कागदपत्रे जात व कुळे सामाजिक जात प्रमाणपत्र

जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

2 उत्तरे
2 answers

जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

2
  जातप्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे
1.वि.मा.व. प्रमाणपत्र (विशेष मागासवर्ग दाखल्यासाठी अर्ज) 
2.इ.मा.व. प्रमाणपत्र (इतर मागासवर्गीय दाखल्यासाठी अर्ज) 
3.स्थलांतरितांसाठी जात प्रमाणपत्र 
4.अ.जा. प्रमाणपत्र /स्थलांतर (अनुसूचित जात दाखल्यासाठी अर्ज) 
5.वि.जा./भ.ज. प्रमाणपत्र (विमुक्त जमाती दाखल्यासाठी अर्ज) 
6.अ.जा. मधून बौद्ध धर्मांतर (बौद्ध धर्मांतरीत अनुसूचित जाती दाखल्यासाठी अर्ज) 
7.शासकीय सेवेतील पदासाठी जात प्रमाणपत्रवि.मा.व. प्रमाणपत्र (विशेष मागासवर्ग दाखल्यासाठी अर्ज) 

आवश्यक कागदपत्र

1.ओळखीचा पुरावा :मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / आधार कार्ड /निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड .
2.पत्त्याचा पुरावा : मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आधार कार्ड / वीज देयक/पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती.
3.जातप्रमाणपत्रासाठी शपथपत्र (प्रपत्र 2)
4.स्वत: अथवा जवळच्या नातेवाईकांच्याजातीचा पुरावा
अ. अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा, अर्जदार अथवा अर्जदाराच्या वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला
ब. अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उतारा
क.
   अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाच्याजात/समाजाचा उल्लेख असणारा शासकीय सेवा नोंदवहीचा उतारा
ड. सामाजिक न्याय विभागाने जारी केलेलेजातप्रमाणित करणारे कागदपत्र
ई. अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र
फ. ग्राम पंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रत
ग. जातअधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जाती संदर्भातील कागदोपत्री पुरावे
ह. सक्षम प्राधिकरणाने जारी केलेलेअन्य संबंधित कागदोपत्री पुरावे लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे
1.वडिलांच्याजातीचा पुरावा उपलब्ध नसल्यास नातेवाईकाचेजातप्रमाणपत्रआणि नातेवाईकासोबतच्या नात्याचा तपशील देणारे वंशावळीचे शपथपत्र (प्रपत्र३)
2.विवाहित महिला असल्यास,
   अ. मुद्दा क्र. ४ नुसार विवाहापूर्वीच्याजातीचा पुरावा
   ब. विवाहाचा पुरावा- विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि राजपत्रातील नाव बदलासंदर्भातील अधिसूचना अर्जदाराने अन्य राज्य/जिल्ह्यामधून स्थलांतर केले असल्यास त्या राज्य/जिल्ह्यातील सक्षम प्राधिकाऱ्याने अर्जदाराच्या वडिलांच्या नावे जारी केलेलेजातप्रमाणपत्र मुद्दा क्र. ४ नुसार धर्मांतर केले असल्यास त्यापूर्वीच्याजातीचा पुरावा 
उत्तर लिहिले · 23/3/2018
कर्म · 210095
0
जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:
  • अर्जदाराचा फोटो.
  • ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, इ.).
  • रहिवासी पुरावा (रेशन कार्ड, लाईट बिल, भाडे पावती, इ.).
  • जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
  • अर्जदाराच्या वडिलांचा जात दाखला.
  • अर्जदाराच्या blood relation मधील (सख्खे चुलत/ आते/ मामे ) व्यक्तीचा जात दाखला (असल्यास).
  • अर्जदाराच्या जातीचा उल्लेख असलेला कोणताही जुना कागदपत्र पुरावा (उदा. जमिनीचा उतारा, खरेदीखत, जन्मregister ).
  • ग्रामपंचायत/ नगर पालिका record मधील माहिती.
  • अर्जदार नोकरी करत असल्यास Form नंबर १६
  • प्रतिज्ञापत्र ( Affidavit)

टीप:
* ही कागदपत्रे सामान्य स्वरूपाची आहेत. जात पडताळणी समिती (Caste Scrutiny Committee) गरजेनुसार आणखी कागदपत्रांची मागणी करू शकते. * तुमच्या विशिष्ट प्रकरणासाठी आवश्यक कागदपत्रांची अचूक माहिती मिळवण्यासाठी, संबंधित जात पडताळणी समिती किंवा जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधा.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1240

Related Questions

मी SC कॅटेगरीत आहे, मला माझ्या मुलींचा जातीचा दाखला काढायचा आहे. माझ्याकडे कागदपत्रांसाठी 1950 अगोदरचे कोणतेही कागदपत्र नाही, तर मी काय करावे?
कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी यामध्ये काय फरक आहे? जात मराठा आहे पण आरक्षणासाठी कुणबी काढले आहे. जातीच्या दाखल्यावर फक्त कुणबी असा उल्लेख आहे, मराठा कुणबी असा नाही, तर फक्त कुणबी उल्लेख असल्यामुळे अडचण येणार नाही ना?
माझ्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू-मराठा जात लिहिली आहे आणि माझ्या वडिलांच्या दाखल्यावर हिंदू-इतर लिहिले आहे, तर मी हिंदू ओबीसीचा दाखला काढू शकतो का? वडिलांचा जन्म 1964 सालचा आहे, पण आजोबांच्या दाखल्याचा काहीच पुरावा मिळत नाही, म्हणून मी ओबीसीचा दाखला काढू शकतो का?
भारतीय सैन्य मध्ये जात वैधता SC जाती साठी लागू आहे का?
माझ्या शाळेतील दाखल्यावर हिंदू वंजारी मराठा अशी जात लागली आहे, माझी जात हिंदू वंजारी आहे. मला दाखल्यावर हिंदू वंजारी जात लावायची आहे, त्यासाठी काय करावे लागेल?
माझे वडील कर्नाटकचे होते, जन्म १९४७ चा आहे. ते चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात स्थायिक झाले. ते आता हयात नाहीत. मला अनुसूचित जातीचा दाखला दोन्हीकडील तहसीलदार नाकारत आहेत. मी काय करावे? जातीचा पुरावा कर्नाटकचा व इतर सर्व महाराष्ट्रातील आहे.
मी ओबीसी आहे, मला ओपन मध्ये जात बदल करता येणार का?