4 उत्तरे
4
answers
गीताई या ग्रंथाचे लेखक कोण?
9
Answer link
आचार्य विनोबा भावे
स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते…..
स्वातंत्र्यलढ्यातील १९३२ च्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांनी धुळे येथील कारागृहात शिक्षा भोगली. धुळे येथील जेलमध्ये त्यांनी गीतेवर प्रवचन द्यायला सुरुवात केली. जेलमध्येच ही प्रवचने साने गुरुजींनी लिहून घेतली व पुढे ती ‘गीता प्रवचने’ म्हणून प्रकाशित करण्यात आली. ‘गीताई’ या ग्रंथाद्वारे विनोबाजींनी गीतेचा मराठी अनुवाद केला. जीवनदृष्टी, अभंगव्रते, स्वराज्यशास्त्र असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले.
विनोबाजींचे महाराष्ट्रावर मराठी संस्कृतीवर तसेच मराठी साहित्यावर जीवापाड प्रेम होते पण त्यांना भाषिक मुद्यावर आपापसात लढणे मान्य नव्हते..विनोबाजींनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या २०० पेक्षा अधिक आहे. त्यामध्ये “गीताई”, गीताप्रवचन”, “इशाव्यासवृत्ती”, “स्वराज्यशास्त्र” आणि “सर्वोदयी विचार”, “ज्ञानदेव चिंतनिका” इ. पुस्तकाचा समावेश होतो. त्यांनी एकूण बावीस भाषेमध्ये प्राविण्य संपादन केले होते. आचार्य विनोबाजींनी ऋग्वेदास, वेदान्तसुधा, गुरूबोधसार, भागवतधर्म प्रसार इत्यादी ग्रंथांच्या माध्यमातून आपले आध्यात्मिक विचार मांडले. तसेच त्यांनी ‘मधुकर’, ‘महाराष्ट्र धर्म’ या नियतकालिकांतूनही लेखन केले. धर्म, अध्यात्म, राजकारण, देशभक्ती, मानवतावाद, सत्याग्रह, अहिंसा इत्यादी विषयांवरील लेखन त्यांनी नियतकालिकांतून केले. त्यांचे लेखन आणि आध्यात्मिक व राजकीय कार्य यांमुळे त्यांना जयप्रकाश नारायण, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांसारखे अनुयायी लाभले.

0
Answer link
गीताई या ग्रंथाचे लेखक विनोबा भावे आहेत.
गीताई म्हणजे भगवतगीतेचा मराठी अनुवाद आहे.
विनोबा भावे हे एक भारतीय स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक आणि आध्यात्मिक नेते होते.
अधिक माहितीसाठी: