सामान्य ज्ञान भारतीय स्वातंत्र्य दिन नागरिक शास्त्र

राष्ट्रध्वजाचे लांबीचे रुंदीशी प्रमाण काय आहे?

3 उत्तरे
3 answers

राष्ट्रध्वजाचे लांबीचे रुंदीशी प्रमाण काय आहे?

8
भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) २२ जुलै १९४७ रोजी, भारतदेशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला. २४ मार्च रोजी इंंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. स्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समाती नेमली गेली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभृृती होते. त्यांनी ठरवले की काँग्रेसचा ध्वज हाच स्वतंंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा, फक्त चरख्याऐवजी अशोकचक्र हे चिह्न ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे. घटना समितीने २२ जुलैला या ठरावाला मंंजुरी दिली.

ध्वजातील गडद भगवा, पांढरा व हिरवा हे तीन रंगीत पट्टे आणि त्यांचे अर्थ :
रंग/ अर्थ

केशरी/ त्याग, शौर्य

पांढरा/ शांती

निळा/ २४ तास प्रगतीकडे वाटलाच

हिरवा/ समृद्धी

भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगाआहे). २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र (धम्मचक्र) असून ते सारनाथ येथे असलेल्य सिंहमुद्रेवर असलेल्या अशोकचक्र आहे. चक्राला २४ आरे आहेत. मच्‍छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. सर्वपल्ली राधाकृष्णनयांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे.

ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे.

वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.

मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.

खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो.

निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते. त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धम्मचक्र प्रवर्तनाय' हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे.
उत्तर लिहिले · 12/8/2018
कर्म · 20065
1
राष्ट्रध्वजाची लांबी रुंदीचे प्रमाण
3:2 असे आहे
धन्यवाद
shubham swami...
उत्तर लिहिले · 12/8/2018
कर्म · 20585
0

राष्ट्रध्वजाच्या लांबीचे रुंदीशी प्रमाण 3:2 आहे. याचा अर्थ ध्वजाची लांबी, रुंदीच्या 1.5 पट असते.

उदाहरणार्थ: जर ध्वजाची रुंदी 2 फूट असेल, तर लांबी 3 फूट असेल.


उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1040

Related Questions

संस्कृती म्हणजे काय? मानवी हक्काची घोषणा म्हणजे काय? ग्राहकांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या या संबंधीचे स्वरूप विस्तृतपणे लिहा.
महानगरपालिका किती आहेत?