प्रवास पर्यटन स्थळे

मला सातारा जिल्ह्यामधील फिरायला जाण्यासाठी ठिकाणांची माहिती मिळेल का?

3 उत्तरे
3 answers

मला सातारा जिल्ह्यामधील फिरायला जाण्यासाठी ठिकाणांची माहिती मिळेल का?

11
सातार्‍याचे भारतातील स्थान

सातारा शहर इतिहासात मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. १७०८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहूमहाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सातारा शहरात झाला. त्यानंतर मराठा राज्याच्या अखेरपर्यंत सातारा शहर मराठ्यांची राजधानी होते. सातारा

सातारा शहरचे जगाच्या नकाशावरचे स्थान १७.
सातारा शहर अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. सातारा शहराच्या दक्षिणेकडे अजिंक्यतारा, उत्तरेकडेपेढयाच्या भैरोबाची टेकडी, पश्चिमेकडे यवतेश्वराचा डोंगर वपूर्वेकडे जरंडेश्वराचा डोंगर या टेकड्यांनी वेढले आहे. शहराजवळून कृष्णा व वेण्णा या नद्या वाहतात. माहुली इथे या दोन्ही नद्यांचा संगम होतो. सातारा शहराच्या पश्चिमेकडील कासचे पठार वनौषधींसाठी प्रसिद्ध आहे. शहरातून ह्याच टेकडीकडे पाहिल्यास मृत ज्वालामुखीचे मुख दिसते. सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणारी ही डोंगराची रांग पश्चिमघाटात मोडते. त्यामुळे सातार्‍यात पावसाचे प्रमाण खूप आहे. सातार्‍यात प्रतिवर्षी साधारण १००० मिलिमीटर एवढा पाऊस पडतो.

शाहूनगर

● सातारा शहराची स्थापनाचे संभाजीचे पुत्र छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी केली. ● औरंजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर शाहूमहाराजांनी सातारच्या किल्ल्यावर (अजिंक्यतार्‍यावर) आपल्या राज्याभिषेक करवून घेतला व सातारच्या किल्ल्यावरूनच त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हलवण्यास सुरुवात केली. अडचणीत सापडलेले मराठा साम्राज्य शाहूमहाराजांच्या समयसूचक धोरणांमुळे हळू हळू मोकळा श्वास घेऊ लागले. विखुरलेले एक एक मराठा सरदार एकत्र करून त्यांच्यात स्वराज्याची ऊर्मी नव्याने जागृत करत शाहूमहाराजांनी मराठा स्वराज्याला मराठा साम्राज्याचे स्वरूप देण्यास सुरुवात केली. मराठा साम्राज्याचा चहूबाजूला जसाजसा विस्तार होऊ लागला तसातासा सातारच्या किल्ल्याचा परिसर प्रशासनच्या दृष्टीने कमी पडू लागला व त्यातूनच सातारा शहराच्या स्थापनेची कल्पना पुढे आली आणि शहराची मुहूर्तवेढ रोवत शाहूमहाराजांनी मराठा स्वराज्याच्या ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वराज्याची राजधानी डोंगरावरून जमिनीवर आणली. ● सातारा शहराची अर्थात शाहूनगरीची रचना व त्यातील भागांची नवे शाहूमहाराजांच्या आमदनीची आठवण करून देतात. राजकीय महत्त्व संपले तरीही मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी म्हणून सातार्‍याचा अभिमान महाराष्ट्रीयांना आजही वाटतो. शाहूनगरची स्थापना इ.स. १७२१ च्या सुमारास झाली. शाहूमहाराजांच्या दिनांक २८ मार्च १७२१ च्या पत्रात तातडीने वाडा बांधल्याचा उल्लेख आहे. शाहूमहाराजांच्या व पेशव्यांच्या ज्या भेटी होत त्या रोजनिशीत नोंदल्या आहेत त्यावरून शहर रचनेच्या कालावधीचा अंदाज लागतो. डिसेंबर १७२० च्या सुमारास श्रीमंत बाजीरावांनी सातारा किल्यावर शाहूमहाराजांची भेट घेतली. त्यानंतर सात-आठ महिन्यांच्या भेटी माची किल्ले सातारा येथे झालेल्या आहेत. त्यापुढे ऑगस्ट १७२१ ला शाहूनगरनजीक केल्ले सातारा येथे श्रीमंत बाजीरावांनी शाहूमहाराजांची भेट घेतली असा उल्लेख आहे. ● शाहूनगरालच हल्ली सातारा असे म्हणतात. शाहूमहाराजांनी स्वतःकरता दोन राजवाडे बांधले. येवतेश्वरच्या डोंगरातून नळ बांधून पाणी आणले. जागोजागी हौद तलाव बांधले त्यांनी शाहूनगरच्या वैभवात जास्तीत जास्त भर घालण्याचे प्रयत्‍न केले. ● शाहूनगरची रचना व प्रतिष्ठा शाहूमहाराजांच्या नजरेखाली पुष्कळ वाढली. व्यापार उद्योग वाढला. नवीन सावकार निर्माण झाले. सुखानंद, सुमेरगिरी, बन्सीपुरी अशा परदेशी सावकारांची वस्ती होणे सुरू झाले. मराठ्यांचा बाह्यउद्योग पसरत गेला, त्याबरोबर उत्तरेकडचे हिंदी लोक, वकील, व्यापारी, हुन्नरी कलावंत अशी अनेक माणसे दक्षिणेत आल्यामुळे शाहूनगरातील दळणवळण वाढून नगराचे जीवनस्तर उंचावले. त्याचबरोबर शाहूनगरचे वैभवसुद्धा विस्तारले. ● महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर वसवताना शाहूमहाराजांनी तख्ताचा वाडा, रंगमहाल, पीलखाना, अदालतवाडा, बेगम मस्जिद असा अनेक भव्यदिव्य इमारतींची उभारणी केली.

१) तख्ताचा वाडा : हल्ली जिथे शाहू उद्यान आहे तिथे शाहूमहाराजांचा वाडा होता. तिथेच त्यांचे सिंहासन होते. म्हणून त्याला तख्ताचा वाडा म्हणत. जवळच लागून असलेल्या विहिरीस तख्ताची विहीर म्हणत. सध्या एक तटबंदीची भिंत व वाड्याच्या भिंतीचा अवशेष अढळतो.

