मनोरंजन प्रेरणा स्वभाव मानसिक आरोग्य

कधी कधी मन उदास होतं, अशा वेळी काय करावं?

3 उत्तरे
3 answers

कधी कधी मन उदास होतं, अशा वेळी काय करावं?

6
*_⭕  उदास वाटतयं हे वाचा  ⭕_* 



''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''' 
     *_우   माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   우_*   ''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''' 
 https://youtu.be/DXxZpbmr_A0 
 *_🌹तारीख  25 मार्च 2017 🌹_* 
 ''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''' 
 कधी कधी आपला मूड छान लागलेला असतो, पण असे काही तरी ऐकण्यात येते, समोर घडते किंवा आठवते की त्यामुळे आपला मूड क्षणात बदलून जातो. आपण एकदम उदास होऊन जातो. मात्र ही मन:स्थिती दिवसभर टिकून राहणे योग्य नाही. या मन:स्थितीच्या बदलावर मात करून आपल्याला पूर्ववत आपली मन:स्थिती ताळ्यावर आणता आली पाहिजे आणि दिवस वाया गेला नाही पाहिजे.त्यावर काही उपाय आहेत. 
 १) हसणे😁 – हसणे हा आपल्या भावनिक समस्येवरचा उत्तम उपाय आहे. मनसोक्तपणे आणि मन:पूर्वक हसलो तर केवळ मन:स्थितीच बदलते असे नाही तर आरोग्याला इतरही अनेक फायदे होतात. 
 २) व्यायाम🕺 – व्यायामाने आपला दिवस छान सुरू होतो. त्यामुळे एन्डॉर्फिन ग्रंथी कार्यरत होतात आणि मन:स्थिती चांगली होऊन जाते. 
 ३) सूर्यप्रकाश🌞 – मूड गेला की, स्वच्छ सूर्यप्रकाशाकडे बघा. सूर्यप्रकाशातील ड जीवनसत्वामुळे चित्तवृत्ती उल्हसित होतात. 
 ४) संगीत 🎹– संगिताने तर माणसाच्या मन:स्थितीवर चांगलाच परिणाम होत असतो. एखादे शांत संगीत मिनिटभर ऐकले की, गेलेला मूड परत येतो. 
 ५) फोटो🖼 – आपला एखादा लहानपणीचा फोटो किंवा तरुण वयातला फोटो पुन्हा एकदा बघायला लागतो तेव्हा आपण नकळतपणे त्या सुखद काळात जातो. फोटो काढतानाचा अनुभव आपल्या मनात जागा होतो आणि आपली वृत्ती बदलून जाते. 
 *'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''* 
 *_💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   💖_*  *'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''* 
 https://youtu.be/DXxZpbmr_A0 
 *✆ 9890875498* 
 *_'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''_
2
देवाचे नमन/नमस्कार करावे, आपल्या लाईफ मधल्या जवळच्या आणि आपल्याला आनंद देणाऱ्या व्यक्तींशी मन मोकळे करावे किंवा आपल्या लाईफ मधल्या मोस्ट हॅपी मोमेंट आठवाव्या. ज्या कारणाने मन उदास होते ते कारण इग्नोर करावे किंवा एकदाच सोल्व्ह करावे.
उत्तर लिहिले · 27/3/2017
कर्म · 0
0

जेव्हा मन उदास होतं, तेव्हा काय करावं हे काही उपायांनी समजू शकतं:

  • शारीरिक हालचाल:
    • उदासी दूर करण्यासाठी शारीरिक हालचाल करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही नृत्य करू शकता, ज्यामुळे Endorphins नावाचे हॉर्मोन बाहेर पडतात आणि तुम्हाला आनंद मिळतो.
  • आवडत्या गोष्टी करा:
    • तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या करा. उदाहरणार्थ, चित्र काढणे, संगीत ऐकणे किंवा चित्रपट पाहणे.
  • नकारात्मक विचार टाळा:
    • मनात येणारे नकारात्मक विचार टाळण्याचा प्रयत्न करा आणि सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.
  • ध्यान आणि श्वासोच्छ्वास व्यायाम:
    • ध्यान (Meditation) आणि श्वासोच्छ्वास व्यायाम केल्याने मनाला शांती मिळते आणि तणाव कमी होतो.
  • मित्र आणि कुटुंबाशी बोला:
    • आपल्या मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा आणि आपल्या भावना त्यांच्यासोबत सांगा.
  • पुरेशी झोप घ्या:
    • दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.
  • प्रकृतिमध्ये वेळ घालवा:
    • बागेत किंवा निसर्गरम्य ठिकाणी जाऊन ताजी हवा घ्या आणि निसर्गाचा आनंद घ्या.

हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या उदास मनाला शांत करू शकता.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 980

Related Questions

बॉलीवूड संगीताचे उदाहरण कोण आहे?
हिंदी किंवा मराठी गाणी डाउनलोड करण्यासाठी ॲप्स?
मला करमत नाही, ऋतिक भाई मला खूप मारतो, राम राम दीपिका माणसं, काय भाई?
मुस्लिम देशातील ब्युटिफुल प्रिन्सेस कोण आहेत?
2006 साली प्रदर्शित झालेल्या 'गाढवाचं लग्न' या मराठी चित्रपटात राजकुमारीची भूमिका कुणी केली आहे?
भाषा शिकण्यासाठी मानवी मेंदू किती मेगाबाइट माहिती साठवतो?
माझं मित्र कोण होईल सांगा?