स्वच्छता
घर
ढेकूण
कीटक नियंत्रण
घरगुती
घरामध्ये ढेकूण झाले आहेत, औषध फवारणी केली तरीही कमी होत नाहीत?
3 उत्तरे
3
answers
घरामध्ये ढेकूण झाले आहेत, औषध फवारणी केली तरीही कमी होत नाहीत?
6
Answer link
घरातील ढेकूण अत्यंत त्रासदायक कीटक… अल्पावधीतच त्यांची फौज तयार होण्यास वेळ लागत नाही… रात्रीच्या वेळेस तर त्यांचा विशेष त्रास जाणवतो. ते चावले तर त्वचाविकार होतात. हा त्रास दूर करण्यासाठी नियमित पेस्ट कंट्रोल करणे हा उपाय असला तरी यामुळे काही दुष्परिणामही होऊ शकतात. याकरिता ढेकणांना घराबाहेर काढण्यासाठी काही सुरक्षित घरगुती उपाय…
पुदिना
ढेकणांना पुदिन्याचा वास असह्य होतो. त्यामुळे या वासाने ते दूर पळतात. यासाठी झोपताना अंथरुणाजवळ पुदिन्याची ताजी पानं पसरवून ठेवा. लहान मुलांच्या पाळण्यातही पुदिन्याची पानं ठेवू शकता. पुदिन्याची पानं चुरून त्याचा रस शरीराला लावून झोपल्यानेही ढेकूण लांब राहतील.
कडुलिंबाचे तेल
कडूलिंबामध्ये दाहशामक आणि कीटकनाशक क्षमता आहे. तसेच कडूलिंबातील ऍन्टी मायक्रोबायल गुणधर्म घरातील अनेक कीटकांचा त्रास कमी करण्यासाठी मदत करतात. ढेकणांवर कडूलिंबाच्या तेलाचा शिडकाव करा. या प्रयोगामुळे अवघ्या आठवडाभरात ढेकणांचा त्रास कमी होण्यास मदत होईल. कपडे धुताना डिटर्जंट पावडरसोबत कडुलिंबाच्या तेलाचा समावेश केल्याने ढेकणाचा त्रास कमी होईल.
टी ट्री ऑईल
टी ट्री ऑइलमध्ये ऍन्टी मायक्रोबियल गुणधर्म असतात. यामुळे ढेकणांचा त्रास दूर ठेवण्यास मदत होते. टी ट्री ऑईल पाण्यात मिसळून त्याचा स्प्रे बनवा. हा प्रे भिंती, पलंग, कपाटं, पडदे, फर्निचर गाद्यांवर शिंपडा. आठवडाभर जेथे ढेकणांचा हमखास वावर असतो तेथे टी ट्री ऑईलचा स्प्रे केल्याने ढेकणांचा त्रास कमी होईल.
निलगिरी
ढेकूण दिसल्यास त्यावर निलगिरीचे काही थेंब शिंपडा. यामुळे ढेकूण दूर जातील. शिवाय रोजमेरी, लॅवेंडर या तेलांमध्ये निलगिरीचे तेल मिसळून त्याचा वापर करा. सर्दी पडशाच्या त्रासाला दूर ठेवण्यासोबतच ढेकणांचा त्रास टाळण्यासाठीही निलगिरी फायद्याची आहे.
लॅवेंडर तेल
ढेकणांना दूर ठेवण्यासाठी लॅवेंडरच्या पानांचा वापर करा. लॅवेंडरची पाने कपडय़ांवर घासा. लॅवेंडर परफ्युम शिंपडल्यानेही ढेकूण दूर राहू शकतात. पुदिन्याप्रमाणेच लॅवेंडर तेलाचा वासही ढेकणांना सहन होत नाही. या तेलाच्या सुगंधामुळे प्रसन्नता वाटतेच. शिवाय डास, ढेकूण असे कीटकही दूर राहतात.