२) रंगमहाल: रंगमहाल ही वास्तू अदालतवाड्याच्या पूर्वेस सुमारे २०० मीटर अंतरावर आहे. मूळ इमारत ३० मीटर लांब व १५ मीटर रुंद असून तिला ४५ मीटर रुंदीची नवीन इमारत जोडून बांधली आहे. मूळ इमारत ३ मजली होती. शाहूमहाराजांच्या राण्यांचा राणीवसा येथे होता म्हणून या इमारतीस रंगमहाल असे नाव देण्यात आले. राजमाता येसूबाईसाहेब देखील याच वाड्यात राहत असत. १८७४ साली लागलेल्या आगीत संपूर्ण रंगमहाल बेचिराख झाला. सध्या या वाड्याचा अर्धा भाग कूपर कारखाण्न्याच्या ताब्यात आहे.

३) अदालतवाडा : अजिंक्यतार्‍याच्या पायथ्याशी बोगद्याकडे जाणार्‍या रस्त्यावर शाहूमहाराजांच्या कालावधीपासून अस्तित्वात असलेल्या वस्तूचा महाराज न्यायालयासारखा उपयोग करीत. ही इमारत ६७. मीटर लांब व ४८ मीटर रुंद आहे. १८७६ पर्यंत या इमारतीचा उपयोग दिवाणी न्यायालय म्हणून केला जात असे. त्यानंतर मात्र नवीन राजवाड्याचा वापर न्यायालयासाठी होऊ लागला. सध्या अदालत वाडा हे सातारा राजकुलाचे शिवाजीराजे भोसले यांचे वसतिस्थान आहे.

४) बेगम मस्जिद: औरंजेबाची मुलगी बेगम झीनतउन्निसा हिने शाहूमहाराजांचा ते कैदेत असताना चांगला सांभाळ करून त्यांचे धर्मांतरण होऊ दिले नव्हते. झीनतउन्निसा बेगम १७२१ साली वारली. तिच्या स्मरणार्थ शाहूमहाराजांनी अदालत वाड्याच्या जवळच एक मस्जिद बांधली. आज त्या जुन्या मस्जिदीच्या जोत्यावर नवीन मशीद उभारली आहे.

सातार्‍यात म्हणजेच शाहूनगरमध्ये अनेक वाडे बांधण्यात आले होते. फत्तेसिंह वाडा, मंत्र्यांचा वाडा, शिर्के यांचा वाडा, पंडितरावांचा वाडा, तसेच मंगळवार पेठेत शाहूमहाराजांच्या पत्‍नी सगुणाबाई यांचा वाडा होता. तो वाडा आजही धनिणीची बाग म्हणून प्रसिद्ध आहे.

छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी नवीन वसवलेल्या पेठांची माहिती 

सातारा शहराची मुख्य वस्ती विविध पेठांमध्ये आहे. सातारा शहरातील पेठांची नावे अशी आहेत

