कागदपत्रे पॅन कार्ड अर्थ

पॅन कार्ड काढण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात?

7 उत्तरे
7 answers

पॅन कार्ड काढण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात?

5
पॅनकार्डसाठी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे-

१)अर्जकर्त्याचे २ रंगीत फोटो
२)ओळखीचा पुरावा- आधारकार्ड/Driving licence/पासपोर्ट/मतदान कार्ड
३)पत्त्याचा पुरावा- आधारकार्ड/Driving licence/पासपोर्ट/मतदान कार्ड
४)जन्मदिनांक- आधारकार्ड/Driving licence/पासपोर्ट किंवा ज्यावर जन्मदिनांक पुर्णपणे दिली आहे असे.
५)शुल्क

अर्ज केल्यापासून १० ते १५ दिवसांत पोस्टाने पॅनकार्ड घरी येते.
उत्तर लिहिले · 8/6/2017
कर्म · 15545
2
ऑनलाईन अर्ज भरून आपण पॅन कार्ड खूप सहजरित्या काढू शकतो:

1. या वेबसाईट वर जा: लिंक खाली दिलेली आहे

2. सर्व माहिती भरून फॉर्म सबमिट करा

3. नंतर नेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड वापरून 96 रुपये फी पेमेंट करा

4. फी भरल्यानंतर आलेला फॉर्म प्रिंट करा

5. फॉर्म वर दर्शविलेल्या 3 ठिकाणी सही करा 

6. फॉर्म वर फोटो चिकटवा

7. अप्लिकेशन सोबत आयडेंटिटी कार्ड(ज्यावर तुमची जन्मतारीख असेल असे) ची झेरॉक्स जोडा

हे पूर्ण झालेले अप्लिकेशन खालील पत्त्यावर पाठवा:


PAN PDC Incharge – Mumbai region

UTI Infrastructure Technology And Services Limited

Plot No. 3, Sector 11, CBD Belapur

NAVI MUMBAI – 400614 


Tel No:(022)67931300


तुमचे अप्लिकेशन प्रोसेस होऊन तुमचे पॅनकार्ड तुमच्या घरी येईल.



संदर्भ


अपडेट:

पॅन कार्ड ऑनलाईन अप्लिकेशन करताना तुम्हाला तुमचा AO कोड विचारू शकतात, हा कोड मिळवण्यासाठी खालील उत्तर वाचा:


पॅन कार्ड लिंक
AO कोड लिंक
उत्तर लिहिले · 8/6/2017
कर्म · 28530
0

पॅन कार्ड (Permanent Account Number) काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:

ओळखीचा पुरावा (Proof of Identity):
  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • मतदान ओळखपत्र (Voter ID)
  • ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License)
  • पासपोर्ट (Passport)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • फोटो आयडी कार्ड (Photo ID Card) जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने जारी केले आहे.
पत्त्याचा पुरावा (Proof of Address):
  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • मतदान ओळखपत्र (Voter ID)
  • ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License)
  • पासपोर्ट (Passport)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • लाईट बिल (Electricity Bill)
  • टेलिफोन बिल (Telephone Bill)
  • बँक स्टेटमेंट (Bank Statement)
  • पोस्ट ऑफिस पासबुक (Post Office Passbook)
जन्मतारखेचा पुरावा (Proof of Date of Birth):
  • जन्म दाखला (Birth Certificate)
  • एसएससी (SSC)certificate
  • पासपोर्ट (Passport)
  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License)
  • पॅन कार्ड (Pan Card)

अधिक माहितीसाठी तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: आयकर विभाग

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1080

Related Questions

पॅनकार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
एखाद्या कंपनीचा संचालक म्हणून नियुक्ती होण्यासाठी संचालकाला खालीलपैकी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? पॅन (PAN) डीआयएन (DIN) सीआयएन (CIN)
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
माझ्याकडे पॅन कार्ड आहे पण त्यावर दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईल नंबर जोडलेला आहे आणि तो नंबर बंद पडला आहे, तर मला माझा नंबर ॲड करायचा आहे?
मला माझ्या पॅन कार्डचा मोबाईल नंबर चेंज करायचा आहे, कसा करू? पहिला जो नंबर आहे तो बंद पडला आहे.
आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक कसे करायचे?
पॅन कार्ड हरवले आहे?