2 उत्तरे
2 answers

MPSC चे ब्रीद वाक्य काय आहे?

19
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग

● ब्रीदवाक्य
स्वसुखनीर भिलाष; विध्यते लोकहितो



थोडक्यात माहिती सुद्धा देत आहे ...
● मुख्यालय
मंत्रालय, मुंबई , भारत
बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, ३रा माळा, यम.जी.रोड, हुतात्मा चौक, मुंबई - ४०० ००१

● सेवांतर्गत प्रदेश
महाराष्ट्र

● मालक
महाराष्ट्र शासन

● अधिकृत संकेत स्थळ
www.mpsc.gov.in

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) हे महाराष्ट्र शासनाच्या
अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते.

● राज्यसेवा परीक्षा
केंद्र सरकारच्या पातळीवर होणारी नागरी सेवा परीक्षा आणि राज्य
सरकारच्या पातळीवरची राज्यसेवा परीक्षा यात काही साम्यं आहेत.
उदाहरणार्थ, या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून
अधिकारी पातळीसाठी निवड होते. गट-अ आणि गट-ब
अशा दोन्ही पातळ्यांवरच्या अधिकारी पदांसाठी निवड होते.
या दोन्ही परीक्षा या पूर्वपरीक्षा, मुख्य
परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होतात.
अर्थात्, या परीक्षांमध्ये साम्य कमी आणि फरक जास्त आहेत. ते या लेखातून स्पष्ट होतीलच.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदांसाठी निवड होते. उदा. उपजिल्हाधिकारी
(डेप्युटी कलेक्टर), पोलीस उपअधीक्षक (डेप्युटी सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस), तहसीलदार, नायब तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी.
नगर परिषद इत्यादी कुठच्या पदांसाठी आणि किती उमेदवारांची निवड
होणार यात दरवर्षी बदल होत असतो. वर
उल्लेखिलेल्या पदांव्यतिरिक्त इतर
पदांसाठी सुद्धा परीक्षा घेतली जाऊ शकते. लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा परीक्षेची अधिसूचना जारी होते. त्यामध्ये पदं आणि पद संख्या नमूद केलेल्या असतात.

● पात्रता
वयाची २१ वर्षं पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार
‘राज्य सेवा परीक्षा‘ देऊ शकतो. खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्षे ३३ पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव
गटातल्या विद्यार्थ्यांना वय वर्षे ३८ पर्यंत ही परीक्षा देता येते.
परीक्षा किती वेळा द्यायची यावर बंधन नाही. वयोमर्यादेत कितीही वेळा ही परीक्षा देता येते.
ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवासाचं प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) मिळवावं लागतं. ‘राज्य सेवा परीक्षा‘ मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येत असली तरी उमेदवाराला मराठीचं ज्ञान असणं आवश्यक असतं.
शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत मराठी हा विषय उमेदवाराने
घेतलेला असणं आवश्यक असतं.
उत्तर लिहिले · 8/5/2018
कर्म · 458560
0

MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) चे ब्रीद वाक्य आहे:

  • "सुजनहिताय, सुराष्ट्राय" (Sujanahitay, Surashtray)

अर्थ: चांगल्या लोकांच्या हितासाठी आणि उत्तम राष्ट्रासाठी.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1780

Related Questions

MPSC साठी वयोमर्यादा किती आहे?
MPSC काय आहे?
MPSC पास झाल्यावर आपण कोणत्या पदावर जाऊ शकतो?
MPSC साठी नेमकं अभ्यास कुठून व कसा सुरू करावा?
MPSC परीक्षेसाठी जास्तीत जास्त वयाची अट किती असते?
MPSC ची परीक्षा देऊन पुढे आपण कोणती पदवी प्राप्त करतो?
MPSC pass zalyavar aapn kay kay banu shakto?