गडकर आळी - सातार्‍यातील सर्वात जुन्या ठिकाणांचा उल्लेख करताना गडकर आळी हे नाव प्रथम घेतले जाते. सातारचा किल्ला (अजिंक्‍यतारा) ही मराठ्यांची चौथी राजधानी समजली जाई. येथे इसवी सन १७५० ते १८००च्या कालखंडात गडावर देखरेख करणारे गडकरी ज्या ठिकाणी राहत, त्या वस्तीस गडकर आळी या नावाने ओळखले जाते. येथे लोकांच्या दहा ते वीस घरांची जुनी वस्ती आहे. सध्या ह्या वस्तीचा समावेश शाहूपुरी ग्रामपंचायतीत केला जातो.रविवार पेठ- गुरुवार पेठेच्या पूर्वेस सातारा शहराच्या सीमेवर ही पेठ वसविली गेली. या पेठेत महाराजांनी लोणार व कुंभार समाजातील लोकांना घरे बांधण्यासाठी जागा दिल्या. या पेठेच्या पूर्वेला सातार्‍याहून माहुली, धामनेर, खिंडवाडी या गावाकडे जाणारे रस्ते होते. छत्रपती शाहू महाराजांनी या पेठेच्या माळावर लोकांना व घोड्यांना पाणी पिण्यासाठी दगडी रांजण पाण्याने भरून ठेवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे या भागास पोवईचा माळ (पाणपोईचा माळ) असे नाव पडले होते. त्यासच सध्या पोवई नाका म्हणतात..सोमवार पेठ- शनिवार पेठ व यादोगोपाळ पेठेच्या मध्ये ही पेठ वसविली गेली . वाड्यांच्या बांधकामासाठी तेथील ओढ्याच्या काठावरून दगड काढण्यात आले. तेथे तळे निर्माण झाले . ते सतत वाहत असे. त्यास पूर्वी हमामपुरा तळे असे नाव होते. त्यासच पुढे फुटके तळे हे नाव पडले. या तळ्यातील पाणी सोमवार पेठेतील लोकांना वापरणे सोईचे होते. त्यामुळे त्याचे आसपास सामान्य लोकांनी वस्ती केली. त्या भागास सोमवार पेठ असे नाव दिले गेले येथील पंचपाळी हौद प्रसिद्ध आहे.मंगळवार पेठ- ही पेठ सातारा शहराच्या पश्चिमेस माची पेठेशेजारी येते. याच पेठेत श्रीपतराव पंत प्रतिनिधिनीं एक खूप मोठे व खोल तळे बांधले त्यास मंगळवार तळे म्हणतात. इ स १७००मध्ये सातारा किल्ल्यावरील मंगळाईचा बुरूज औरंगजेबाच्या बाजूने उडवून देणारे डफळे नावाचे सरदार होते. ते पुढे छत्रपती शाहू महाराजांचे मांडलिक झाले. त्यांनी या पेठेत आपला वाडा बांधला. तसेच छत्रपती शाहू महाराजांची राणी सगुणाबाई यांना मंगळवार तळ्याच्या उत्तरेस महाराजांनी वाडा बांधून दिला व तेथे मोठी बाग तयार करुन दिली. त्या बागेस धनिणीची बाग असे नाव पडले कारण सगुणाबाईंना धनीण या नावाने संबोधले जात असे.बुधवार पेठ- शनिवार पेठेच्या उत्तरेस ही पेठ वसविली होती. या पेठेतून लिंब गावास जाण्याचा रस्ता होता. या पेठेत शाहू महाराजांनी प्राणी संग्रहालय व अनेक ठिकाणाहून निरनिराळ्या प्रकारची झाडे आणून बाग तयार केली होती. त्याची व्यवस्था पाहणार्‍या मुसलमान जातीच्या माळी लोकांची वस्ती करण्यात आली होती. या बागेस बुधवार पेठ बाग असे नाव होते.गुरुवार पेठ- ही पेठ अगदी सुरवातीसच माची पेठेच्या उत्तरेस डोंगर उतारावर शाहू महाराजांनी वसविली व कितीतरी लोकांना कौल लावून जागा दिल्या. या पेठेच्या सुरवातीस तख्ताचा वाडा बांधला होता . त्याच्या आसपास त्यांनी अनेक सरदार व अधिकार्‍यांना वाडे बांधून दिले. या पेठेस गुरूवार पेठ असे नाव दिले.शुक्रवार पेठ- ही पेठ मंगळवार पेठेच्या नजीक आहे . या पेठेत छत्रपतींचे कारभारी सेवक वगैरे लोक राहत असत . ही पेठ त्या वेळी सातारा शहराच्या उत्तर सिमेवर होती . या पेठेत फत्तेसिंह भोसले यांची जागा होती त्या प्रमाणे या पेठेच्या पाणी पुरवठा साठी खूप मोठी बांधीव विहीर बांधण्यात आली . त्या विहीरीस बाजीरावाची . विहीर म्हणतातराजसपुरा पेठ - शाहू महाराजांना राणी सकवारबाईंपासून राजसबाई या नावाची मुलगी झाली होती . ती अल्पवयात निधन पावली. तिच्या स्मरणार्थ ही पेठ वसविली शनिवार पेठ- ही पेठ वसवण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः सोमवार पेठ व रविवार पेठेच्या मध्ये अनेक सामान्य लोकांना कौल लावून जागा दिल्या व राजधानीच्या शहराची वस्ती वाढावी म्हणून प्रयत्न केले . या पेठेस शनिवार पेठ असे नाव दिले गेले . डोंगर उतारावरून उत्तरेच्या बाजूने ही सर्वात मोठी पेठ वसविली गेली.माची पेठ- अजिंक्यतारा किल्ल्याच्या उत्तरेस पूर्व पश्चिम अशी माची भागात ही पेठ वसविली गेली आहे. या पेठेतच रंगमहाल व अदालतवाडा ही निवासस्थाने स्वतःसाठी बांधली.मल्हार पेठमेट - छत्रपती शाहू महाराजांच्या काळाच्या पूर्वीपासून अजिंक्यताराच्या तटाची व रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची जबाबदारी महार जातीच्या लोकांवर होती. तत्कालीन सातारा किल्ल्याच्या तटाच्या डोंगर उतारावर रंगमहाल राजवाड्याच्या पूर्वेस त्यांची वस्ती केली. त्यास मेट असे नाव होते.चिमणपुरा पेठ - शाहू महाराजांचे सरदार चिमणाजी दामोदर या खानदेशातील जहागिरदाराने आपला वाडा मंगळवार पेठेच्या पश्चिमेस बांधून ही पेठ वसविली. चिमणाजी दामोदर हे छत्रपती शाहू महाराजांचे राजज्ञ म्हणजेच खाजगी चिटणीस व राजांच्या खाजगी उत्पन्नाचे हिशेबनीस होते. त्यांच्या नावावरून या पेठेस चिमणपुरा पेठ हे नाव दिले गेलेव्यंकटपुरा पेठ - सन १७३० साली कोल्हापुरकर छत्रपती संभाजीराजे व छत्रपती शाहू महाराज यांचे दरम्यान वारणेची लढाई झाली. त्या लढाईत इचलकरंजीचे व्यंकटराव घोरपडे यांचा पाडाव झाला. ते शाहू महाराजांचे पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे जावई होते. यामुळे महाराजांनी चिमणपुरा पेठ व मंगळवार पेठेच्या शेजारी त्यांना वाडा बांधून सातारा येथे स्थायिक केले. त्या भागास व्यंकटपुरा पेठ हे नाव पडले.यादोगोपाळ पेठ- वारणेच्या तहानंतर महाराणी ताराबाई सातारा येथे राहण्यास आल्या. शाहू महाराजांनी त्यांची राहण्याची व्यवस्था अजिंक्यतारा किल्ल्यावरील वाड्यात केली व त्यांच्या मदतीला यादोगोपाळ खटावकर यास नेमून दिले. त्यांनी यादोगोपाळ पेठेची रचना केली व या पेठेत सचिवांचा वाडा व पीलखान्याची बांधणी करून दिली. त्यामुळे मंगळवार पेठ व सोमवार पेठेच्या या मधल्या भागास यादोगोपाळ पेठ असे नाव पडले.प्रतापगंज पेठरामाचा गोट - मंगळवार पेठ व चिमणपुरा पेठेच्या मधोमध नागपूरच्या भोसले घराण्यातील रामाऊ भोसले या नावाच्या कर्तबगार स्त्रीने आपला वाडा बांधून सैन्य बाळगले होते. छ शाहू व नागपूरचे भोसले यांचे संबंध निकटचे होते. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना लढाईचे वेळी मोठे सहकार्य केले होते. त्यामुळे त्या भागास रामाऊचा गोट असे नाव दिले गेले.केसरकर पेठ - रविवार पेठ व गुरूवार पेठेच्या मधील भागात शाहू महाराजांचे एकनिष्ठ सेवक जोत्याजी केसरकर यांच्या नावाने ही पेठ वसविली. शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना त्यांच्या खाण्यापिण्याची व शिक्षणाची व्यवस्था जोत्याजी केसरकर यांच्याकडे होती. महाराजांनी सातारा येथे छत्रपती पद धारण केल्यानंतर त्यांनी ज्योत्याजी केसरकर यांना बिनीच्या हत्तीवर त्यांच्या जरीपटक्याचा भगवा ध्वज घेऊन बसण्याचा मान दिला होता.रघुनाथपुरा पेठ - सातारा शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून शाहू महाराजांनी बुधवार पेठ व करंजे येथे जाणार्‍या मधल्या जागेत आंब्याची बाग तयार केली होती. त्या बागांची व्यवस्था पाहण्यासाठी माळी समाजाची वस्ती केली. त्या पेठेस थोरल्या बाजीरावांचा मुलगा रघुनाथ यांच्या नावावरून त्यास रघुनाथपुरा असे नाव प्राप्त झाले .बसप्पा पेठ - बसप्पा नावाचा लिंगायत इसम शाहू महाराजांच्या कोठीवरील अधिकारी होता. तो खूप प्रामाणिक व विश्वासू होता. त्याच्या स्वामिनिष्ठेवर खूष होऊन शाहू महाराजांनी त्याला खूप पैसे बक्षीस दिले. त्या पैशातून त्याने शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्याच्या स्मरणार्थ शाकूमहाराजांनी ही पेठ वसविली व तिला बसप्पा पेठ नाव दिले.खण आळी - हा भाग बाजारपेठेचा आहे. येथे कापड दुकाने असून खण मिळत असल्याने त्याला हे नाव प्रचलित झाले.ढोर गल्ली - चर्मकार समाजासह कातडी कमावण्याचा उदयोग या पेठेत वसला. आज ही पेठ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून काळानुरूप नवीन व्यवसाय नवीन पिढी करत आहे.

