कुतूहल देव

गणपतीचे वाहन उंदीरच का आहे?

2 उत्तरे
2 answers

गणपतीचे वाहन उंदीरच का आहे?

1
आज गणपतीची कोणतीही मूर्ती पाहिली तरी गणपतीबाप्पांच्या पायाशी वाहन म्हणून असलेला मूषक किंवा उंदीर दिसतोच. उंदीर हेच गणपतीचे वाहन म्हणून आपण मानतो. मात्र असे असले तरी गणपतीच्या ज्या कांही प्राचीन मूर्ती आज आढळतात त्यात त्याला वाहन नाही. मुद्गल पुराणात गणेशाचे आठ अवतार वर्णिले आहेत त्यातील पाच अवतारात मात्र उंदीर हे गणपतीचे वाहन आहे तर अन्य अवतारात वक्रतुंड गणेशाचे वाहन सिंह, विकटाचे वाहन मोर तर विघ्नराज गणपतीचे वाहन शेष नाग आहे.

गणेश पुराणात गणेशाचे चार अवतार वर्णिले आहेत. त्यात धुम्रकेतूचे वाहन घोडा, गजाननाचे वाहन उंदीर, महोत्कटाचे वाहन सिंह तर मयुरेश्वराचे वाहन मोर आहे. जैन ग्रंथात उंदीर, हत्ती, कासव आणि मोर अशी गणपतीची वाहने आहेत. मात्र पश्चिम आणि मध्य भारतातील गणेश शिल्पात उंदीर हेच गणपतीचे मुख्य वाहन आहे. सातव्या शतकापासून गणपती शिल्पात उंदीर गणपतीच्या पायाशी असलेला दिसतो. लिखित स्वरूपात मस्य पुराण, नंतर ब्रह्मानंद पुराणात गणेशाच्या शेवटच्या अवतारात उंदीर वाहन आहे.

गणपती अथर्वशीर्षात गणपतीच्या ध्वजावर उंदीर असल्याचे वर्णन आहे तर गणेश सहस्त्रनामात मूषकवाहनम असा उल्लेख येतो. उंदीर हा तमोगुणाचे प्रतीक असल्याचे कांही अभ्यासकांचे म्हणणे आहे . संस्कृत मध्ये मूषक असा शब्द उंदीरासाठी वापरला जातो तो मूळ मस म्हणजे चोरी यावरून आला आहे.कृषी क्षेत्रासाठी उंदिर हा अतिशय उपद्रवी आणि नुकसानकारक प्राणी आहे. गणेशाची विघ्नहर प्रतिमा यातूनच आली असून ती या उपद्रवावर मात करणारी देवता मानली जाते. ग्रामदेवता म्हणूनही गणपती विघ्नहर स्वरूपातच दिसतो.

उत्तर लिहिले · 24/2/2018
कर्म · 210095
0

गणपतीचे वाहन उंदीरच असण्यामागे अनेक पौराणिक कथा आणि प्रतीकात्मक अर्थ आहेत. त्यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे:

  1. प्रतीकात्मक अर्थ: उंदीर हा लहान प्राणी आहे, जो अनेकदा अडचणी निर्माण करतो. तो गुप्तपणे घरात प्रवेश करतो आणि वस्तू कुरतडतो. गणपती हे बुद्धीचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत. त्यामुळे, उंदरावर नियंत्रण ठेवणे म्हणजे आपल्या इच्छा आणि वासनांवर नियंत्रण ठेवणे होय. गणपती आपल्याला आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवण्याची शिकवण देतात.
  2. पौराणिक कथा: एका पौराणिक कथेनुसार, उंदीर हा पूर्वी क्रोंच नावाचा एक बलवान राक्षस होता. एकदा त्याने इंद्रलोकात धुमाकूळ घातला, तेव्हा गणेशानी त्याला पकडले आणि त्याला आपला वाहन बनवले. त्यामुळे, गणपतीच्या वाहनाचे प्रतीक हे दुर्जनांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रतीक आहे.
  3. लहानसहान गोष्टींचे महत्त्व: गणपतीचे वाहन उंदीर हे दर्शवते की देवाला लहानसहान गोष्टींचेही महत्त्व आहे. कोणतीही गोष्ट कमी लेखू नये, कारण लहान वस्तूमध्येही मोठी शक्ती असू शकते.
  4. Buddhi tatva: उंदीर हा बुद्धी आणि चातुर्याचे प्रतीक आहे. गणपती हे बुद्धीचे देवता आहेत, त्यामुळे उंदीर त्यांचे वाहन असणे हे योग्य आहे.

या सर्व कारणांमुळे गणपतीचे वाहन उंदीर आहे, असे मानले जाते.

अधिक माहितीसाठी हे दुवे पहा:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 960

Related Questions

Dev देव कुठे आहे?
मुंबईतील कामगार मैदानावर झालेल्या सभेत शंकरराव देव यांनी जनतेला कोणते आव्हान केले?
पशुधनाचे रक्षण करणारा देव होता का?
माझा एक नास्तिक मित्र आहे. आमचं देव आहे की नाही यावर चर्चा चालू आहे. त्याचा असा प्रश्न होता की जगात ५ वर्षाच्या मुलीसोबत पण बलात्कार होतात, तर ती घटना होत असताना देव का त्या मुलीला वाचवू शकत नाही? जर देवाचे अस्तित्व आहे आणि देव सगळं बघतोय, तर गुन्हेगाराला शिक्षा नक्कीच भेटेल, पण देव वाचवू का नाही शकत?
पशु पालनाचे रक्षण करणारा देव होता का?
देव नसून घंटी वाजवतो?
महाराष्ट्र दर्शन मध्ये कोणकोणते देवस्थान पाहण्यासारखे आहेत?