टपाल पोस्ट स्पीड पोस्ट

स्पीड पोस्ट केलेली वस्तू किती दिवसात पोहोचते? धुळे ते गडचिरोली अंतर आहे.

2 उत्तरे
2 answers

स्पीड पोस्ट केलेली वस्तू किती दिवसात पोहोचते? धुळे ते गडचिरोली अंतर आहे.

10
ते अवलंबून असते आपण पत्ता कूठला टाकलाय.. स्पीड पोस्ट जलद आणि अचुक असतात त्यात काही शंकाच नाही पण पत्ता जेवढ्या लांबचा वेळ तसा तसा वाढत जातो..

मागच्या महिन्यात मी नागपुर हून स्पीड पोस्ट केलेलं रुडकी उत्तराखंडला.. तर ते चार दिवसात पोहोचलेल..

एक साधारणतः ३-४-५ दिवस लागतात असं आपण सांगु शकतो.. जर आपण पोस्टात जाऊन विचारले तरी ते हेच म्हणतात ४-५ दिवस.. जर आपण सामान्य चालीचे पत्र पाठवत असाल तर ते आठवडा, दिड आठवडा किंवा १५ दिवसात पोहोचतं असा माझा अनुभव मला सांगतोय.. परंतु ते पोहोचण डायनामीक अर्थात बदलत राहणारे आहे, सामान्य पत्र ही कधी कधी ५-७ दिवसात पोहोचतात.. म्हणुन पाठवतांना एकदा त्यांना विचाराच(पण लक्षात ही असु द्या, त्यांना ही माहित नसते ते पण एक अंदाजेच सांगतात.. आता वेळेवर पोहोचले नाही तर आपण काय करुन घेणार हे त्यांना ठाऊक असते)... :-)
उत्तर लिहिले · 23/10/2018
कर्म · 75305
0
स्पीड पोस्टाने पाठवलेली वस्तू धुळे ते गडचिरोली अंतरानुसार किती दिवसात पोहोचेल हे निश्चितपणे सांगता येत नाही. तरी साधारणपणे लागणारा वेळ खालीलप्रमाणे:

स्पीड पोस्टाने वस्तू पोहोचायला लागणारा अंदाजे वेळ:

  • सर्वसाधारणपणे: 2 ते 5 दिवस
  • जास्तीत जास्त: 7 ते 10 दिवस

स्पीड पोस्टाने वस्तू लवकर पोहोचावी यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात:

  • पत्ता अचूक आणि स्पष्ट लिहा.
  • पिन कोड नंबर व्यवस्थित लिहा.
  • वस्तू व्यवस्थित पॅक करा.

स्पीड पोस्टाची अधिक माहितीसाठी, तुम्ही इंडिया पोस्टच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: इंडिया पोस्ट

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2440

Related Questions

पुण्यावरून रायगडला पत्र किती दिवसांनी पोहोचते?
धुळ्याहून स्पीड पोस्टने पाठवलेले पार्सल ठाण्याला सर्वसाधारणपणे किती दिवसांत मिळायला हवे?
स्पीड पोस्टचा ट्रॅकिंग नंबर हरवल्यास काय करावे?
मला धुळेहून बंगळूरला स्पीड पोस्टाने फॉर्म पाठवायचा आहे, तो किती दिवसात पोहोचेल?
स्पीड पोस्ट पोहचायला किती वेळ लागतो?
स्पीडपोस्ट म्हणजे काय?