उपनगरेसंपादन करा

सातारा शहराची लोकवस्ती वाढत जाऊन शहराच्या सभोवती अनेक उपनगरे उभी राहिली आहेत.त्यांची नावे अशी आहेत

शाहूनगर' - अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी गोडोली गावाच्या लगत वसलेल्या वसतीला शाहूनगर म्हटले जाते.करंजे' - सातारा शहराच्या स्थापनेपूर्वी हे गाव अस्तित्वात आहे.संगम माहुली - सातारा शहरापासून ५.१ कि मी अंतरावर कृष्णा व वेण्णा नद्यांचा संगम झाला आहे. या पवित्र ठिकाणी छ. शाहू महाराजांच्या हुकुमावरून १७१९मध्ये संगमाच्या पश्चिमेस वेण्णा नदीच्या दक्षिण तीरावर ४० ब्राह्मणांची वसाहत करण्यात आली. या वसाहतीस मौजे खेड पैकी अर्धा चावर जमीन इनाम दिली. पाटखळ गावी ५ बिघे जमीन इनाम दिली. या वसाहतीस संगम माहुली नाव दिले.कृष्णानगरप्रतापसिंह नगर- सातार्‍याच्या हजेरी मालावर काही झोपड्या होत्या. बस स्थानकाशेजारी हा भाग असून फारच ओंगळवाणे चित्र होते. सातार्‍याचे नगराध्यक्ष प्रतापसिंह राजे भोसले यांनी पुढाकार घेऊन या कुटुंबांचे पुनर्वसन केले. त्या वसाहतीला लोक प्रतापसिंहनगर म्हणू लागले.

'वेण्णानगर

संगमनगर-

कोयनानगर - हे एक उपनगर आहे.शाहूपुरी -सध्या ह्या उपनगरास ग्रामपंचायतीचा दर्जा असून, हे सर्वात मोठे उपनगर समजले जाते. गेंडा माळ - शुक्रवार पेठेच्या उत्तरेस शहराबाहेर शाहू महाराजांच्या शिकारीसाठी राखीव माळ होता. शाहू महाराजांनी या माळावर एक गेंडा पाळलेला होता. त्यामुळे त्या माळास गेंडा माळ असे नाव पडले. त्या माळावरच पुढे १८५७च्या बंडातील क्रांतिकारकांना वडाच्या झाडावर लटकावून फाशी देण्यात आली. त्यास फाशीचा वड असे नाव पडले. त्यानंतर सन १९७२मध्ये या माळावर LIC कॉलनीचे बांधकाम करून नागरी वस्तीस सुरवात झाली. १९७५मध्ये जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांची घरे बांधण्यात आली. त्या वेळी या भागास शाहूपुरी हे नाव देण्यात आले. २००० साली या ममी भागाची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली व शाहूपुरी हे स्वतंत्र गाव म्हणून नकाशावर आले.सदरबझार - सातार्‍यातील काही महत्त्वाची ठिकाणे उदा. सैनिक स्कूल, प्रादेशिक परिवहन कार्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, इ. सदरबझारमध्ये आहेत.करंजेकर्मवीरनगरविलासपूर- सातारा शहरातील ह्या उपनगरास सध्या ग्रामपंचायतीचा दर्जा आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा याच भागातून जातो.कोडोली- कोडोली गावामध्‍ये सातारा शहरातील औद्योगिक वसाहत आहे. तसेच कोडोली ग्रामपंचायतही एक मोठे उपनगर आहे.तामजाईनगरखंडोबामाळ कॉलनी - सातारा शहरापासून ३ किमी. अंतरावर संभाजीनगर ग्रामपंचायतीमध्य॓ एका ओसाड माळावर ही कॉलनी वसलेली आहे. कोणतीही पाण्याची सुविधा नसताना येथील लोकांनी पाण्यासाठी खूप हाल सोसले आहेत. या वसाहतीत  ?????

शैक्षणिकसंपादन करा

सातारा शहरात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्यारयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. रयत शिक्षण संस्थेची अनेक शाळा-महाविद्यालये शहरात आहेत. सयाजीराव हायस्कूल, इस्माईल मुल्ला विधि महाविद्यालय,यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ही त्यांतील काही उल्लेखनीय नावे. रयत शिक्षण संस्थेशिवाय सातारा शिक्षण संस्थेचे सातारा पॉलिटेक्निक व अनंत इंग्लिश स्कूल, डेक्कन शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची कन्याशाळा ह्या नावाजलेल्या संस्था आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी कमवा आणि शिका हा मंत्र सातार्‍यातच शिकवला.तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे लाल बहाद्दुर शास्त्री काॅलेजही येथे आह. />सातारा शहर देशात येथील सैनिक स्कूलमुळे ओळखले जाते.. २३ जून १९६१ मध्ये सातार्‍यात भारतातल्या पहिल्या सैनिक स्कूलची स्थापना झाली. येथील अनेक विद्यार्थ्यांनीं राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळवला आहे.
आर्यांग्ल आर्युवेदिक महाविद्यालय येथे वैद्यकीय व नर्सिंगचे अभ्यासक्रम चालवले जातात. यशोदा शिक्षण संस्था ही एक अग्रगण्य शिक्षण संस्था वाढे फाटा येथे आहे; तेथे आर्किटेक्चर, इंजिनियरिंग, फार्मेसी, MCA MBA इत्यादी कोर्स शिकवले जातात.

