व्यवसाय पेटीएम ऑनलाइन व्यवसाय

PayTM वर बिजनेस कसा स्टार्ट करायचा?

2 उत्तरे
2 answers

PayTM वर बिजनेस कसा स्टार्ट करायचा?

3
थेट उत्तर देण्या आधी ऑनलाइन विक्रीबद्दल थोडी माहिती देतो.

ऑनलाइन विक्री करण्याच्या तीन पद्धती आहेत.

१)स्वत:च्या वेबसाइटद्वारे विक्री :
तुम्हाला एका चांगल्या वेब डेव्हलपरकडून ई-कॉमर्स वेबसाइट तयार करून घेणे, Payment Gateway निवडणे, त्याचे वेबसाइटमध्ये एकीकरण करणे, लॉजिस्टिक्ससोबत संधान करणे आणि डिजिटल मार्केटिंगद्वारे तुमच्या वेबसाइटची व उत्पादन वा सेवेची जाहिरात करणे अपेक्षित आहे.
वेबसाइटमध्ये शॉपिंग कार्ट असणे आवश्यक आहे. तुमची उत्पादने वा सेवा या शॉपिंग कार्टमध्ये ग्राहक पाहू शकतात व तेथेच हवे तेवढे नग विकत घेऊ शकतात. ग्राहकाने शॉपिंग कार्टमध्ये जाऊन मागणी नोंदवली, की पुढे तो Payment Gateway वर जातो. तिथे Payment केल्यानंतर तुम्हाला लॉजिस्टिक्सच्या माध्यमातून माल पाठवावा लागतो. माल ग्राहकाला मिळताच त्याच्याकडून Payment Release Request पाठवली जाते. त्याद्वारे Payment Gateway कडून तुमच्या बँक खात्यात झालेल्या विक्रीचे पैसे जमा होतात. या संपूर्ण प्रक्रियेला, म्हणजे ग्राहकाने तुमच्या वेबसाइटवरून माल खरेदी करण्याची ऑर्डर दिल्यापासून तुमच्या खात्यात मालाचे पैसे येईपर्यंत सुमारे पाच ते सात दिवस जाऊ शकतात.


२अन्य शॉपिंग कार्टद्वारे विक्री :
KartRocket, Build a bazaar, MartJack, इत्यदी ही काही third party online shop solutions आहेत. स्वत:ची ई-कॉमर्स वेबसाइट तयार करून घेऊन त्याद्वारे ऑनलाइन विक्री करण्यापेक्षा third party online shop solutions वापरून स्वत:चे वेबस्टोअर तयार करून त्यावर आपल्या उत्पादनांची विक्री करणे हे तुलनेने कमी खर्चीक आहे. त्यामुळे नव्याने ऑनलाइन विक्रीची सुरुवात करायची असल्यास हा पर्याय सोयीचा आहे.

३प्रस्थापित मार्केटप्लेसेसद्वारे विक्री:
Paytm, amazon , flipkart snapdeal प्रस्थापित मार्केटप्लेसेसची उदाहरणे आहेत. शिवाय अनेक लहान-मोठ्या वेबसाइट्ससुद्धा अशी मार्केटप्लेसेस सेवा पुरवतात. या मार्केटप्लेसेस म्हणजे एखाद्या सुपरमार्केटप्रमाणे आहेत. इथे फक्त तुमचाच माल विक्रीला नसून तुमच्यासोबत तुमच्या स्पर्धकाचाही माल विक्रीला ठेवलेला असतो. या मार्केटप्लेसेसचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या वेबपोर्टल्सची मोठ्या प्रमाणात जाहिरात होत असते व खूप मोठ्या प्रमाणात ग्राहक या मार्केटप्लेसेसना खरेदीसाठी भेट देत असतात. इथे आपल्याला ग्राहकाला ओढून आणावे लागत नाही, तर ग्राहक स्वत:हून येतो. या


Paytm किंवा इतर मार्केटप्लेसेसमध्ये तुमचा माल विकण्यासाठी तुम्हाला या वेबसाइट्सवर जाऊन विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागते. सोबत तुमच्या व्यवसायाचा पुरावा सादर करावा लागतो. पॅन क्रमांक, टॅन क्र., व्हॅट क्र., बँक खात्याचे तपशील या गोष्टींचे पुरावे सादर करावे लागतात. विविध मार्केटप्लेसेसवर विक्री करण्याचा एकच मोठा तोटा आहे की, ते तुमच्याकडून मोठ्या प्रमाणात कमिशन आकारतात. परंत तुलनेत तुमचा मार्केटिंग खर्चही कमी झालेला असतोच.
माहिती स्रोत
माहिती स्रोत



उत्तर लिहिले · 23/3/2018
कर्म · 99520
0

PayTM वर बिजनेस सुरू करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. PayTM मध्ये Merchant अकाउंट तयार करा:

    PayTM मध्ये Merchant अकाउंट बनवण्यासाठी, PayTM Business ॲप डाउनलोड करा आणि तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून रजिस्टर करा. PayTM Business

  2. KYC (नो युवर कस्टमर) प्रक्रिया पूर्ण करा:

    तुमच्या व्यवसायाची ओळख आणि पत्ता verify करण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

  3. तुमच्या प्रोडक्टची लिस्टिंग करा:

    तुमचे प्रोडक्ट PayTM Mall वर लिस्ट करा. प्रोडक्टचे नाव, किंमत, फोटो आणि इतर आवश्यक माहिती व्यवस्थित द्या.

  4. पेमेंट पर्याय सेट करा:

    PayTM तुम्हाला विविध पेमेंट पर्याय देतो, जसे की UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग. तुमच्या ग्राहकांसाठी योग्य पेमेंट पर्याय निवडा.

  5. तुमच्या प्रोडक्टचे मार्केटिंग करा:

    तुमच्या प्रोडक्टची जाहिरात करण्यासाठी PayTM च्या मार्केटिंग टूल्सचा वापर करा. सोशल मीडिया आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देखील तुम्ही तुमच्या प्रोडक्टची जाहिरात करू शकता.

  6. ऑर्डर्स व्यवस्थापित करा:

    तुम्हाला आलेले ऑर्डर्स व्यवस्थित process करा आणि वेळेवर त्यांची delivery करा.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5280

Related Questions

मला Captcha चा ऑनलाईन व्यवसाय करायचा आहे. तो कसा करावा व कोठे संपर्क करावा, कृपया माहिती मिळेल का?
ऑनलाइन फोटो विकून पैसे कमवता येतात का? आणि कसे?
मला सध्या एक ऑनलाइन बिजनेस करायचा आहे, तर कोणी मला सांगू शकेल का की मी कोणता ऑनलाइन बिजनेस करू?
मला ऑनलाइन पॅनकार्डचा व्यवसाय करायचा आहे, तो कसा करू? याबद्दल पूर्ण माहिती मिळेल का?
भारतामध्ये ऑनलाइन बिझनेसचे बिगिनर्स?
मला ऑनलाइन व्यवसाय करायचा आहे. कोणता करावा?