विवाह ज्योतिष

लग्न करताना कुंडली, गुण जुळणे याला खरोखर किती महत्त्व आहे?

3 उत्तरे
3 answers

लग्न करताना कुंडली, गुण जुळणे याला खरोखर किती महत्त्व आहे?

9
महात्मा फुल्यांनी गेल्या शतकात एक प्रश्न केला होता की 'आपल्याकडे पत्रिका पाहून लग्न करूनही बालविधवांचे प्रमाण जास्त का ? इंग्लंड, अमेरिकेत तर पत्रिका वगैरे न बघता विवाह करतात तरी तिकडे हे प्रमाण जास्त नाही.` याचे कारण साधे आहे. आपल्याकडे बालविवाहाची प्रथा व बालमृत्यूचं प्रमाणही जास्त असल्यामुळे साहजिकच बालविधवांचे प्रमाण जास्त होतं. पण त्याचा संबंध ज्योतिषाशी नाही. पत्रिका न पहाता लग्ने झाली असती तरी हेच प्रमाण राहिले असते. प्रश्न हा आहे की पत्रिका पाहून लग्न झालेल्या मुलींच्या नशिबी वैधव्य येत नाही असे दिसते का ?
कालानुरूप पत्रिका गुणमेलनाची चिकित्सा होत गेली व त्यातील निष्फळता सुजाण लोकांच्या ध्यानात येवू लागली. छत्तीस गुण जुळूनही मने न जुळल्याने अयशस्वी ठरलेल्या वैवाहिक जीवनाची उदाहरणे दिसू लागली. उलट, पत्रिका न जुळताही समाधानी वैवाहिक जीवन जगणारी माणसं दिसू लागली. या संदर्भात सुप्रसिद्ध लेखक डॉ अनिल अवचट एकदा म्हणाले, ''सुनंदाशी माझं लग्न होण्यापूर्वी घरच्या मंडळींनी पत्रिका जुळते का नाही हे परस्परच बघितलं. वडिलांना एका ज्योतिषाने सांगितलं कि मुलीची पत्रिका जुळत नाही, तुम्ही हे लग्न जुळवू नका, अरिष्ट आहे. परंतु घरच्यांचा विरोध पत्करून मी हे लग्न केलं. आता मला असं वाटतं की मी आयुष्यातला एकमेव महत्वाचा योग्य निर्णय घेतला होता.``

परंतु आजही समाजात उच्च शिक्षित वर्गातही पत्रिका जुळण्याचे फॅड गेलेले नाही. "त्या रावनं बघा पत्रिका न बघता लग्न केलं, प्रेमविवाह ना! बसलाय आता बोंबलत. बुद्धीवादी ना!
" तो जाडया माहीतीये का? अरे त्याने रूपावर भाळून लग्न केलं, तरी आई सांगत होती चांगल्या ज्योतिषाला पत्रिका दाखव म्हणून ! पण नाही, अरे जवानी में तो गधी भी सुंदर दिखती है । आता म्हणतोय आईच ऐकलं असतं तर बरं झालं असतं.

'वालावालकरांच्या मुलाच्या लग्नाचे वेळी ज्योतिषाने सांगितलं होत कि हे लग्न ठरवू नका. कुटुंबातील व्यक्तिच्या जीवाला धोका आहे. वालावालकरांनी दुर्लक्ष केले व लग्न ठरवले. आणि काय सांगू लग्नाच्या ऐन मुहूर्तावर नवऱ्या मुलाचा सख्खा भाऊ अपघातात गेला. मी स्वत: डोळयांनी बघितलेली हकिगत आहे.`

