स्वच्छता घर गृह उपयोगी वस्तू रेफ्रिजरेटर

फ्रीजची स्वच्छता करण्याची योग्य पद्धत कोणती?

2 उत्तरे
2 answers

फ्रीजची स्वच्छता करण्याची योग्य पद्धत कोणती?

5
ज्या प्रकारे घरातील वस्तूंची वेळोवेळी साफसफाई करणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे फ्रीजही ठराविक काळाने स्वच्छ करणं आवश्यक असता. फ्रीज स्वच्छ केला नाही तर त्यामधून दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. सोबतच त्यामधील पदार्थही लवकर खराब होतात. त्यामुळे फ्रीजची सफाई करणं गरजेचं आहे.

फ्रीज स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धती8
1) दोन आठवड्यातून किमान एकदा तरी फ्रीजची साफसफाई करावी

2) फ्रीज स्वच्छ करण्यापूर्वी बंद करुन, त्यातील खराब किंवा नको असलेले पदार्थ काढून टाकावेत

3) फ्री‍ज डी-फ्रॉस्ट करा, त्यानंतर बेसवर एक जाड पेपर टाका, जेणेकरुन बर्फ विरघळून पाणी पेपरवर पडेल आणि ते शोषलं जाईल

4) सफाई करताना लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करुन वापरल्यास फ्रीजमध्ये दुर्गंधी येत नाही

5) दही किंवा दूध जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवल्याने वास पसरतो, अशावेळी वाटीत चुना घेऊन तो फ्रीजमध्ये ठेवावा

6) कॉफी बीन्स एका वाटीत घेऊन फ्रीजमध्ये ठेवल्यास दुर्गंधी निघून जाते

7) खाण्याचा सोडा आणि पाणी एकत्र करुन फ्रीज स्वच्छ करावा

8) फ्रीजमध्ये खाण्याचा सोडा ठेवल्यामुळे त्यामधील दुर्गंधी जाते

9) फ्रीजमध्ये लिंबू किंवा संत्र्याच्या साली कापून ठेवल्याने दुर्गंधी शोषली जाते.

10) फ्रीजच्या दारात रबरी गास्केटला टाल्कम पावडर लावून ते कोरड्या कपड्याने पुसून घ्यावं

11) फ्रीज नेहमी कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यावा
उत्तर लिहिले · 27/7/2018
कर्म · 5605
0
फ्रीज स्वच्छ करण्याची योग्य पद्धत:

फ्रीज स्वच्छ करणे हे आवश्यक आहे, कारण त्यामुळे तो स्वच्छ राहतो आणि अन्नाची गुणवत्ता टिकून राहते. खाली फ्रीज स्वच्छ करण्याची योग्य पद्धत दिली आहे:

  1. फ्रीज रिकामा करा:

    फ्रीजमधील सर्व वस्तू बाहेर काढा. खराब झालेले अन्नपदार्थ फेकून द्या.

  2. भाग काढून टाका:

    फ्रीजमधील काढता येण्याजोगे भाग (shelf) आणि ड्रॉवर (drawer) बाहेर काढा.

  3. स्वच्छ करा:

    काढलेले भाग आणि फ्रीजचा आतील भाग गरम पाणी आणि सौम्य डिटर्जंट वापरून स्वच्छ करा.

  4. धुवा आणि सुकवा:

    स्वच्छ केलेले भाग आणि फ्रीज स्वच्छ पाण्याने धुवा आणि कोरड्या কাপड्याने पुसून घ्या.

  5. पुन्हा व्यवस्थित मांडा:

    सर्व भाग व्यवस्थित परत फ्रीजमध्ये मांडा.

  6. अन्न व्यवस्थित ठेवा:

    अन्नपदार्थ व्यवस्थित मांडा, ज्यामुळे हवा खेळती राहील.

टीप: फ्रीजमध्ये वास येत असल्यास, बेकिंग सोडा (baking soda) वापरून तो काढता येतो.

हेguidelines वापरून तुम्ही तुमचा फ्रीज स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवू शकता.

ॲक्युरसी:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 980

Related Questions

कपड्यावरचे तेलाचे डाग कसे काढावे?
पाणी मिक्स वॉशिंग पावडर निर्मा कसे काढायचे? आम्ही पूर्ण पाणी काढू पण शकत नाही.
माझ्या व्हाईट बोर्डवर चुकून परमनंट सीडी/डीव्हीडीवर लिहायच्या पेनने लिहिले गेले आहे, ते रिमूव्ह होत नाहीये, काय करता येईल?
गाडीवरील शेंदुराचे डाग कशाने निघतील?
गंजलेल्या वस्तू परत पहिल्यासारख्या करण्यासाठी काय उपाय?
गंजलेल्या वस्तू परत पूर्वीसारख्या करण्यासाठी काय करावे?
घरगुती मीटर घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?