उत्तर लिहिले · 23/9/2017
कर्म · 2680
4
प्रतापगड:
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. 1656 साली प्रतापगड बांधला. प्रतापगड महाबळेश्वरच्या पश्चिमेला आठ मैलावर असून किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 3543 फूट आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी 10 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराज-अफझलखान यांची ऐतिहासिक भेट झाली. त्यात अफझलखानाचा वध झाला. या महान पराक्रमामुळे छत्रपतींचा लौकिक चौमुलखी पसरला. या अतुलनीय पराक्रमामुळे शिवाजी महाराजांचे नाव साऱ्या दऱ्या-खोऱ्यात वाऱ्यासारखे पसरले.

शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी देवीचे अत्यंत सुंदर आणि ऐतिहासिक मंदिर आणि शिवछत्रपतींचा भव्य अश्वारुढ पुतळा गडावर असून गडाच्या पायथ्याशी अफझलखानाची कबर आहे. इ.स. 1818 पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर तो इंग्रजांच्या ताब्यात गेला.

सज्जनगड:
सातारा शहराच्या पश्चिमेला 12 किलोमीटर अंतरावर परळी येथे श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेला हा सज्जनगड. या गडाच्या पायथ्यापर्यंत एस.टी.बस जाते. गडावर जाण्यासाठी 750 पायऱ्या चढून जावे लागते. गडावर श्रीस्वामी समर्थ रामदासांची समाधी आहे. दास नवमीला तेथे मोठा उत्सव असतो. गडावर सतत पाणी असणारी दोन तळीसुद्धा आहेत.

इ.स. 1673 मध्ये शिवाजी महाराजांनी सज्जनगड हा किल्ला जिंकून घेतला. इ.स.1700 मध्ये मोगल फौजांनी तो काबीज केला. परंतु औरंगजेबाच्या हयातीत मराठ्यांनी सातारा परिसरातील किल्ले परत घेतले. इ.स.1818 मध्ये ब्रिटिश फौजांनी सज्जनगड आपल्या ताब्यात घेतला.

कुसबुद्रुक, कुसखुर्द, पळसावडे परिसरात मोरघळ येथे तीन मीटर उंचीची गुहा असून तिला तीन दालने आहेत.

अजिंक्यतारा :
सातारा शहराच्या दक्षिणेला असलेला मोठा किल्ला म्हणून अजिंक्यतारा हा किल्ला ओळखला जातो. अजिंक्यतारा, अजिमतारा किंवा मंगळाईचा डोंगर या नावानेही तो ओळखला जातो. पूर्वी या किल्ल्यावरुन शहर व सभोवताच्या विस्तीर्ण प्रदेशावर देखरेख करीत असत. या किल्ल्याच्या उतारावर शहराचा बराचसा भाग वसला आहे. अजिंक्यतारा शिलाहार वंशीय राजा दुसरा भोज याने 1190 मध्ये बांधला. 1673 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. 1698 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी सातारा ही मराठी राज्याची राजधानी जाहीर केली.

महाबळेश्वर-पाचगणी:
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देश पातळीवर लौकिकास आले आहे. जुने क्षेत्र महाबळेश्वर हे धार्मिक स्थळ आणि पंचनद्यांचा उगम म्हणून सर्वपरिचित आहे. महाबळेश्वर येथे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री या पाच नद्यांचा उगम होतो. याठिकाणी ऐतिहासिक पंचगंगा मंदिर तसेच स्वयंभू शिवलिंगाचे महाबळेश्वर मंदिर आहे.

परिसरातील अनेक पॉईंटस हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले आहेत. सनराईज किंवा विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, केट्स पॉईंट व त्यालाच जोडून असलेला नीडल होल पॉईंट किंवा हत्तीचा माथा, विल्सन पॉईंट, मंकी पॉईंट, लॉडविक पॉईंट, टायगर्स स्प्रिंग, कार्नेक पॉईंट, हेलेन्स पॉईंट, एलफिन्स्टन पॉईंट, बॅबींग्टन पॉईंट, बॉम्बे पॉईंट, फॉकलंड पॉईंट, बगदाद पॉईंट आदी वैशिष्ट्यपूर्ण पॉईंट महाबळेश्वर परिसरात आहेत. पावसाळ्यामध्ये महाबळेश्वर येथील लिंगमाळा धबधबा, चिनामन्स धबधबा, धोबी धबधबा नयनरम्य आनंद देतात.

संपूर्ण महाबळेश्वर आणि आसपासच्या गावांना वेण्णा तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो. सौंदर्याने नटलेल्या महाबळेश्वरच्या पसिरातील पर्यटकांचे हे एक महत्वाचे जलविहाराचे ठिकाण आहे. याशिवाय महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, मध, जॅम, क्रशेस, चिक्की पर्यटकात प्रसिद्ध आहे. येथील माल्कमपेठ या नावाने प्रसिद्ध असलेली बाजारपेठ पर्यटकांचे आणखी एक आकर्षण आहे. महाबळेश्वर येथे सध्या पर्यटकांची बारमाही गर्दी असते.

पाचगणी हेही थंड हवेचे ठिकाण असून तेथील टेबल लँड या ठिकाणास भेट दिल्याशिवाय पर्यटक परतत नाहीत. सिडनी पॉईंट, पारसी पॉईंट, डेव्हील्स किचन, मॅप्रो गार्डन याशिवाय मॉरल रिआर्मामेट सेंटरही येथे आहे. पाचगणी हे निवासी शाळांसाठी प्रसिद्ध असून देश-विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी याठिकाणी येत असतात.

कसे जाल : 
जवळचे विमानतळ :- पुणे 120 कि.मी.
रेल्वे- जवळचे रेल्वे स्थानक वाठार स्टे. (ता. कोरेगाव) परंतु यापेक्षा पुणे रेल्वे स्थानकच अधिक सोयीचे आहे.
एसटी बसेस- पुणे-वाई-महाबळेश्वर 120 कि.मी.,
मुंबई -महाबळेश्वर (महाडमार्गे) 247 कि.मी.