'अहो मुलगी लग्नानंतर आपल्या बॉयफ्रेण्डबरोबर पळून गेली.` 'थोडक्यात वाचलो! ज्योतिषानं सांगितलं होतं मुलीचं कॅरॅक्टर बघा. नीट चौकशी केली तेव्हा कळलं की तिचं कॉलेजमधल्या मुलाबरोबर लफडं आहे म्हणूनं.`
'मुलगा दिसायला वागायला स्मार्ट उच्चशिक्षित, पण ज्योतिषानं सांगितले की मुलगा बाहेरख्याली वाटतो आणि तस्सच निघालं.` अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्या कानावर पडत असतात. ती खोटी असतात अशातला भाग नसतो.
अयशस्वी वैवाहिक जीवनाचं वाढलेलं प्रमाण, घटस्फोट इ. गोष्टी मनावर ताण निर्माण करतात. पत्रिका-मिलन मनाला आधार देतं. तो आधार तर्कबुद्धी किंवा विज्ञान देत नाही. पत्रिका-मिलन करूनही वैवाहिक जीवन अयशस्वी झालं तर ' आपण आपल्याकडून काळजी घेतली होती शेवटी नियतीची इच्छा! ` असं म्हणून मानसिक आधार मिळवला जातो. लग्नाच्या गाठी म्हणे स्वर्गात बांधल्या जातात. एक प्रथितयश ज्योतिषी श्री.श्री. भट हे आपल्या 'ज्योतिषाच्या गाभाऱ्यात` या पुस्तकात म्हणतात, '' विवाह पहाताना ठरविताना पत्रिका पाहणार नाही असा प्रचार केला जातो. तरुणांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये. वैवाहिक जोडीदार कोण असणार हे अटळ प्रारब्ध असते त्यात ज्योतिष हे निमित्त असते. `` तर दुसरे मान्यवर ज्योतिषी श्री. व.दा.भट म्हणतात, '' मी स्वत: ज्योतिषी असलो तरी एक गोष्ट प्रांजलपणे कबूल केली पाहिजे की वधूवरांची कुंडली जुळते अगर जुळत नाही या बद्दल हमखास अनुभवास येतील असे, ज्यावर पूर्ण विसंबून रहावे असे कोणतेही नियम नाहीत. पत्रिका जुळते अगर जुळत नाही या शब्दांना वास्तविक अर्थ नाही.``

पत्रिका कुठल्या कारणासाठी बघितली जाते ते आपण पाहिले. पण पत्रिकेवरून वजन, उंची, छाती, शिक्षण, विचारश्रेणी, अर्थिक क्षमता, रक्तगट, आरोग्य इत्यादि गोष्टी अजिबात समजत नाहीत. त्यामुळे पत्रिका बघण्यात काही अर्थ नाही. मात्र विवाह जुळवण्याची पद्धत जरूर विचारात घ्यावी. कारण प्रेमविवाहांची संख्या जशी वाढलीय् तशी घटस्फोटांची संख्याही वाढलीय्. शारिरिक आकर्षणातून निर्माण झालेलं प्रेम हे तकलादू असतं. त्यात विवेकापेक्षा भावनेचा पगडा जास्त असतो. तर दुसरीकडे सध्या प्रचलित असलेली विवाह जमवण्याची रीत ही एक प्रकारच्या जुगारासारखी आहे. तिच्यात केवळ व्यावहारिक गोष्टींसाठी बायोडाटा देतात व 'स्थळ बघण्याचा` कार्यक्रम होतो. त्यात मुलगा-मुलगी एकमेकांना थोडेबहुत प्रश्न विचारतात.यातून एकमेकाच्या व्यक्तिमत्वाचा काय अंदाज येणार? तसं ही 'माणुस` ओळखणं हे अवघडच काम. एकमेकाच्या सहवासात जन्म काढूनही परस्परांची खऱ्या अर्थानं ओळख न झालेली माणसं आढळतात. तिथं आपल्या आयुष्याचा साथीदार इतक्या तकलादू पद्धतीने निवडणे कितपत उचित होईल ? परिचयोत्तर विवाह हा एक चांगला पर्याय होउ शकेल. मैत्रीतून स्वभावाविषयी थोडाफार तरी अंदाज आलेला असतो. त्यामुळे अशा रितीने होणारा विवाह हा जुगार ठरण्याची शक्यता कमी. पण शेवटी, मैत्री आपल्या जागी रहाते व विवाह आपल्या जागी रहातो. विवाह ही व्यावहारिक बाब आहे. नुसत्या उदात्त कल्पनेने वैवाहिक जीवन काही जगता येत नाही. सांपत्तिक स्थिती, स्थावर, मानलौकीक, कौटुंबिक स्थिती या गोष्टी वा व्यावहारिक गरजा ही महत्वाच्या आहेत. फिल्मी स्टाईल प्रेमाच्या व त्यागाच्या बाता व्यवहारात कुचकामी ठरतात हे ध्यानात आल्यावर भ्रमनिरास होउन विवाह अयशस्वी ठरतात. म्हणूनच 'घटस्फोट मिळेल का?` असे ज्योतिषाकडे विचारायला जाणारा वर्ग वाढलाय. विवाह हा संस्कार न ठरता सोपस्कार व्हायला लागला आहे.

