मराठी भाषा मराठी कविता कवी लिखाण साहित्य

मला काही मराठी कवींची यादी आणि त्यांची माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

मला काही मराठी कवींची यादी आणि त्यांची माहिती मिळेल का?

13
विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
डॉ. 'देवानंद गोविंदराव सोनटक्के' (१ ऑक्टो,१९७४) हे मराठीतील तरुण साहित्य समीक्षक आहेत. समीक्षक व अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. द.भि. कुलकर्णी यांचे ते सहा वर्षे लेखनिक होते. तर अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांचे ते विद्यार्थी होते. याच काळात त्यांच्या समीक्षक व्यक्तिमत्त्वाची जडण घडण झाली. त्यांचे दोन समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध असून पदवी शिक्षण घेतानाच त्यांचे लेखन प्रसिद्ध होत होते. आजवर त्याचे महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, लोकसत्ता,तरुण भारत या वृत्तपत्रांखेरीज ललित, पंचधारा, समाजप्रबोधन पत्रिका, अक्षर वाङ्मय, सर्वधारा, पद्मगंधा, आकांक्षा अशा महाराष्ट्रातील मान्यवर नियतकालिकातून सुमारे ४० समीक्षालेख प्रसिद्ध झाले आहेत. नागपूर, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर व उस्मानिया विद्यापीठ इ. विविध विद्यापीठांच्या अभ्यास साधनासाठी व अभ्यास मंडळासाठी त्यांनी काम केले असून या विद्यापीठांच्या विविध चर्चासत्रात शोधनिबंधांचे वाचनही त्यांनी केले आहे.
बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर (डिसेंबर १, १९०९ - मार्च २०, १९५६) हे मराठी कवी व लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते याचे कारण असे सांगितले जाते की, दुसर्‍या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जीवनात जी नीरसता व कृत्रिमता आली अणि युद्धात जो मानवसंहार झाला तो पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यावर काही उपाय नसल्यामुळे त्यांच्या मनातील विफलता काव्यातून उमटली. बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे.
उत्तर लिहिले · 23/10/2017
कर्म · 3890
0

मराठी कवी आणि त्यांची माहिती

येथे काही प्रमुख मराठी कवी आणि त्यांच्या कामांची माहिती दिली आहे:

  1. वि. वा. शिरवाडकर

    विष्णू वामन शिरवाडकर, किंवा कुसुमाग्रज हे एक प्रसिद्ध कवी, नाटककार आणि लेखक होते. त्यांनी अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लेखन केले.

    काव्यसंग्रह: वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

  2. कुसुमाग्रज

    विष्णू वामन शिरवाडकर ह्यांचे टोपणनाव कुसुमाग्रज असून ते एक लोकप्रिय कवी, लेखक आणि नाटककार होते.

    काव्यसंग्रह: हिमरेषा, वादळवारा

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

  3. विंदा करंदीकर

    गोविंद विनायक करंदीकर, विंदा करंदीकर ह्या नावाने प्रसिद्ध, हे एक कवी, लेखक आणि समीक्षक होते. त्यांनी अनेक कवितासंग्रह लिहिले.

    काव्यसंग्रह: स्वेदाSession

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

  4. ग. दि. माडगूळकर

    गजानन दिगंबर माडगूळकर, गदिमा ह्या नावाने प्रसिद्ध, हे एक लोकप्रिय कवी, लेखक, गीतकार आणि अभिनेते होते. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहिली.

    काव्यसंग्रह: चैत्रबन, जोगिया

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

  5. बा. भ. बोरकर

    बाळकृष्ण भगवंत बोरकर, बा. भ. बोरकर ह्या नावाने प्रसिद्ध, हे एक कवी आणि लेखक होते. त्यांनी निसर्ग आणि प्रेम या विषयांवर अनेक कविता लिहिल्या.

    काव्यसंग्रह:image

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

या व्यतिरिक्त, अनेक थोर मराठी कवी आहेत ज्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2220

Related Questions

कवी अनिल यांचा दशपदी रचना प्रकार विशद करा?
रविकिरण मंडळातील कवींची नावे लिहा?
ग्रेस आणि महानोर या दोन्ही कवींच्या रचनांचे प्रमुख वैशिष्ट्ये विशद करा?
कवी ग्रेस व रोशन?
प्रस्तुत कवितेची कवी/कवयित्री कोण आहे?
मराठी आग्रही कवी म्हणून कोणाचा उल्लेख होतो?
देणाऱ्याने देत जावे या कवितेतून कवीने कोणता संदेश दिला आहे?