व्यवसाय उद्योजकता उपहारगृह परवाना आणि ओळखपत्रे

हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी कोण-कोणते परवाने घ्यावे लागतात?

5 उत्तरे
5 answers

हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी कोण-कोणते परवाने घ्यावे लागतात?

10
हॉटेल व्यायवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला "फूड लायसन्स" ची आवश्यकता लागेल.

ज्‍या ज्‍या ठिकाणी खाण्‍याचे पदार्थ विकले जातात किंवा ठेवले जातात त्‍या सर्वांना हया लायसन्‍सची आवश्‍यकता असते. उदा. हॉटेल, बेकरी व इतर सर्व व्‍यावसायीक. 
फूड व्यवसाय हा चांगला उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना स्वयंरोजगार उपलब्धतेच्या दृष्टीने हॉटेल व्यवसायाचा वाटा मोठा आहे. हॉटेल किंवा खाद्यगृह सुरु करणे सोपे असते.परंतु त्याची प्रत्यक्ष रीतसर कायद्याने नोंदणी करणेही महत्वाचे व बंधनकारक आहे. 

त्यासाठी पुढील कागदपत्रांची पूर्तता करून आपला व्यवसाय अधिकृत करता येईल:
१. दोन फोटो
२. आधार कार्ड  / पॅनकार्ड
३. लाइर्ट बिल

महा ई सेवा केंद्रात ही सेवा ऑनलाईन उपलब्‍ध आहे.

खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आता Food Safety and Standard Authority of India (FSSAI) यांचे व्यवसाय मान्यता प्रमाणपत्र सक्तीचे केले असून हे प्रमाणपत्र तुमच्या जवळील महा ई सेवा केंद्रामध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.
नागरिकांकडून जे पदार्थ खाण्यासाठी वापरले जातात त्या प्रत्येक पदार्थांची विक्री करण्यापूर्वी त्यांची विक्री करण्याची परवानगी केंद्र सरकारने सक्तीची केलेली आहे, अशा परवानगी शिवाय कोणतेही खाद्यपदार्थ विकणे,साठविणे,उत्पादन करणे बेकायदेशीर असून अशी बेकायदेशीर कृती करणारांवर गुन्हेही दाखल होऊ शकतात.यासाठी भारतीय खाद्य सुरक्षा एवं मानक प्राधिकरण (FSSAI) हे खाद्यपदार्थ विक्रीचा परवाना देवू करतात.हा परवाना मिळण्यासाठी पूर्वीच्या काळी खूप अडचणी येत असत.मात्र केंद्र सरकारने हे सर्व परवाने ऑनलाईन उपलब्ध केले असून सदर परवाने जवळच्या महा ई सेवा केंद्रामध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत.हा परवाना १ ते ५ वर्षांसाठी मिळू शकतो. नंतर परत रिन्यू करून घेऊ शकता.

तुमच्या जवळील महा ई सेवा केंद्र तुम्ही खालील लिंक वर क्लीक करून शोधू शकता. नंतर तेथे जाऊन तुम्ही वरील कागदपत्रे देऊन अर्ज करू शकता. अर्जाची छाननी झाल्यावर तुम्हाला परवाना मिळून जाईल.
उत्तर लिहिले · 27/1/2017
कर्म · 283280
5
*🍹ऑल महाराष्ट्र FSSAI फूड लायसंस व रजिस्ट्रेशन सेवा🍽*

*(अन्न भेसळ परवाना)*


_अन्नसुरक्षा कायद्यानुसार राज्यातील प्रत्येक किराणा व किरकोळ विक्रेत्यांसह रस्त्यावर हंगामी स्वरूपात अन्नपदार्थाची विक्री करणाऱ्यांना अन्न आणि औषध प्रशासनाचा परवाना घेणे आणि आपल्या व्यवसायाची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे_


पानटपरी, वडापाव स्टॉल, किराणा दुकान, हॉटेल, रेस्टोरंट, मटण चिकन शॉप, भाजीपाला विक्रेते, वेलनेस प्रॉडक्ट्स विक्रेते, चहा दूध विक्रेते, बेकरी,

इ सर्व खाद्यपदार्थ विक्रेते व मॅन्युफॅक्चरिंग युनिट धारकांसाठी अन्न व औषध प्रशासन विभागात नोंदणी आवश्यक आहे!