माझ्यामते विवाह जुळवण्यासाठी पत्रिका पहाणे निरर्थक आहे.
उत्तर लिहिले · 26/8/2017
कर्म · 5375
1
काहीएक महत्त्व नाही. मुन्नाभाई MBBS फिल्म बघा तुम्ही. कुंडली नाही मिळाली तरी मन मिलन आवश्यक आहे. बहुतेक देशात कुंडली न मिळवता लग्न होतात.
उत्तर लिहिले · 26/8/2017
कर्म · 7045
0

लग्न करताना कुंडली आणि गुण जुळण्याला किती महत्त्व द्यावे, हे एक व्यक्तिगतSelection आहे. या संदर्भात काही गोष्टी विचारात घेणे महत्त्वाचे आहे:

1. पारंपरिक दृष्टिकोन:

  • भारतात अनेक वर्षांपासून कुंडली जुळवून लग्न करण्याची पद्धत आहे.

  • असे मानले जाते की गुण जुळल्याने वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होते.

  • परंतु, हे फक्त एक मार्गदर्शन आहे आणि अंतिम निर्णय विचारपूर्वक घ्यावा.

2. ज्योतिषशास्त्राचे महत्त्व:

  • ज्योतिषशास्त्र हे एक शास्त्र आहे, पण ते अंतिम सत्य नाही.

  • कुंडलीतील ग्रह आणि त्यांचे स्थान वैवाहिक जीवनावर परिणाम करतात, असे मानले जाते.

  • गुण जुळवताना नाडी, भकूट, वर्ण,matching इत्यादी गोष्टी विचारात घेतल्या जातात.

3. आधुनिक विचार:

  • आजच्या काळात प्रेम, समजूतदारपणा आणिCompatibility हे जास्त महत्त्वाचे आहेत.

  • दोन व्यक्तींचे विचार जुळणे, एकमेकांचा आदर करणे आणि संकटांमध्ये साथ देणे अधिक महत्त्वाचे आहे.

  • केवळ गुण जुळवून लग्न करणे पुरेसे नाही.

4. तज्ञांचा सल्ला:

  • जर तुम्हाला कुंडली आणि गुण जुळवण्याबद्दल शंका असेल, तर जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्या.

  • तसेच,relationship counselor चा सल्ला घेणे देखील फायद्याचे ठरू शकते.

5. अंतिम निर्णय:

  • लग्न हा दोन व्यक्तींच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय आहे.

  • त्यामुळे, सर्व बाजू विचारात घेऊन आणि विचारपूर्वक निर्णय घ्या.

  • आपल्या intuition वर विश्वास ठेवा आणि आपल्या partner सोबत मनमोकळी चर्चा करा.

निष्कर्ष: कुंडली आणि गुण जुळवणे हे एक पारंपरिक मार्गदर्शन आहे. त्याला पूर्णपणे सत्य मानून निर्णय घेणे योग्य नाही. प्रेम, समजूतदारपणा आणिCompatibility हे वैवाहिक जीवनाचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे, या गोष्टींना अधिक महत्त्व द्या.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 980

Related Questions

मी जिथे जिथे राहायला जातो तिथे मला नवीन शत्रू मिळतात. हे कुंडलीतील योगामुळे आहे का?
जुने घर पाडून नवीन घर बांधायला सुरुवात करणार आहे, चांगला मुहूर्त कोणता ते कळेल का?
माझं मित्र कोण होईल सांगा?
मुलीसोबत १३ गुण मिळत असतील तर लग्न करावे कि करू नये?
माझ्या अकाउंटचे कर्म किती?
आकाशातील ग्रह तारे यांचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो ते थोडक्यात लिहा?
आकाशातील ग्रह तारे यांचा मानवी जीवनावर परिणाम होतो काय? असल्यास कसा, नसल्यास कसा?