ढेकूण मारण्यासाठी घरगुती उपाय (
घरात ढेकून झाले असतील तर त्याचा खूपच त्रास होतो. ढेकून माणसाच्या शरीरातील रक्त शोषून घेतात आणि अशा ठिकाणी घरात लपून राहतात की त्यांच्यापासून सुटका मिळवणंही कठीण होतं. घरात एकदा ढेकूण झाले तर त्यांच्यापासून सुटका मिळवणं अत्यंत कठीण होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मादी ढेकून ही साधारण 500 अंडी घालते. त्यामुळे एकदा घरात ढेकून झाले की त्यातून बाहेर पडणं फारच कठीण होतं. तुम्हीही जर ढेकणांच्या त्रासाने त्रस्त असाल तर त्यासाठी तुम्हाला आम्ही काही सोपे ढेकूण मारण्यासाठी घरगुती उपाय (Dhekun Upay In Marathi) देणार आहोत. त्याचा उपयोग करून तुम्ही घरातील ढेकणांचा नायनाट नक्कीच करू शकता. काय आहेत हे सोपे उपाय घ्या जाणून.
पुदिन्याची पाने

पुदिन्याची पाने
पुदिन्याच्या पानांचा सुगंध हा ढेकणांसाठी वाईट ठरतो. ढेकणांना हा सुगंध सहन होत नाही. त्यामुळे जर तुमच्या गादीमध्ये ढेकूण असतील तर रोज तुम्ही न चुकता ताजा पुदीना गादीमध्ये ठेवा. यामुळे ढेकूण मरण्यास मदत होते. तुम्हाला हवं तर तुम्ही पुदिन्याचा स्प्रेदेखील घरात बनवू शकता आणि गादीवर अथवा ज्या ठिकाणी ढेकूण झाले आहेत तिथे मारू शकता. यामुळे ढेकणांचा नायनाट करणे सोपे होईल.
घरच्या घरी फेसपॅक करण्याआधी तयार करा या फेसपॅक पावडर
लाल मिरची
लाल मिरची 

ढेकूण मारण्यासाठी लाल मिरची ही अत्यंत उपयुक्त आहे. तुम्हाला कदाचित हे वाचून आश्चर्य वाटलं असेल पण लाल मिरची ही खूपच फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदा एक चमचा लाल मिरची, आलं, ओव्याचे तेल आणि एक कप पाणी घ्या. आलं किसून त्यात लाल मिरची आणि ओव्याचे तेल मिक्स करा आणि मग हे मिश्रण एक कप पाण्यात मिक्स करा. त्यानंतर हे गाळून घ्या आणि स्प्रे बॉटलमध्ये भरा. ज्याठिकाणी ढेकूण आहेत असं तुम्हाला जाणवलं आहे त्याठिकाणी दर दोन दिवसानी हा स्प्रे फवारा आणि मग आठवड्याभरातच तुम्हाला ढेकूण नाहीसे झाल्याचे आढळून येईल.
वाचा – उंदीर मारण्याचे घरगुती उपाय
कडुलिंबाचे तेल

कडुलिंबाचे तेलही यासाठी फायदेशीर ठरते. सर्वात पहिले तुम्ही दोन मोठे चमचे कडुलिंबाचे तेल घ्या. एक कप पाणी आणि अर्धा चमचा डिटर्जंट पावडर तुम्ही घ्या. यानंतर पाण्यामध्ये कडुलिंबाचे तेल आणि डिटर्जंट पावडर नीट मिक्स करून घ्या. हे मिश्रण तुम्ही स्प्रे च्या बाटलीत भरा आणि ढेकूण असणाऱ्या ठिकाणी स्प्रे फवारा. जोपर्यंत ढेकून मरत नाहीत तोपर्यंत तुम्ही ही प्रक्रिया रोज करा. कडुलिंबामध्ये अँटिबॅक्टेरियल गुण असतात जे किड्यांना मारण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे याचा उपयोग तुम्हाला करता येऊ शकतो.
रबिंग अल्कोहोल
सर्वात पहिले तुम्ही 90 मिली रबिंग अल्कोहोल आणि एक स्प्रे ची बाटली घ्या. या बाटलीत हे अल्कोहोल भरा. ढेकूण असणाऱ्या ठिकाणी हे फवारा. जेव्हा ढेकूण मरायला लागत आहेत हे सिद्ध होईल तोपर्यंत हे मारत राहा. ढेकणांवर अल्कोहोल मारल्यामुळे त्यांची त्वचा जळू लागते आणि त्यामुळे ते पटकन मरतात.