औंध:
पूर्वी संस्थानिकांच्या जहागिरीचे औंध हे मुख्यालय होते. पंतप्रतिनिधींचा येथे मराठा स्थापत्य शैलीतील दुमजली वाडा येथे पाहण्यासारखा आहे. किन्हईचे कुलकर्णी पदाचे वंशपरंपरागत अधिकार असलेले त्र्यंबक कृष्णा हे पंतप्रतिनिधी घराण्याचे पूर्वज. या घराण्यातील रामचंद्र अमात्याच्या पदरी असलेल्या परशुराम त्रिंबकास छत्रपती राजाराम महाराजांनी 1690 मध्ये सरदारकी आणि सुभा लष्कर व समशेरजंग हे किताब दिले होते. 1909 पासून भगवानराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी अधिकारारुढ होते.

यमाई देवी:
औंध गावाच्या नैऋत्येस 240 मीटर अंतरावरील टेकडीवर यमाई देवीचे मंदिर आहे. मंदिराभोवती तटबंदी असून तिला दहा बुरुज आहेत. तटबंदीस उत्तरेस व दक्षिणेस प्रवेशद्वारे आहे. हे प्रारंभिक मध्ययुगातील तारकाकृती मंदिर असून त्यास मुखमंडप व गर्भगृह आहे. गाभाऱ्यात यमाई देवीची पाषाणातील पूर्वाभिमुखी मूर्ती आहे. जवळच पाण्याचे तळे आहे. यमाई देवीची मोठी यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत असते.

औंध वस्तुसंग्रहालय:
सातारा व कोल्हापूर या मुख्य शहरांना जोडणारे औंध हे गाव संस्कृतीचे अनेक अवशेष आजही जतन करीत आहे. त्यात आठ हजारापेक्षा जास्त वस्तू असलेले हे वस्तुसंग्रहालय 1938 साली बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी बांधले. विविध प्रदेशात निर्माण झालेली व त्या-त्या प्रदेशाची वैशिष्ट्ये सांगणारी ऐतिहासिक चित्रे, संगमरवरातून कोरलेली शिल्पे, कोरीव काम केलेल्या धातूच्या व लाकडाच्या वस्तू, हस्तीदंती कोरीव कलाकृती आणि स्ट्राँगरुममधील मौलिक ऐतिहासिक रत्ने यांचे दुर्मिळ दर्शन याठिकाणी पाहावयास मिळते. हे वस्तु संग्रहालय आज महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाच्या ताब्यात आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या वस्तुसंग्रहालयाला भेट देतात.

कास पठार:
कास पुष्प पठाराने पर्यटनाच्या क्षेत्रात देशातच नव्हे तर जागतिक नकाशावर सातारा जिल्ह्याचा लौकिक नोंदविला आहे. सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्प पठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून नुकतेच समाविष्ट करण्यात आले आहे. आज साताऱ्याच्या पर्यटनाची ओळख खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार झाली आहे. सातारा शहरापासून अवघ्या 23 कि.मी. वर धरतीवरच्या स्वर्गरूपाने साक्षात कास पुष्प पठार वसले आहे. सध्या कास पठार हे विविध जातींच्या फुलांनी बहरत असून पर्यटकांची रिघ कास पठाराच्या दिशेने सुरु झाली आहे.

कास पठार हे वर्ड हेरिटेज कमिटीने जुलै 2012 मध्ये मान्य केलेल्या पश्चिम घाटातील 39 ठिकाणापैकी एक आहे. 21 देशांच्या सभासदासमोर पश्चिम घाटाला जागतिक वारसास्थळाचे नामांकन मिळाले आहे. त्यातील कास पठार हे फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसास्थळ म्हणून नामांकन प्राप्त झालेले ठिकाण आहे. कास पुष्प पठाराचे नैसर्गिक आणि निसर्गदत्त देणगीची जोपासना करून या पठाराचा विकास करण्यात वन विभागाने पुढाकार घेतला आहे.

संकेतस्थळ: www.kas.ind.in 

शिवसागर तलाव, बामणोली, तापोळे:सातारा शहराच्या पश्चिमेला यवतेश्वराचा डोंगर. या डोगराच्या कुशीत श्री शंकराचे स्थान आहे. श्रावणामध्ये हजारो भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.
यवतेश्वरपासून पुढे 16 कि.मी. अंतरावर कास तलाव आहे. या तलावाचे पाणी सातारा शहरासाठी बंद पाईपने पुरविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागातील या तलावाच्या परिसरात जंगली श्वापदे आहेत. हे ठिकाण सहलीचे केंद्र बनले आहे. या तलावावरुन पुढे काही अंतरावर कोयना धरणाच्या पाणलोटातील शिवसागर हा जलाशय आहे. हा भाग दाट झाडीने व्यापलेला आहे.

वन विभागाने जतन केलेला नैसर्गिक वृक्षवाढीचा प्रदेश शिवसागराच्या किनाऱ्यावर आहे. बामणोली तसेच तापोळा ही जलाशयाच्या काठावरील हिरवाईने नटलेली गावे महाबळेश्वरच्या टप्प्यात असल्याने व बोटिंगसारख्या सुविधा तेथे उपलब्ध झाल्याने नवीन पर्यटनस्थळे म्हणून या गावांचा झपाट्याने विकास होत आहे.

धावडशी:
साताऱ्याच्या वायव्येस नऊ कि.मी.अंतरावर धावडशी हे गाव आहे. ब्रम्हेंद स्वामींना 1928 मध्ये छत्रपती शाहूकडून इनाम म्हणून मिळालेले हे गाव होते. ब्रम्हेंद्र स्वामी छत्रपती शाहूंचे राजगुरु व पेशव्यांचे गुरु होते. सन 1945 मध्ये ब्रम्हेंद्र स्वामी निर्वतल्यानंतर छत्रपती शाहूंनी त्यांच्या समाधीवर मंदिर बांधले. मंदिर उत्तराभिमुखी, अतिशय रेखीव आहे. गाभाऱ्यात भार्गवरामाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.

धावडशीच्या तांबे घराण्यात जन्मलेली मेरी झाँसी नही दुंगी ! असा नारा देणाऱ्या झाशीच्या राणीचे धावडशी हे जन्मगाव. आजही तिच्या वाड्याचे काही अवशेष याठिकाणी पाहावयास मिळतात. मेरुलिंग धावडशी येथील ब्रम्हेंद्र स्वामी यांचा मठ व तळी प्रसिद्ध आहेत.

ठोसेघर:
सातारा तालुक्यातील ठोसेघर येथील धबधबा पाहण्यास पावसाळी हंगामात तरुणाई लोटलेली असते. हे स्थळ सातारा येथून 36 कि.मी. अंतरावर आहे. चाळकेवाडी येथील पठारावर उभारलेला पवन ऊर्जा प्रकल्प हेही एक आकर्षक स्थळ ठरले आहे.

