प्रवास विमान वाहतूक हवाई वाहतूक

हवाई वाहतुकीचे फायदे कोणकोणते आहेत?

2 उत्तरे
2 answers

हवाई वाहतुकीचे फायदे कोणकोणते आहेत?

15
हवाई वाहतूकीचे फायदे खालीलप्रमाणे :- 👇

1) हवाई वाहतूक मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक अशा दोन्ही प्रकारच्या वाहतुकीसाठी उपयुक्त आहे.

2) वाहतुकीच्या इतर प्रकारापेक्षा हवाई वाहतूक हा सर्वात जलद प्रकार आहे.

3) हवाई वाहतूकसाठी निसर्गनिर्मित हवाई मार्गांचा वापर केला जातो.

4) शीघ्रनाशी आणि अतिमौल्यवान वस्तूंच्या वाहतुकीसाठी हवाई वाहतूक उपयुक्त आहे.

5) हवाई वाहतुकीद्वारे कमी वजनाच्या मौल्यवान आणि नाशवंत वस्तूंची वाहतूक जगातील कोणत्याही भागात करता येते.

6) दूरवरच्या अंतरासाठी हवाई वाहतूक अत्यंत फायदेशीर आहे. कारण कमीतकमी वेळेत सुखद प्रवास या माध्यमाद्वारे  करता येतो.

7) हवाई वाहतुकीमध्ये प्रदुषणाचे प्रमाण अत्यल्प आहे.

8) राष्ट्रीय सुरक्षितता व संरक्षणाच्या दृष्टीने हवाई वाहतूक महत्वाची भूमिका बजावते.....
उत्तर लिहिले · 10/6/2018
कर्म · 77165
0
हवाई वाहतुकीचे अनेक फायदे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

1. वेगवान प्रवास: हवाई वाहतूक इतर कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीपेक्षा खूप जलद आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

2. दुर्गम ठिकाणी पोहोचणे: जिथे रस्ते किंवा रेल्वेमार्ग नाहीत, अशा दुर्गम ठिकाणी विमानाने पोहोचता येते.

3. वेळ आणि खर्चाची बचत: जरी हवाई वाहतूक थोडी महाग वाटत असली, तरी ती तुमचा वेळ वाचवते, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे खर्च कमी होतो.

4. व्यवसायासाठी उपयुक्त: व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी हवाई वाहतूक अत्यंत सोयीची आहे, कारण ते कमी वेळेत अनेक ठिकाणी भेट देऊ शकतात.

5. नैसर्गिक आपत्तीत मदत: नैसर्गिक आपत्तीच्या वेळी, विमानं बचावकार्यात आणि लोकांना मदत पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

6. मालवाहतूक: जलद आणि सुरक्षित असल्याने, विमानाद्वारे मालवाहतूक करणे सोपे होते, विशेषतः नाशवंत वस्तू आणि तातडीने आवश्यक असलेल्या वस्तू जलद पाठवता येतात.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1420

Related Questions