परिवहन
वाहन परवाना

2 व्हीलर चे लायसेन्स काढायला काय काय कागदपत्रे लागतात आणि किती खर्च येतो?
मूळ प्रश्न: ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी काय करावे लागेल?
वाहन धारक किंवा वाहन चालविणारा व्यक्ती हा वाहन चालविण्यास योग्य आहे व त्याने तसे प्रशिक्षण घेतलेले आहे, हे वाहन चालक परवाना सुनिश्चित करते.वाहन अधिनियम १९८८ अन्वये सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यासाठी लायसन्स आवश्यक असते.
वाहन परवाना मध्ये
१.मोटार सायकल ५० सी सी
२.मोटार सायकल विना गिअर
३. मोटार सायकल विना गिअर सह
४.लाईट मोटार व्हेईकल
५. लाईट मोटार व्हेईकल नॉट ट्रान्सपोर्ट
६. लाईट मोटार व्हेईकल ट्रान्सपोर्ट
७.हेवी मोटार व्हेईकल
असे प्रकार पडतात
लर्नर्स लायसेन्स – सहा महिन्यांच्या मुदतीसाठी लायसेन्स
कायमस्वरूपी लायसेन्स – दीर्घ मुदतीचे लायसेन्स जे प्राप्त करण्यासाठी प्रथम लर्नर्स लायसेन्स आवश्यक असते.
ड्राईव्हिंग लायसेन्स प्राप्त करण्यासाठी लर्नर्स लायसेन्स काढणे बंधनकारक आहे.
विना गिअर ५० सी सी च्या वैयक्तिक वाहना करिता लायसेन्स प्राप्तीसाठी वयाची मर्यादा १६ वर्षे पूर्णची आहे.परंतु यासाठी चालकाला पालकांची परवानगीही आवश्यकता असते.तशी परवानगी मिळाल्यास १६ वर्षे पूर्ण असलेले व्यक्तीला वाहनचालक परवाना काढता येतो.
वैयक्तिक वाहनचालक स्थायी / कायमस्वरूपाचा वाहनचालक परवाना प्राप्तीसाठी वयमर्यादा १८ वर्षे पूर्ण असावे.
अवजड वाहनचालक परवाना प्राप्तीसाठी वय वर्षे २० पूर्ण व वाहनचालविन्याचे नियम व प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.
अप्लाय कसे करायचे ?
लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी:
१. येथे जाऊन ऑनलाईन फॉर्म भरून अपॉइंटमेंट घ्या: https://sarathi.nic.in
२. अपॉइंटमेंटच्या दिवशी RTO ऑफिसला जा. ३० रुपये फी भरा. लेखी परीक्षा द्या, या परीक्षेत २० प्रश्न असतात, त्यातले १६(८० %) बरोबर आले पाहिजे. हे प्रश्न वाहतुकीचे नियम आणि चिन्ह यांवर विचारले जातील. या परीक्षेत ८०% पेक्षा कमी मार्क मिळाल्यास लर्नर्स लायसन्स मिळणार नाही.
३. खालील डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जा
- जन्म दाखला(शाळा सोडल्याचा दाखला)
- रहिवासी दाखला(मतदान कार्ड)
- ३ पासपोर्ट साईझ फोटो
- तुमचे वय जर ५० वर्षांपेक्षा जास्त असेल तर मेडिकल फिटनेस दाखला घेऊन जा
पर्मनंट लायसन्स मिळवण्यासाठी:
लर्निंग लायसन्स मिळाल्यानंतर ३० दिवस जाऊद्या.
१. येथे जाऊन ऑनलाईन फॉर्म भरून अपॉइंटमेंट घ्या: https://sarathi.nic.in
२. अपॉईंटन्मेंटच्या दिवशी RTO ऑफिसला जा.
३. टेस्ट(५० रु), स्मार्ट कार्ड(२११ रु.) आणि पोस्ट(५० रु) ची फी भरा. ज्या वाहनांची टेस्ट द्यायची आहे ते वाहन सोबत घेऊन जा.
४. तुमचा नंबर आल्यानंतर RTO ऑफिसर समोर रोड टेस्ट घ्या.
५. त्यानंतर RTO ऑफिसर एक छोटासा इंटरव्हिव घेतील, त्यात बरोबर उत्तरे द्या
६. वरील सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्यास ड्रायविंग लायसन्स स्मार्ट कार्ड स्वरूपात पोस्टाने घरी येईल.

मी या वरच्या प्रोसेससाठी एजंटला १५०० रुपये विनाकारण वाया घालवले. तुम्ही स्वतः लायसन्स काढल्यास वरीलप्रमाणे फक्त सुमारे ३५० रुपये लागतील.
कोणतेही मोटार वाहन दुचाकी वाहनासह चालवताना खालील कागदपत्र मूळ स्वरुपात जवळ असणे कायद्याने बंधनकारक आहे.
१.वाहन परवाना
२.वाहन नोंदणी प्रमाणपत्र
३.कर आकारणी प्रमाणपत्र
४.वाहन विमा प्रमाणपत्र
५.वाहन हे प्रदूषण नियंत्रणाखाली असल्याचे प्रमाणपत्र
६.जर वाहन हे वाहतूक करणारे असले तर वाहतूक परवाना आणि वाहन योग्यता / फिटनेस प्रमाणपत्र.
1 उत्तर
1
answers