वाई:
कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले वाई हे दक्षिण काशी म्हणून संबोधले जाते. येथे विश्वकोश निर्मितीचे कार्य चालू आहे. वाईनजिकच्या मेणवली येथे नाना फडणवीस यांचा सुप्रसिद्ध वाडा आहे. सव्वा एकराच्या प्रशस्त जागेत बांधलेल्या या वाड्यात विविध प्रकारची कलाकुसर दिसून येते.

पाली:
पुणे-बंगलोर महामार्गावर काशिळच्या पश्चिमेस सुमारे सात कि.मी. अंतरावर असलेले पाली येथील खंडोबा मंदिर लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असून ते तारळी नदीच्या तीरावर वसलेले आहे. पौष महिन्यात याठिकाणी मोठी यात्रा भरते.

कोयना धरण:
संपूर्ण राज्याला वरदान ठरलेले कोयना हे धरण पाटण तालुक्यातील कोयना नदीवर बांधलेले आहे. 1960 साली हे धरण बांधण्यात आले. धरणाची पाणी साठवण क्षमता 98.78 टीएमसी एवढी आहे. या धरणातील जलाशयास शिवसागर जलाशय म्हणून ओळखले जाते. तापोळा ते कोयनानगर अशी बोटींगची सुविधाही पर्यटकांसाठी याठिकाणी उपलब्ध आहे.

कोयनानगरचे पंडित नेहरु स्मृति उद्यान
कोयना जलाशयाच्या शिवसागरात भारतीय अभियंत्यांनी चौथ्या टप्प्यात लेक टॅपिंगचा अभिनव प्रयोग यशस्वी केला. कोयनानगर परिसरात अलिकडेच अत्याधुनिक पद्धतीने उभारलेले पंडित जवाहरलाल नेहरु स्मृति उद्यान हेही पर्यटन केंद्र म्हणून उदयास आले आहे. आबालवृद्धांची तेथे वर्दळ असते. पर्यटन विकास महामंडळातर्फे येथे पर्यटन विकासाचे प्रयत्न जोमाने सुरु झाले आहेत.

वनकुसवडे- पवनऊर्जा:
साताऱ्यापासून 45 कि.मी.अंतरावर पाटण तालुक्यातील वनकुसवडे पठारावर 50 मीटर उंचीच्या मनोऱ्यावर तीन पात्यांच्या विंड टरबाईनद्वारे वाऱ्याच्या गतिज ऊर्जेचा वापर करुन विद्युत जनित्रे फिरवली जातात. यातून पवनऊर्जा निर्माण केली जाते. आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प येथे साकार होत आहे. आज येथे 857 पवन विद्युत जनित्रांच्या सहाय्याने 313 मेगावॅट वीज निर्माण केली जाते.

मांढरदेव:
वाईच्या उत्तरेला नऊ कि.मी.अंतरावर महादेव डोंगराच्या रांगेत मांढरदेव हे ठिकाण काळुबाई देवीच्या स्थानासाठी प्रसिद्ध आहे. वाई व शिरवळहून येथे जाता येते. सन 1850 मध्ये मंदिरावर शिखर बांधले. मंदिरात मध्यभागी काळुबाई देवीची स्वयंभू मूर्ती मखरात असून ती चांदीच्या पत्र्याने मढविलेली आहे. येथे पौष शुद्ध 15 ला मोठी यात्रा भरते.

म्हसवडची श्री सिद्धनाथ यात्रा, वाई, लिंब गोवे, क्षेत्र माहुली व कराड येथे कृष्णामाईचा उत्सव भाविक मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात. कारखेल (ता.माण) येथे संताजी घोरपडे यांचे स्मारक आहे.

कराड येथील प्रीतिसंगम:
कराड येथील कृष्णा-कोयनेचा संगम हा आता केवळ संगमच न राहता ज्येष्ठ नेते स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या या प्रितिसंगमावरील समाधीमुळे येथे स्थानिक जनतेबरोबरच राजकीय नेते, पर्यटक यांचीही वर्दळ वाढली आहे. कराडमधील यशवंतराव चव्हाण स्मृति सदनही सदैव गजबजलेले असते. येथील अद्ययावत कृष्णा हॉस्पिटलमुळे परिसरातील जनतेस वैद्यकीय सेवेचे नवे दालन खुले झाले आहे. यशवंतराव चव्हाण स्मृति सदन आणि वेणूताई चव्हाण प्रतिष्ठान वस्तु संग्रहालय, मनोरे ही कराडची वैशिष्ट्ये आहेत.

शिखर शिंगणापूर:
पुराण, इतिहास, धर्म आणि राजकारण यांचा समन्वय साधणारे शिखर शिंगणापूर हे ठिकाण डोंगराच्या माथ्यावर हे मंदीर आहे. चैत्र अष्टमीच्या दिवशी शिव पार्वतीच्या विवाहाचा सोहळा येथे पार पडतो. देवालयाच्या गाभाऱ्यातील शालूंकेत असलेली दोन लिंग शिवशक्तीची प्रतिके असून ती स्वयंभू आहेत असे मानले जाते. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप आणि नंदीमंडप यांचा मंदिरात समावेश आहे.

गोंदवले:
दहिवडीच्या आग्नेयेस आठ कि.मी.अंतरावर गोंदवलेकर महाराजांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दास संप्रदायातील या महाराजांचा जन्म 1845 मध्ये व मृत्यू 1918 मध्ये झाला. येथे त्यांची समाधी असून लाखो भाविक दर्शनाला येतात. मंदिराचे संपूर्ण बांधकाम आधुनिक पद्धतीचे असून ते 1936-37 मधील आहे. गावाच्या उत्तरेस 300 वर्षांपूर्वीचे भीमाशंकराचे मंदिर सुस्थितीतील आहे.

चाफळ:
पुणे-बंगलोर महामार्गावरील उंब्रजच्या पश्चिमेला 10 कि.मी. अंतरावर कृष्णेची उपनदी मांडच्या उजव्या तीरावर चाफळ गाव वसलेले आहे. रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गावास धार्मिक व ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. रामदास स्वामी बारा वर्षाच्या तीर्थाटनानंतर आल्यानंतर त्यांनी येथे मारुतीची स्थापना केली. समर्थांनी स्वहस्ते श्रीरामाचे मंदिर येथे बांधले. शिवाजी महाराजांनी या मंदिरासाठी 300 होन दान दिले. मंदिरात राम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्तीची 1648 मध्ये स्थापना केली. जीर्ण झालेले हे मंदिर उद्योगपती अरविंद मफतलाल यांनी 1972 मध्ये नव्याने बांधून दिले. मकर संक्रांतीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात महिला दर्शनासाठी येतात.

