उत्पन्न दाखला अर्थशास्त्र

उत्पन्नाचा दाखला कोणकोणत्या ठिकाणी उपयोगात आणता येतो?

उत्पन्नाचा दाखल्याचा वापर हा जास्त प्रमाणात विद्यार्थी वर्गात होतो. शासनाच्या सवलती / शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करते वेळी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागतो.तो दोन प्रकारात असतो.१.एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला. २.तीन वर्षांचा एकत्रित उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला. हा व्यक्ती ज्या ठिकाणी रहिवासी व्यवसाय अथवा नोकरी करत असेल त्या ठिकाणीच काढता येतो. उत्पन्नाचा दाखला हा केवळ १ वर्षांसाठीच वैध असतो.

         उत्पन्नाचा दाखला तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात मिळू शकेल त्यासाठी  आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

कोर्ट फी स्टँप लावलेला विहित नमुन्यातील अर्ज व शपथपत्र

व्यक्ती दारिद्र्य रेषेखालील असल्यास गट विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र

व्यवसाय बाबत व उत्पन्ना बाबतचे प्रमाणपत्र व रेशनकार्ड झेरॉक्स

व्यक्ती नोकरदार असल्यास पगारपत्रक

शालेय कामकाजासाठी विद्यार्थ्याला दाखला लागत असल्यास शाळा सोडल्याचा दाखल्याची झेरॉक्स अथवा शाळेय बोनाफाईड जोडावे.

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

उत्पन्नाचा दाखला कोणकोणत्या ठिकाणी उपयोगात आणता येतो?

Related Questions

रमाई टार्गेट आल्यावरच फाईल द्यावी लागते का?
गरज म्हणजे नक्की काय?
गहाणखत म्हणजे काय?
कर्ज झाले आहे काय करू?
दसादशे पाच टक्के दराने 16000 रुपयांचे मुद्दलाचे दोन वर्ष आठ महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती?
दसादशे पाच टक्के दराने १६०० रुपये मुद्दलाचे दोन वर्षे आठ महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती?
चक्रवाढ व्याजाचे सूत्र काय आहे?