प्रवास पासपोर्ट पारपत्र

पारपत्र म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

पारपत्र म्हणजे काय?

5
पारपत्र म्हणजे पासपोर्ट, ज्याची एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी नितांत गरज असते. पारपत्राशिवाय असा प्रवास करता येत नाही, व जर पारपत्राशिवाय असा प्रवास करायचा प्रयत्न करताना पकडले गेले, तर तुरुंगाची हवा खायला लागण्याची शक्यता असते.
उत्तर लिहिले · 13/6/2018
कर्म · 91085
4
_🎈भारतीय पारपत्र (पासपोर्ट) हे भारताच्या राष्ट्रपतींनी भारताच्या नागरिकांच्या परदेशगमनासाठी दिलेला परवाना आहे. पासपोर्टधारक भारतीय पासपोर्ट ॲक्ट (१९६७) नुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर भ्रमण करण्यास सक्षम असतो. मात्र हा परवाना बाळगणाऱ्याला परकीय देशात प्रवेश मिळण्यासाठी त्या देशाने दिलेला 'व्हिसा' असणे आवश्यक असते. नेपाळ, भूतान आणि बाली या काही देशांत प्रवेश करण्यासाठी व्हिसा लागत नाही.
0

पारपत्र (Passport) म्हणजे काय?

पारपत्र हे एक सरकारी कागदपत्र आहे जे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वापरले जाते. हे तुमच्या ओळखीचा आणि नागरिकत्वाचा पुरावा आहे.

पारपत्राचे फायदे:

  • हे तुम्हाला इतर देशांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देते.
  • हे तुमच्या ओळखीचा आणि नागरिकत्वाचा पुरावा म्हणून काम करते.
  • visa (व्हिसा) मिळवण्यासाठी हे आवश्यक आहे.

तुम्ही पारपत्रासाठी अर्ज कसा करू शकता?

तुम्ही पासपोर्ट सेवा केंद्राच्या वेबसाइटवर (Passport Seva Kendra website) ऑनलाइन अर्ज करू शकता.

पासपोर्ट सेवा केंद्र
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 2680