व्यक्तिमत्व चरित्रे

विश्वास नांगरे पाटील पूर्ण माहिती?

👍बस!नाम ही काफी है. असे कोणाबद्दल म्हणायच झालं ,तर त्यात विश्वास नांगरे पाटील हे नाव नक्कीच आघाडीवर असेल.एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी,रोल मॉडेल,प्रेरणास्थान आणि अधिकारी बनण्याच्या स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुण-तरुणीसाच्या गळ्यातील ताईत.
अशी नांगरे पाटलांची ओळख.

विश्वास नांगरे पाटील (५ ऑक्टोबर, इ.स. १९७३; कोकरूड, शिराळा, सांगली - हयात) हे महाराष्ट्र पोलिसातीलअधिकारी आहेत. ते सध्या कोल्हापूर भागात पोलीस महानिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. मुंबईवर २६ नोव्हेंबर इ.स. २००८ रोजी झालेल्या हल्ल्यांच्या वेळी ताज हॉटेलात शिरणारे ते पहिले पोलीस अधिकारी होते. नांगरे पाटील हे एक हुशार आणि प्रामाणिक अधिकारी आहेत. तसेच ते नवीन विद्यार्थ्यांना UPSC परीक्षेबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.

विश्वास नांगरे पाटील



जन्म५ ऑक्टोबर १९७३
कोकरूड, शिराळा तालुका, सांगली जिल्हा राष्ट्रीयत्व भारतीय शिक्षण बी.ए., एम.बी.ए.प्रशिक्षण संस्था कोल्हापूर विद्यापीठ, उस्मानीया विद्यापीठ पेशा आय.पी.एस्.धर्म हिंदू जोडीदार रुपाली नांगरे पाटील अपत्ये जान्हवी, रणवीर पुरस्कार राष्ट्रपती शौर्य पदक (२०१३)

सुरुवातीचा काळ आणि शिक्षण

विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म बत्तीस शिराळा या तालुक्यातील कोकरूड गावी झाला. त्यांचे वडील गावाचे सरपंच होते. त्यांनी आपले शालेय शिक्षण तालुक्यातील विद्यालयात पूर्ण केले आणि ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयात बी.ए. ची परीक्षा सुवर्ण पदक पटकावून उत्तीर्ण झाले. उस्मानिया विद्यापीठातून एम.बी.ए. ची पदवी घेऊन त्यांनी पुढे प्रशासकीय अभ्यासक्रमाला सुरुवात केली.•

कामगिरी

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण

पुणे जिल्हा ग्रामीण पोलीसदलात अधीक्षक असताना पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी केलेल्या कारवाईमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले.पुणे ग्रामीण पोलिसांनी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील शेतात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर ४ मार्च २००७ ला छापा टाकून २८७ तरुण-तरुणींना(२१ तरुणीं) अटक केली होती.प्रयोगशाळेत झालेल्या रासायनिक पृथक्करण अहवालानुसार त्यातील २४९ जणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले होते.

२६/११ चा दहशतवादी हल्ला

२६/११च्या मुबंई हल्ल्याच्यावेळी ताजमहाल हॉटेलमध्ये पोहचणाऱ्या पहिल्या अधिकाऱ्यांपैकी ते एक होते. सोबत फक्त दोन कॉन्स्टेबल आणि एक अंगरक्षक तसेच अंगावर सुरक्षाकवच(बुलेटप्रुफ जाकीट) नसतांनाही ते गोळीबार सुरू असलेल्या ताजमध्ये शिरले.प्रतिकारासाठी त्यांनी ९ एमएम पिस्तुलातून गोळीबार केला. दहशतवाद्यांचा पाठलाग करत ते सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले.त्यांच्या या कारवाईने दहशतवाद्यांना ताजमहाल हॉटेल नवीन इमारतीत जाण्यापासून रोखले. त्यानंतर नांगरे-पाटील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले व सीसीटीव्हीच्या मदतीने दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती वरिष्ठांना देत राहीले.सकाळी सात वाजता एनएसजीचे कमांडो कारवाईत प्रत्यक्षात सहभागी होईपर्यंत विश्वास नांगरे-पाटील यांची लढाई सुरूच होती.




विश्वास नांगरे पाटील यांची पूर्ण माहिती
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

विश्वास नांगरे पाटील पूर्ण माहिती?

Related Questions

संभाजी महाराज जन्म?
कर्‍हेचे पाणी हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
आकाशाशी जडले नाते हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
आकाशाशी जडले नाते हे कोणाचे आत्मचरित्र आहे, असे कोण म्हणत होते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणती पुस्तके लिहिली आहेत?
स्वातंत्र्य काळातील आत्मचरित्रांची यादी द्या?
मदर तेरेसांचा मृत्यू कसा झाला?