ऑल महाराष्ट्र अन्न भेसळ परवाना नोंदणी (FSSAI फूड बिजनेस रजिस्ट्रेशन) साठी संपर्क

प्रविण त-हाळ,

फिनिक्स इन्फोटेक, छत्रपती संकुल,शिवाजी रोड, श्रीरामपूर,

9890351785


आवश्यक कागदपत्रे

1. व्यवसाय ठिकाणचा फोटो

2. आधार कार्ड

3. पासपोर्ट फोटो

4. स्वयंघोषणापत्र

5. व्यवसाय ठिकाण चा पत्याचा पुरावा

6. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र

7. लाईट बिल

8. वॉटर सप्लाय बिल, पाणी पट्टी

9. प्रोसेसिंग युनिट लेआउट प्लॅन

10. डायरेक्टर/प्रोप्रायटर/पार्टनर्स यांचा पूर्ण पत्ता व कॉन्टॅक्ट डिटेल्स सह यादी

11. पासपोर्ट साईज फोटो चिकटवून सही केलेला "फॉर्म A"

12. 100 रु च्या स्टॅम्प पेपर वर प्रतिज्ञापत्र

https://www.loksatta.com/vruthanta-news/the-food-and-drug-administration-license-is-mandatory-for-the-small-shops-263623/


Download Form A - https://goo.gl/ArGEUs

उत्तर लिहिले · 10/12/2017
कर्म · 170
0
हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने खालीलप्रमाणे आहेत:

1. व्यवसाय परवाना (Business License):

हॉटेल सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक महानगरपालिका किंवा नगरपालिकेकडून व्यवसाय परवाना घेणे आवश्यक आहे. हा परवाना तुमच्या व्यवसायाच्या कायदेशीर अस्तित्वाचा पुरावा असतो.

2. अन्न परवाना (Food License):

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) कडून अन्न परवाना घेणे आवश्यक आहे. हा परवाना अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता मानके सुनिश्चित करतो.

FSSAI अधिकृत वेबसाईट

3. आरोग्य परवाना (Health License):

हॉटेलमधील स्वच्छता आणि आरोग्याच्या मानकांची खात्री करण्यासाठी आरोग्य विभागाकडून परवाना घेणे आवश्यक आहे.

4. अग्निशमन परवाना (Fire License):

आगीच्या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी अग्निशमन विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेणे आवश्यक आहे. यात आगीच्या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे बंधनकारक आहे.

5. पोलिस परवाना (Police License):

काही शहरांमध्ये, हॉटेल व्यवसायासाठी पोलिसांकडून परवाना घेणे आवश्यक असते. हा परवाना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी असतो.

6. GST नोंदणी (GST Registration):

जर तुमच्या हॉटेलचा वार्षिक व्यवसाय २० लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला वस्तू व सेवा कर (GST) अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे.

GST अधिकृत वेबसाईट

7. Shop and Establishment Act License:

तुम्हाला तुमच्या दुकानाची आणि आस्थापनाची नोंदणी Shop and Establishment Act अंतर्गत करावी लागेल.

8. मद्य परवाना (Liquor License):

जर तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये मद्यविक्री करू इच्छित असाल, तर तुम्हाला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य परवाना घेणे आवश्यक आहे.

9. संगीत परवाना (Music License):

जर तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये संगीत वाजवणार असाल, तर तुम्हाला Indian Performing Right Society Ltd. (IPRS) कडून परवाना घेणे आवश्यक आहे.

10. पर्यावरण ना-हरकत प्रमाणपत्र (Environmental NOC):

काही विशिष्ट ठिकाणी हॉटेल सुरू करण्यासाठी पर्यावरण विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते.
उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 960

Related Questions

यशस्वी उद्योजकांचा मूळ मंत्र या विषयीची प्रस्तावना कशी कराल?
किरकोळ व्यापारी चा अर्थ सांगा?
मला उद्योग करायचा आहे. समोसा, कचोरी, पाववडा, सँडविच, पाणीपुरी शिकायची आहे, कसे शिकावे?
प्लॉट, घोर्म आणि इंडस्ट्रीज म्हणजे काय?
याचे उपार्जन कसे करावे?
विजयनगर व बहमनी ही दोन राज्ये कधी उदयास आली?
वसाहत वादाच्या उदयाची कारणे कोणती आहेत?