लिव्हिंग रूम सजविण्यासाठी करा अशा सोफा कम बेड डिझाईनचा वापर
ढेकूण मारण्याचे औषध
हे तर सर्वांनाच माहीत आहे. ढेकूण फर्निचर, बेड, गादी इत्यादी ठिकाणी अगदी कानाकोपऱ्यात असतात. त्यामुळे अशा कानाकोपऱ्यातून त्यांना बाहेर काढणं अत्यंत गरजेचे असते. किटकनाशकाचा वापर करून तुम्ही हे काम करू शकता. ढेकूण मारण्याचे औषध बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे याचा तुम्ही वापर करू शकता.
0
Answer link
घरामध्ये ढेकूण (Bed bugs) झाले असल्यास आणि औषध फवारणी करूनही ते कमी होत नसल्यास, येथे काही उपाय दिलेले आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही ढेकणांपासून सुटका मिळवू शकता:
-
स्वच्छता:
- घरातील पांघरुणं, चादरी, आणि पडदे गरम पाण्यात धुवा आणि त्यांना उच्च तापमानावर ड्रायरमध्ये वाळवा.
- गाद्या आणि इतर वस्तूंना व्हॅक्यूम क्लीनरने नियमितपणे स्वच्छ करा. व्हॅक्यूम केल्यानंतर कचरा त्वरित घराबाहेर टाका.
-
तापमान नियंत्रण:
- ढेकूण उच्च तापमानाला सहन करू शकत नाहीत. त्यामुळे ज्या ठिकाणी ढेकूण आहेत, तिथे हिट ट्रीटमेंटचा वापर करा. व्यावसायिक हिट ट्रीटमेंटमुळे ढेकूण पूर्णपणे नष्ट होतात.
- ज्या वस्तू धुता येत नाहीत, त्यांना काही दिवसांसाठी फ्रिजरमध्ये ठेवा.
-
नैसर्गिक उपाय:
- नीम तेल (Neem Oil): नीम तेल ढेकणांवर प्रभावी आहे. ते स्प्रे बॉटलमध्ये भरून ढेकणांच्या लपण्याच्या जागांवर फवारा.
- लवेंडर तेल (Lavender Oil): लवेंडर तेलाचा सुगंध ढेकणांना आवडत नाही. त्यामुळे लवेंडर तेल diluted स्वरूपात फवारल्यास ढेकूण कमी होऊ शकतात.
-
रासायनिक उपाय:
- पायरेथ्रॉइड्स (Pyrethroids) आणि पायरेथ्रिन्स (Pyrethrins): ही कीटकनाशके ढेकणांवर प्रभावी आहेत, पण काही ढेकणांमध्ये यांच्याविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे.
- पायरोल्स (Pyrroles): हे कीटकनाशक ढेकणांच्या नर्व्हस सिस्टीमवर परिणाम करतात आणि त्यांना मारतात.
- डेसिस्टेंट डस्ट्स (Desiccant Dusts): सिलिका एरोजेल (Silica aerogel) आणि डायटोमेसियस अर्थ (Diatomaceous earth) हे ढेकणांच्या शरीरातील पाणी शोषून घेतात आणि त्यांना मारतात.
-
इतर उपाय:
- बेड बग इंटरसेप्टर (Bed Bug Interceptors): हे डिव्हाइस बेडच्या पायाखाली ठेवल्यास ढेकणांना बेडवर चढण्यापासून रोखता येते.
- क्रॅक्स आणि व्हॉईड्स सील करा: घरामध्ये असलेल्या भेगा आणि crevices सील करा, ज्यामुळे ढेकणांना लपण्याची जागा मिळणार नाही.
-
व्यावसायिक मदत:
- जर ढेकणांची समस्या नियंत्रणात येत नसेल, तर Pest Control करणाऱ्या व्यावसायिक कंपनीची मदत घ्या. त्यांच्याकडे ढेकणांना मारण्यासाठी योग्य उपाय आणि साधने असतात.
टीप: कोणत्याही कीटकनाशकाचा वापर करण्यापूर्वी, लेबलवरील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यांचे पालन करा.
अधिक माहितीसाठी उपयुक्त स्रोत:
- National Pesticide Information Center: https://npic.orst.edu/factsheets/bedbugs.html
- EPA: https://www.epa.gov/bedbugs/control-and-prevention-bed-bugs