आहेत त्या रंगांचा नेमका अर्थ काय?
9
Answer link
असे तर बसेसचे बरेच प्रकार आहेत परंतु मुख्यतः ४ प्रकार महाराष्ट्र परिवहन महामंडळ जास्त वापरते ते खालीलप्रमाणे.
प्रकार १ :
"Day/Night Ordinary" : सामान्य प्रकारची बस सुविधा असलेली बस पुर्णताः लाल रंगाची असते. Ordinary बसचे एकच उद्दिष्ट असते ते म्हणजे प्रत्येक गावात, खेडोपाड्यात जाऊन प्रवाशांना सेवा द्यायची मग रस्ता कसा ही असो, वेळ काय ही असो. ह्या बसची अजुन एक खासियत अशी की वयस्कर व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राजकारणी सभासद आणि शाळेकरी विद्यार्थ्यांना सवलत देणे. ह्या प्रकारच्या बस सगळीकडे मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. बैठकीची व्यवस्था २ बाय २ किंवा २ बाय ३ असते. म्हणजे एका बाजुला ३ जण बसु शकतात तर एका बाजूला २ असे.
प्रकार २ :
"परिवर्तन २*२" : हे बसेस त्यांच्या नावावरुनच समजतात. परिवर्तन बसेस थोड्या जास्त चांगल्या असतात दिसण्यात आणि बसण्यातही.. ह्यांना परिवर्तन टू बाय टू ही म्हणतात. ह्यांचा रंग लाल किंवा पुर्णताः निळा असतो. त्यांच डिझाईन ordinary बसेस पेक्षा जास्त चांगल, शार्प आणि ठिसुळ असते. चालतांना ह्या थोडं कमी आवाज करतात. बैठकीची व्यवस्था २ बाय २ चंं असते. सीट मुख्यतः काळ्या रंगाचे आणि जास्त आरामदायी असतात आणि चालकाला स्वताःचा स्वतंत्र कॕबीन असतो. पुर्णपणे निळ्या रंगाच्या बसेस सुरुवातीला स्पेशल मुलीं आणि स्त्रीयांसाठी सुरु झालेल्या. परंतु नंतर परिवर्तन २*२ पण ordinary सारखीच झाली.
प्रकार ३ :
"एशियाड" (Asiad) : Ordinary आणि परिवर्तन २*२ मध्ये प्रवास जास्त लांबचा असेल तर तो आरामदायी नसतो. कारण गर्दी खुप असते, ह्या बसेस थांबा खुप घेतात. मग लांबचा पल्ला गाठतांना त्रास हमखास होतो. ह्यासाठीच एशियाड बसेस आहेत. ह्या रंगाने पांढरे, हिरवे किंवा फिक्कट आकाशी रंगाच्या छटेचे असतात. इंग्रजीत बोले तो Semi Luxury. ह्या बसेस कमी थांबा घेणारे, जलद गतीचे, आरामदायी मऊमऊ सीट असणारे, थोडंस भाडं जास्त आकारणारे, कमी गर्दीचे असतात आणि महत्त्वाचे म्हणजे एसी(AC - Air Conditioner) नसलेले असतात.
प्रकार ४ :
"शिवनेरी" : एशियाड आणि शिवनेरी बस सेवेत फरक तो हाच की बैठक जास्त आरामदायी, सोयिस्कर, परिवर्तनशील असते. परिवर्तनशील म्हणजे शिवनेरीचे सीटचा आकार, लांबी आपण बदलू शकतो शिवाय ह्या बसेस पुर्णताः AC असतात. इंग्रजीत बोले तो AC Semi Luxury, Semi Sleeper Coach होय. ह्या बसेस वोल्वो B7R प्रकारच्या असुन पांढऱ्या, भगव्या रंगाची छटा असलेले वोल्वो बसेस असतात. ह्यांपण जास्त थांबा घेत नाही, लांबचा पल्ला गाठणारे, फुल AC, अडजेस्टेबल सीट आणि भाडे आकार जास्तच असलेले बसेस आहेत.
ह्या ४ मुख्य प्रकार शिवाय; शितल, यात्रा स्पेशल, सामान/कुरीअरची देवाणघेवाण करणारे, सिटी बसेस आणि सिटी दर्शन असे ही प्रकार पडतात.

0
Answer link
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) विविध रंगांच्या बसेस त्यांच्या प्रकारानुसार दर्शविल्या जातात, ज्यामुळे प्रवाशांना त्यांची निवड करणे सोपे होते. खाली काही प्रमुख रंगांच्या बसेस आणि त्यांचा अर्थ दिला आहे:
-
लाल रंग (Red Color):
लाल रंगाच्या बसेस सामान्यतः साध्या किंवाNon-AC (non-air conditioned) असतात. साधी लाल बस: गावाला जोडणारी आणि कमी थांब्यांवर थांबणारीStandard बस असते.
-
निळा रंग (Blue Color):
निळ्या रंगाच्या बसेस वातानुकूलित (AC) असतात, ज्या शहरी भागांमध्ये आणि लांबच्या मार्गांवर चालतात.
शितल (Sheetal): ह्या निळ्या रंगाच्या वातानुकूलित बसेस आहेत.
-
हिरवा रंग (Green Color):
हिरव्या रंगाच्या बसेस ग्रामीण भागासाठी असतात. या बसेस दुर्गम भागांना जोडतात.
ग्रामीण बस: ग्रामीण भागांसाठी हिरव्या रंगाची बस असते.
-
राखाडी आणि नारंगी रंग (Grey and Orange Color):
राखाडी आणि नारंगी रंगाच्या बसेस विशेषतः शिवशाही (Shivshahi) प्रकारात येतात, ज्या वातानुकूलित आणि जलद प्रवासासाठी ओळखल्या जातात.
शिवशाही (Shivshahi): ह्या वातानुकूलित (AC) बसेस आहेत.