पुसेगाव:
सातारच्या पूर्वेला पंढरपूर रस्त्यावर 36 कि.मी.अंतरावर येरळा नदीच्या तीरावर पुसेगाव वसले आहे. नाथपंथींच्या अकरा लिंगापैकी एक येथे आहे. येथे सेवागिरी महाराजांची समाधी आहे. त्यांनी अनेक कल्याणकारी कामे करुन 10 जानेवारी 1947 मध्ये येथे समाधी घेतली. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला मोठी यात्रा याठिकाणी भरते. त्यावेळचा रथोत्सव प्रसिद्ध आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी कामे केली जातात.

अन्य महत्वाची ठिकाणे:
निसर्ग सान्निध्याने नटलेल्या आणि डोंगर-दऱ्या-खोऱ्यांनी व्यापलेल्या या जिल्ह्यातील लहान-मोठ्या गडकोट किल्ल्यांची संख्या 25 हून जास्त आहे.

तालुकावर गडकोट किल्ल्यांची विभागणी अशी : 
• वाई- खंडाळा: कमळगड, पांडवगड, वैराटगड, केंजळगड.
• जावळी-महाबळेश्वर: प्रतापगड,मकरंदगड, वासोटा.
• सातारा-कोरेगाव: अजिंक्यतारा, सज्जनगड, चंदन-वंदन, नांदगिरी.
• पाटण: दातेगड उर्फ सुंदरगड, गुरपावंतगड, भैरवगड, जंगली जयगड.
• कराड: सदाशिवगड, वसंतगड.
• फलटण-माण: ताथवडा उर्फ संतोषगड, वारुगड, महिमानगड.
• खटाव- वर्धनगड आणि भूषणगड.

लहान-मोठे गडकोट किल्ले आजही इतिहासकालीन महापुरुषांच्या थोर पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत.

यापैकी प्रतापगड, मकरंदगड, संतोषगड, वारुगड, महिमानगड, वर्धनगड, भूषणगड, सदाशिवगड हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले. आगाशिव डोंगर येथील लेण्या, वाई येथील मेणवलीचा नाना फडणीस यांचा वाडा आदी जिल्ह्यातील अनेक प्रेक्षणीय ठिकाणे पर्यटकांना साद घालतात.

गडकोट किल्ले, अनेक प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे, निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक स्थळे, वस्तुसंग्रहालये, धरण जलाशय परिसरातील निसर्ग सान्निध्याने व्यापलेली स्थळे, जंगले, तीर्थक्षेत्रे, उद्याने, पावसाळ्यातील धबधबे अशा मनोहारी निसर्ग सौंदर्याने नटलेला सातारा जिल्हा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालीत आला आहे.
प्रमुख स्थळांचे साताऱ्यापासूनचे अंतर

ठिकाण                                

कि.मी.

किल्ले प्रतापगड व भवानी माता मंदिर            

83

सज्जनगड : श्री रामदास स्वामींची समाधी                 

12

शिखर शिंगणापूर- शंभु महादेवाचे देवालय                 

89

धावडशी - ब्रम्हेंद्रस्वामी मंदिर  

15

पाली- श्री खंडोबाचे देवालय        

33

चाफळ - श्रीराम मंदिर                            

43

ठोसेघर - धबधबा

36

औंध- यमाई देवालय/वस्तु संग्रहालय               

43

श्री क्षेत्र महाबळेश्वर- तीर्थक्षेत्र

72

बामणोली- निसर्ग सौंदर्य

36

महाबळेश्वर- थंड हवेचे ठिकाण

65

चाळकेवाडी - पवन ऊर्जा प्रकल्प

40

कोयना धरण, विद्युत प्रकल्प

98

धोम धरण

44

वाई तीर्थक्षेत्र (दक्षिण काशी)

35

फलटण- श्रीराम मंदिर

63

गोंदवले बु. ब्रम्हचैतन्य स्वामी महाराज समाधी

72

पाचगणी - थंड हवेचे ठिकाण

49

पुसेगाव- सेवागिरी महाराज

35


उत्तर लिहिले · 23/9/2017
कर्म · 22090
0

सातारा जिल्ह्यामध्ये फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. त्यापैकी काही प्रमुख ठिकाणे खालीलप्रमाणे:

  • महाबळेश्वर: हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. येथे असलेले विविध पॉईंट्स, सुंदर दृश्ये आणि थंड हवा पर्यटकांना आकर्षित करतात.
    • प्रसिद्ध स्थळे: वेण्णा लेक, लिंगमळा धबधबा, आर्थर सीट पॉईंट, विल्सन पॉईंट (सनसेट पॉईंट)
  • पांचगणी: हे देखील एक सुंदर हिल स्टेशन आहे. टेबल लँड आणि अनेक रॉक-कट गुंफा येथे आहेत.
    • प्रसिद्ध स्थळे: टेबल लँड, सिडनी पॉईंट, डेव्हिल्स किचन
  • कास पठार: हे UNESCO जागतिक वारसा स्थळ आहे. येथे विविध प्रकारची रानफुले आढळतात.
    • विशेषता:Seasonal wildflower blooms
  • सज्जनगड: समर्थ रामदास स्वामींची समाधी असलेले हे ठिकाण ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.
  • ठोसेघर धबधबा: साताऱ्याजवळ असलेला हा धबधबा खूप सुंदर आहे.
  • अजिंक्यतारा किल्ला: सातार शहराच्या जवळ असलेला हा किल्ला मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा भाग होता.
  • नाटळ धबधबा: Manmad-shirpur Rd, Natali, Maharashtra 415531

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1700

Related Questions

पांडव गुंफा कोठे आहे?
भारतातील अजबगजब ठिकाणे कोणती?
जटायु मंदिर कोठे आहे?
काशी विश्वनाथ कॉरिडॉर बद्दल माहिती सांगा?
संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे?
शिवाजी महाराज यांची समाधी आहे त्या जागेचे नाव काय?
भारतातील धबधबे कोणते आहेत?