प्रवास पर्यटन स्थळे

नाशिकमधील प्रेक्षणीय स्थळे कोणती? नाशिक कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे?

2 उत्तरे
2 answers

नाशिकमधील प्रेक्षणीय स्थळे कोणती? नाशिक कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे?

7
नाशिक हे धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांसाठी प्रसिद्ध आहे.

**त्र्यंबकेश्वर:-
हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे स्थळ नाशिकपासून २७ कि.मी. अंतरावर आहे.येथे शंकराच्या पिंडीवर शाळूंका नसून खड्डा आहे..व त्यात सुपारीसारखा आकाराचे तीन गोटे आहेत..ते ब्रम्हा,विष्णू व महेश यांचे प्रतिक मानले जातात. (त्रि+अंबिकेश्वर=त्र्यंबकेश्वर)
नारायणनागबली,कालसर्प हे विधी फक्त इथेच केले जातात.

**अंजनेरी:-
हे हनुमानाचे जन्मस्थान नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर आहे.

**सप्तशृंगीदेवी गड:-
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ. हे स्थळ नाशिकपासून ५२ कि.मी. अंतरावर आहे.

**पांडवलेणी:-
सुमारे १२०० वर्षांची जुनी लेणी नाशिक शहरात आहेत.

**फाळके स्मारक:-
दादासाहेब फाळके यांचे स्मारक पांडवलेण्यांजवळ पायथ्याशी आहे.

**रामकुंड:-
गोदावरी नदीवरील एक कुंड, कुंभमेळ्याच्या पर्वात येथे एक स्नान केल्याने पापे नाहिशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.१२ वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्याचे शाहीस्नान येथेच होतात.
(वनवासाला प्रभू श्रीराम निघाल्यावर त्यांच्या विरहाने त्यांचेे वडील राजा दशरथ यांचा मृत्यू झाला..तेव्हा त्यांचे श्राद्धकर्म रामाने या ठिकाणी केले म्हणून 'रामकुंड' हे नाव पडले आहे.)

**दुतोंड्या मारुती:-
नाशिकमध्ये रामकुंडावर भव्य आकारात हा प्राचीन मारुती असून गोदावरीला पूर आल्यावर नाशिककर ह्या मारुतीवरुन किती पूर आला याचा अचूक अंदाज लावतात.

**सीता गुंफा:-
राम,लक्ष्मण व सीता यांची वनवासातील वास्तव्याची जागा..येथे सीतेने तपश्चर्या केली आहे.

**टाकेद:-
येथे एक कुंड असून ते रामाने बाण मारुन तयार केले आहे असे मानण्यात येते.तसेच रावण सीतेला पळवून नेत असताना जटायू व रावणाचे युद्ध याच ठिकाणी झाले होते.

**काळाराम मंदिर:-
रामाचे काळ्या पाषाणात बनवलेले प्राचीन मंदिर,याचा कालखंड पेशवेकालीन आहे..तसेच पेशव्यांनी नवसपूर्ती झाल्यावर येथे रथ दान केले होते..आजही रामनवमी नंतर येणाऱ्या एकादशीला दरवर्षी येथे रथोत्सव साजरा होतो.

**सोमेश्वर:-
गोदावरी नदीच्या धबधब्यावर येथे प्रसिद्ध शिवमंदिर आहे, तसेच मंदिरापासून गंगापूर गावाच्या दिशेने गेल्यास थोड्याच अंतरावर नवीन तिरुपती बालाजी मंदिर बांधण्यात आले आहे.(कुर्तकोटी शंकराचार्य बालाजी मंदिर) मंदिरालगतच असलेला धबधबा सोमेश्वरचा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे.

**कपालेश्वर मंदिर:-
नंदी नसलेल भारतातील एकमेव शिवमंदिर..रामकुंडाच्या समोरच हे मंदिर आहे.

**एकमुखी दत्तमंदिर:-
महानुभावपंथीय मंदिर गोदावरीच्या किनाऱ्यावरच आहे.

**मुक्तिधाम:-
नाशिक रोड रेल्वेस्टेशन जवळच हे भव्य मंदिर आहे.

**नवश्या गणपती:-
नवसाला पावणारा अशी अख्यायिका या गणपतीची आहे.

**चामर लेणी:-
सुमारे १२०० वर्ष जुनी जैनपंथीय लेणी आहे.

**रामशेज किल्ला:-
दिंडोरी गावाजवळ हा किल्ला असून येथे काही वर्ष छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य होते.

**आगर टाकळी:-
समर्थ रामदासांनी स्थापलेला गोमय मारूती; समर्थांचे १२ वर्षे वास्तव्य येथे होते.

**कालिका मंदिर:-
हे नाशिकचे ग्रामदैवत असून नवरात्र काळात येथे यात्रा भरते.

नाशिकपासून जवळच त्र्यंबकेश्वराजवळ नाणी संशोधन केंद्र आहे. तसेच सिन्नर येथे गारगोटी नावाचे स्फटिकांचे संग्रहालय आहे.

**बोटॅनिकल गार्डन:-
नव्यानेच निर्माण झालेले बोटॅनिकल गार्डन हे भारतात कुठेही नाही.येथे लेसर शो तसेच बोलकी झाडे हे प्रमुख आकर्षण आहे.

**स्व.बाळासाहेब ठाकरे शस्त्रसंग्रहालय:-
गंगापूर रोडवर असणाऱ्या ह्या संग्रहालयात शिवकालीन शस्त्रे,नाणी व इतर अनेक वस्तू संग्रहित आहेत.
उत्तर लिहिले · 27/4/2017
कर्म · 20475
0

नाशिकमध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यापैकी काही प्रमुख स्थळे खालीलप्रमाणे:

  • पांडवलेणी लेणी: ही लेणी नाशिक शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर आहेत. ही लेणी अंदाजे २ हजार वर्ष जुनी आहेत. विकिपीडिया पान
  • काळाराम मंदिर: हे मंदिर नाशिक शहरातील गोदावरी नदीच्या काठी असलेले एक महत्त्वाचे मंदिर आहे.
  • त्र्यंबकेश्वर मंदिर: हे नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. विकिपीडिया पान
  • गंगापूर धरण: हे धरण नाशिक शहराच्या जवळ असलेले एक सुंदर ठिकाण आहे.
  • सोमेश्वर धबधबा: नाशिकमध्ये पावसाळ्यात भेट देण्यासाठी हे एक सुंदर ठिकाण आहे.

नाशिक खालील गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे:

  • द्राक्षे आणि वाईन: नाशिक हे भारतातील 'वाइन कॅपिटल' म्हणून ओळखले जाते. येथे अनेक वायनरी आहेत.
  • धार्मिक स्थळे: नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर आणि काळाराम मंदिर यांसारखी अनेक प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत.
  • कुंभमेळा: नाशिकमध्ये दर १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो, जो एक मोठा धार्मिक उत्सव आहे.
उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 3000

Related Questions

पांडव गुंफा कोठे आहे?
भारतातील अजबगजब ठिकाणे कोणती?
जटायु मंदिर कोठे आहे?
काशी विश्वनाथ कॉरिडॉर बद्दल माहिती सांगा?
संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे?
शिवाजी महाराज यांची समाधी आहे त्या जागेचे नाव काय?
भारतातील धबधबे कोणते आहेत?